ETV Bharat / state

कोरोनाचा फटका; जळगाव 'आरटीओ'चे महसुली उत्पन्न 25 ते 30 टक्क्यांनी घटले - jalgaon rto revenue decreased

कोरोनाचा वाढता संसर्ग प्रत्येक क्षेत्रासाठी धोकेदायक ठरू लागला आहे. उद्योग आणि व्यवसायावरही कोरोनामुळे मोठा परिणाम झाला आहे. इतकेच काय तर, राज्य शासनाला मिळणारा महसूलही कोरोनामुळे थांबला आहे. गेल्या वर्षी मार्च-एप्रिलपासून कोरोनाचा शिरकाव झाला.

jalgaon rto office
जळगाव आरटीओ कार्यालय
author img

By

Published : May 19, 2021, 8:58 PM IST

Updated : May 19, 2021, 10:42 PM IST

जळगाव - राज्य शासनाला सर्वाधिक महसुली उत्पन्न मिळवून देणाऱ्या विभागांपैकी एक प्रमुख विभाग असलेल्या 'आरटीओ'ला कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. कोरोनामुळे अनेक निर्बंध असल्याने आरटीओला मिळणारा महसूल घटला आहे. जळगाव येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्या वार्षिक महसुली उत्पन्नाच्या बाबतीत विचार केला, तर जळगाव 'आरटीओ'चे महसुली उत्पन्न यावर्षी तब्बल 25 ते 30 टक्क्यांनी घटले आहे. एकूण उद्दिष्टाच्या तुलनेत सुमारे 40 ते 42 कोटी रुपयांचा फटका बसल्याने जळगाव आरटीओचे महसुली गणित बिघडले आहे.

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही याबाबत माहिती देताना

कोरोनाचा वाढता संसर्ग प्रत्येक क्षेत्रासाठी धोकेदायक ठरू लागला आहे. उद्योग आणि व्यवसायावरही कोरोनामुळे मोठा परिणाम झाला आहे. इतकेच काय तर, राज्य शासनाला मिळणारा महसूलही कोरोनामुळे थांबला आहे. गेल्या वर्षी मार्च-एप्रिलपासून कोरोनाचा शिरकाव झाला. त्यामुळे सर्वत्र लॉकडाऊन जाहीर झाला होता. या काळात उद्योगधंदे व व्यवसाय बंद होते. वाहन उत्पादक कंपन्याही मोठ्या संख्येने बंद होत्या. त्याचा परिणाम आरटीओ विभागाच्या महसुलावर झाल्याचे पाहायला मिळत आहे. आरटीओला नवीन वाहनांची नोंदणी, रोड टॅक्स, थकीत कर वसुली, पसंतीचे वाहन क्रमांक, वाहनांचे फिटनेस प्रमाणपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स नोंदणी व नूतनीकरण, वाहन मालकीचे बदल तसेच वायूवेग पथकांच्या होणाऱ्या विविध प्रकारच्या कारवायांतून महसूल मिळतो. गेल्या आर्थिक वर्षात कोरोनामुळे सर्वच प्रकारच्या कारवाया व वाहनांच्या नोंदणीत घट झालेली आहे. त्यामुळे आरटीओचे महसुली उत्पन्न घटले असून, यावर्षी महसुली उत्पन्नाची वार्षिक उद्दिष्टपूर्तीही होऊ शकत नाही, अशी स्थिती जळगाव आरटीओची आहे.

40 ते 42 कोटींचा फटका -

जळगाव आरटीओ विभागाला राज्य शासनाकडून सन 2020-21 या आर्थिक वर्षासाठी 144 कोटी 53 लाख रुपयांचे महसुली उत्पन्नाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र, कोरोनामुळे हे उद्दिष्ट साध्य होणार नाही, अशी स्थिती आहे. आज अखेरपर्यंत जळगाव आरटीओला विविध मार्गाने अवघा 105 कोटी रुपयांपर्यंतचा महसूल मिळाला आहे. महसुली उत्पन्नाच्या वार्षिक उद्दिष्टाचा विचार केला तर 40 ते 42 कोटी रुपयांचा फटका बसला आहे.

हेही वाचा - जळगाव : कडक निर्बंधांमुळे सराफ व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ; दुकाने उघडण्यास परवानगी देण्याची मागणी

गेल्यावर्षी प्रमाणेच यंदाही आहे उत्पन्नाची स्थिती -

आरटीओच्या महसुली उत्पन्नासंदर्भात 'ईटीव्ही भारत'शी बोलताना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्‍याम लोही यांनी सांगितले की, कोरोनामुळे मागील आर्थिक वर्षात महसुली उत्पन्नाचे उद्दिष्ट पूर्ण होऊ शकले नव्हते. यावर्षी देखील अशीच काहीशी परिस्थिती आहे. कोरोनामुळे अनेक अडचणी असल्याने महसुली उत्पन्नाचे उद्दिष्ट पूर्ण होऊ शकले नाही. आतापर्यंत आरटीओ कार्यालयाला 105 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. 40 ते 42 कोटी रुपयांचा फटका बसला आहे. कोरोनामुळे प्रयत्न करूनही यावर्षी महसुली उत्पन्नाचे उद्दिष्ट साध्य करू शकलो नाही, अशी माहितीही त्यांनी दिली.

रोड टॅक्समधून 85 कोटींचे उत्पन्न -

कोणतेही नवीन वाहन रस्त्यावर येण्यापूर्वी त्याची आरटीओ कार्यालयात नोंदणी होते. त्यावेळी वाहन मालकाकडून रोड टॅक्स वसूल केला जातो. रोड टॅक्सच्या स्वरूपात आरटीओ विभागाला 85 कोटी 12 लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे. याशिवाय ओव्हरलोड वाहनांवरील कारवाईतून 1 कोटी 85 लाख, अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या 1 हजार 135 वाहनांवर कारवाई करण्यात आली. त्यातून 27 लाख 84 हजार रुपयांचा दंड वसूल झाला. रिक्षांवर केलेल्या कारवाईतून 4 लाख 54 हजार, टॅक्सीच्या कारवाईतून 60 हजार, हेल्मेटच्या कारवाईतून 1 लाख 66 हजार तर पीयूसीच्या कारवाईतून यातून 2 लाख 61 हजार रुपयांचा दंड वसूल झाला आहे.

चॉईस नंबरच्या माध्यमातून मिळाला 3 कोटींचा महसूल -

अनेक नागरिक आपल्या नव्या वाहनाला पसंतीचा क्रमांक घेतात. या माध्यमातूनही आरटीओला चांगला महसूल मिळत असतो. चालू आर्थिक वर्षात जळगाव आरटीओ विभागाला चॉईस नंबरच्या माध्यमातून 2 कोटी 96 लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे.

हेही वाचा - जळगाव जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्याची पत्नी, मुलीसह आत्महत्या

Last Updated : May 19, 2021, 10:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.