ETV Bharat / state

भुसावळमधील 'ऑक्सिजन ग्रुप' ठरतोय आरोग्य यंत्रणेसाठी वरदान - जळगाव लेटेस्ट न्यूज

प्राध्यापक मित्रांनी आरोग्य यंत्रणेला मदत करण्यासाठी सहमती दर्शवली. या नंतर सर्वांच्या सहमतीने सोशल मीडियावर 'ऑक्सिजन ग्रुप' नावाचा एक ग्रुप तयार करण्यात आला. या ग्रुपमधील प्रत्येकाला आपल्याला शक्‍य ती आर्थिक मदत करण्याचे आवाहन करण्यात आले. यात प्रा. डॉ. जयेंद्र लेकुरवाळे यांच्यासह भूमी अभिलेख विभागात वरिष्ठ पदावर कार्यरत असलेल्या त्यांच्या पत्नी शीतल लेकुरवाळे यांनी स्वतः मदतीची पहिली रक्कम जमा केली. त्यानंतर सर्वांनी मदत केल्याने एकाच दिवसात 50 हजार रुपयांची आर्थिक मदत गोळा झाली.

'ऑक्सिजन ग्रुप' ठरतोय आरोग्य यंत्रणेसाठी वरदान

author img

By

Published : May 3, 2021, 9:51 PM IST

जळगाव - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता अधिक आहे. त्यामुळे कोरोनाची लागण होताच रुग्ण अत्यवस्थ होत आहेत. अशा परिस्थितीत संबंधित रुग्णाला ऑक्सिजनची तातडीने गरज भासत आहे. दररोज हजारोंच्या संख्येने नवे बाधित रुग्ण समोर येत असल्याने आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणावर ताण पडत आहे. रुग्णांना आरोग्य सुविधा पुरवताना अक्षरशः कस लागत आहे. याच परिस्थितीचे गांभीर्य ठेऊन जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरातील काही प्राध्यापक मंडळ आरोग्य यंत्रणेच्या मदतीला धावली आहे. या प्राध्यापकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून 'ऑक्सिजन ग्रुप' तयार केला. या ग्रुपद्वारे लोकसहभागातून आर्थिक मदत उभी केली. आता त्या माध्यमातून आरोग्य यंत्रणेला ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. आणीबाणीच्या परिस्थितीत गरजू रुग्णांना ऑक्सिजन उपलब्ध होत असल्याने अनेकांचे प्राण वाचत आहेत. पाहता पाहता ऑक्सिजन ग्रुपचे कार्य वेगाने विस्तारत आहे.

जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत चालला आहे. दररोज हजारांच्या घरात नवे बाधित रुग्ण समोर येत आहेत. कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांची रोजची आकडेवारी देखील काळजाचा ठोका चुकवणारी आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने रुग्णांना ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन वेळेवर उपलब्ध होत नाही आहे. त्यामुळे रुग्णांचे नातेवाईक सैरभैर होत आहेत. कोरोनाच्या लढ्यात आरोग्य यंत्रणेची दमछाक होत असल्याने राज्य शासनाने सेवाभावी संस्था व संघटनांना मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार काही संस्थांनी कोविड केअर सेंटरसाठी जागा दिली, काही संस्था कोविड केअर सेंटर चालवताय, काही जण रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना जेवण देत आहे. भुसावळातील कोरोनाची परिस्थिती देखील हाताबाहेर जात असल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे शहरातील काही प्राध्यापक तसेच उद्योजक मंडळी आरोग्य यंत्रणेच्या मदतीसाठी पुढे सरसावली आहे.

'ऑक्सिजन ग्रुप' ठरतोय आरोग्य यंत्रणेसाठी वरदान
अशी पुढे आली संकल्पना
भुसावळ शहरातील रहिवासी असलेले प्रा. डॉ. जयेंद्र लेकुरवाळे हे जळगावातील डॉ. जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयात सेवारत आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, रेमडेसिवीर व ऑक्सिजनची उद्भवलेली टंचाई, त्यामुळे रुग्णांचे होणारे हाल आणि एकंदरीतच कोरोनाच्या लढ्यात आरोग्य यंत्रणेची होणारी तारेवरची कसरत पाहून प्रा. डॉ. लेकुरवाळे यांच्यात मनात, लोकसहभागातून काही तरी मदत आरोग्य यंत्रणेला करता येऊ शकते का? असा विचार आला. त्यांनी याबाबत तत्काळ सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या कल्पनेला वाट करून दिली. त्यांच्या कल्पनेला सहकारी प्राध्यापक मित्रांनी लगेचच पाठबळ देत ही कल्पना प्रत्यक्षात अंमलात आणण्याचा निर्णय घेतला.
ऑक्सिजन ग्रुप अस्तित्त्वात आला आणि दिवसभरात जमले 50 हजार!
प्रा. डॉ. जयेंद्र लेकुरवाळे यांच्या सहकारी प्राध्यापक मित्रांनी आरोग्य यंत्रणेला मदत करण्यासाठी सहमती दर्शवली. या नंतर सर्वांच्या सहमतीने सोशल मीडियावर 'ऑक्सिजन ग्रुप' नावाचा एक ग्रुप तयार करण्यात आला. या ग्रुपमधील प्रत्येकाला आपल्याला शक्‍य ती आर्थिक मदत करण्याचे आवाहन करण्यात आले. यात प्रा. डॉ. जयेंद्र लेकुरवाळे यांच्यासह भूमी अभिलेख विभागात वरिष्ठ पदावर कार्यरत असलेल्या त्यांच्या पत्नी शीतल लेकुरवाळे यांनी स्वतः मदतीची पहिली रक्कम जमा केली. त्यानंतर सर्वांनी मदत केल्याने एकाच दिवसात 50 हजार रुपयांची आर्थिक मदत गोळा झाली. अवघ्या आठवडाभरात या ऑक्सिजन ग्रुपला समाजभान असलेले अनेक दाते स्वेच्छेने जुळले आहेत.
असे चालते ऑक्सिजन ग्रुपचे काम
ऑक्सिजन ग्रुपच्या माध्यमातून आतापर्यंत लोकसहभागातून जेवढी रक्कम जमली आहे. त्या रकमेतून 15 मिनिट पोर्टेबल ऑक्सिजन सिलिंडर खरेदी करण्यात आले आहेत. हे सिलिंडर ऑक्सिजन रिफिलिंग प्लांटवरून भरून घेतले जातात. त्यानंतर ते सिलिंडर शहरातील विविध भागात सेवाभावी कार्य करणाऱ्या डॉक्टरांकडे ठेवले जातात. त्या ठिकाणाहून गरजू रुग्णांसाठी हे सिलिंडर मोफत पुरवले जातात. अर्थात एखाद्या दवाखान्यात ऑक्सिजनचा बेड मिळाला नाही, म्हणून रुग्णाला नकार मिळाला. त्या ठिकाणी ऑक्सिजन ग्रुप मदतीला धावून जातो. आतापर्यंत अनेक रुग्णांना ऑक्सिजन ग्रुपची मदत मिळाली आहे. वेळेवर ऑक्सिजन उपलब्ध झाल्याने त्यांचा जीव वाचला आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने ऑक्सिजन ग्रुपच्या कार्याचे कौतुक केले जात आहे. 'कोरोना रुग्णांच्या मदतीसह आरोग्य यंत्रणेला पाठबळ म्हणून आम्ही खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न केला आहे. या संकल्पनेतूनच ऑक्सिजन ग्रुप अस्तित्त्वात आला आहे'. भुसावळ शहरापासून सुरू झालेले कार्य यापुढे जिल्हाभर विस्तारण्याचा मनोदय असल्याचे प्रा. डॉ. जयेंद्र लेकुरवाळे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले आहे.
लोकसहभागाची साद पोहचली सातासमुद्रापार
भुसावळातील प्राध्यापक मित्रांनी कोरोनाच्या रुग्णांना मदत करण्यासाठी दिलेली साद सोशल मीडियामुळे सातासमुद्रापार पोहचली आहे. त्यामुळे मातृभूमीशी नाळ जुळलेल्या परदेशातील मित्रांनी देखील सढळ हाताने मदत देऊ केली आहे. अमेरिका, कॅनडा अशा देशात नोकरी करणाऱ्या मित्रांनी लगेचच मदत केली आहे. एवढेच नव्हे तर मुंबई, पुण्यासारख्या महानगरात कार्यरत भुसावळातील नोकरदार आणि उद्योजकांनी देखील मदत दिली आहे. त्यामुळे ऑक्सिजन ग्रुप विस्तारण्यास मदत झाली आहे.हेही वाचा -कोरोनाची दुसरी लाट थोपविण्याकरता लॉकडाऊनचा विचार करा - सर्वोच्च न्यायालय

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.