ETV Bharat / state

जळगाव : शेंदुर्णीत रथाची पाचपावली; परंपरा ठेवली अखंडित - Shendurni Rath festival News

कोरोना काळात सर्व सार्वजनिक कार्यक्रमांवर काही प्रमाणत निर्बंध लादून साजरे करण्याची परवानगी देण्यात येत आहे. याप्रमाणे आज जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथील २७६ वर्षांची परंपरा असलेल्या रथोत्सवात केवळ पाच पावले रथ ओढून रथोत्सव साजरा करण्यात आला.

rath festival shendoorni
शेंदुर्णीत रथाची पाचपावली
author img

By

Published : Nov 28, 2020, 8:38 PM IST

जळगाव - कोरोना काळात सर्व सार्वजनिक कार्यक्रमांवर काही प्रमाणत निर्बंध लादून साजरे करण्याची परवानगी देण्यात येत आहे. याप्रमाणे आज जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथील २७६ वर्षांची परंपरा असलेल्या रथोत्सवात केवळ पाच पावले रथ ओढून रथोत्सव साजरा करण्यात आला.

पाच जोडप्यांनी केले रथाचे पूजन

पाच जोडप्यांनी रथ असलेल्या जागी रथाचे पूजन करून रथ पाच पावले ओढले. यावेळी रथाला झेंडूच्या फुलांनी सजवण्यात आले होते. पालखी पूजनही करण्यात आले. अमृत खलसे, विजया खलसे, योगेश गुजर व वृषाली गुजर, पंडित जोहरे व रजनी जोहरे, तुषार भगत व योगिता भगत, अशा पाच जोडप्यांनी रथाचे मंत्रोपचारात पूजन केले. त्रिविक्रम मंदिर पुजारी तुषार भोपे यांनी मंत्रोपचार म्हटले.

साध्या पध्दतीने रथोत्सव साजरा

यावेळी कडोबा महाराज संस्थान गादी वारस हभप शांताराम भगत, हभप कडोबा माळी, निवृत्ती भगत, राजेंद्र पवार, माजी सरपंच सागरमल जैन, माजी उपसरपंच गोविंद अग्रवाल, माजी प.स. सदस्य सुधाकर बारी, पहुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल खताळ, उपपोलीस निरीक्षक देवडे, उप पोलीस निरीक्षक चेडे यांच्यासह हभप रामेश्वर महाराज व भजनी मंडळ, भालदार चोपदार गजानन चव्हाण, विजय सोनार व भक्तगण उपस्थित होते.

उत्सवात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या नियमांचे पालन करण्यात आले. तसेच, सोशल डिस्टन्सिंग व मास्कचा वापर करण्यासाठीचे आवाहन अभंग रुपात कवी वसंत जावळे यांनी बॅनरद्वारे केले. गेल्या पावणे तीनशेहून अधिक काळापासून येथील रथोत्सव परंपरा अखंडितपणे सुरू आहे. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी रथोत्सव मोठ्या प्रमाणत साजरा न करता केवळ मोजक्या लोकांमध्ये साजरा करण्यात आला. यावर्षी रथोत्सव पहावयास न मिळाल्याने भाविकांनी नाराजी व्यक्त केली.

हेही वाचा - जळगावचे सुपुत्र यश देशमुख यांचे पार्थिव आज येणार मूळगावी; लष्करी इतमामात होणार अंत्यसंस्कार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.