ETV Bharat / state

रेशन मालाच्या काळाबाजारप्रकरणी रावेर पोलिसांनी आवळल्या तिघांच्या मुसक्या - रावेर न्यायालय

रेशन मालाच्या काळाबाजारप्रकरणी रावेर पोलिसांनी ३ संशयित आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. या आरोपींना सोमवारी दुपारी रावेर न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

रेशन मालाच्या काळाबाजारप्रकरणी रावेर पोलिसांनी आवळल्या तिघांच्या मुसक्या
author img

By

Published : Aug 20, 2019, 7:27 AM IST

Updated : Aug 20, 2019, 8:00 AM IST

जळगाव - जिल्ह्यातील रावेर शहरात उघडकीस आलेल्या रेशन मालाच्या काळाबाजारप्रकरणी रावेर पोलिसांनी ३ संशयित आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. विलास श्रावण चौधरी, योगेश सोपान पाटील (दोघे रा. रावेर) आणि सुनील रामकृष्ण नेवे (रा. चुंचाळे, ता. यावल) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. दरम्यान, अटक केलेला योगेश पाटील हा राष्ट्रवादी काँग्रेसचा पंचायत समिती सदस्य आहे.

रेशन मालाच्या काळाबाजारप्रकरणी रावेर पोलिसांनी आवळल्या तिघांच्या मुसक्या

रेशन मालाच्या काळाबाजारप्रकरणी अटक करण्यात आलेल्या तिघा आरोपींना सोमवारी दुपारी रावेर न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांना २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. रावेरमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील ४ गोदामांमध्ये टाकलेल्या धाडीत ट्रकसह ३८ लाखांचा रेशन माल जिल्हा पुरवठा विभागाने कारवाई करून सील केला होता.

याप्रकरणी रेशनमाफिया विलास चौधरी, सुनील नेवे तसेच पंचायत समिती सदस्य योगेश पाटील या तिघांविरुद्ध रावेर पोलिसांत जीवनावश्यक वस्तू कायद्याअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिघा आरोपीना पोलिसांनी रविवारी मध्यरात्री अटक करून सोमवारी रावेर न्यायालयात हजर केले होते. पोलिसांनी गुन्ह्याच्या तपासासाठी आरोपींना पोलीस कोठडी देण्याची मागणी केली होती. त्यामुळे न्यायालयाने तिघांची २ दिवसांसाठी पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.

१४६ रेशन दुकानांची चौकशी -

या प्रकरणानंतर रेशन मालाचा काळाबाजार होत असल्याचे स्पष्ट झाल्याने महसूल प्रशासन खडबडून जागे झाले आहे. तालुक्यातील १४६ रेशन दुकानांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. ७ वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक या कामी नेमण्यात आले आहे. या चौकशीत जर काही रेशन दुकानदार दोषी आढळले तर आरोपींची संख्या अजून वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी सील केलेल्या चारही गोदामातील माल जास्त वेळ पोलीस बंदोबस्तात ठेवता येणार नाही. त्यामुळे हा माल जिल्हास्तरावर पाठविण्याबाबत पत्र देणार असल्याचे या प्रकरणाच्या तपासाधिकाऱ्यांनी सांगितले.

Intro:जळगाव
जिल्ह्यातील रावेर शहरात उघडकीस आलेल्या रेशन मालाच्या काळाबाजारप्रकरणी रावेर पोलिसांनी तीन संशयित आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. विलास श्रावण चौधरी, योगेश सोपान पाटील (दोघे रा. रावेर) आणि सुनील रामकृष्ण नेवे (रा. चुंचाळे, ता. यावल) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. दरम्यान, अटक केलेला योगेश पाटील हा राष्ट्रवादी काँग्रेसचा पंचायत समिती सदस्य आहे.Body:रेशन मालाच्या काळाबाजारप्रकरणी अटक करण्यात आलेल्या तिघा आरोपींना सोमवारी दुपारी रावेर न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. रावेरमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील चार गोदामांमध्ये टाकलेल्या धाडीत ट्रकसह ३८ लाखांचा रेशन माल जिल्हा पुरवठा विभागाने कारवाई करून सील केला होता. याप्रकरणी रेशनमाफिया विलास चौधरी, सुनील नेवे तसेच पंचायत समिती सदस्य योगेश पाटील या तिघांविरुद्ध रावेर पोलिसांत जीवनावश्यक वस्तू कायद्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिघा आरोपीना पोलिसांनी रविवारी मध्यरात्री अटक करून सोमवारी रावेर न्यायालयात हजर केले होते. पोलिसांनी गुन्ह्याच्या तपासासाठी आरोपींना पोलीस कोठडी देण्याची मागणी केली होती. त्यामुळे न्यायालयाने तिघांची दोन दिवसांसाठी पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.Conclusion:१४६ रेशन दुकानांची चौकशी-

या प्रकरणानंतर रेशन मालाचा काळाबाजार होत असल्याचे स्पष्ट झाल्याने महसूल प्रशासन खडबडून जागे झाले आहे. तालुक्यातील १४६ रेशन दुकानांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. सात वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक या कामी नेमण्यात आले आहे. या चौकशीत जर काही रेशन दुकानदार दोषी आढळले तर आरोपींची संख्या अजून वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी सील केलेल्या चारही गोदामातील माल जास्त वेळ पोलीस बंदोबस्तात ठेवता येणार नाही. त्यामुळे हा माल जिल्हास्तरावर पाठविण्याबाबत पत्र देणार असल्याचे या प्रकरणाच्या तपासाधिकाऱ्यांनी सांगितले.
Last Updated : Aug 20, 2019, 8:00 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.