ETV Bharat / state

ग्रामपंचायत निवडणूक: रावेरात १८३ जणांवर पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई - raver police action

जळगावमधील ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस ठाण्यांतर्गत निवडणूक होणाऱ्या १६ गावांमधील १८३ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. गावांमध्ये शांतता व कायदा सुव्यवस्था टिकून राहावी यासाठी पोलिस प्रशासनाने खबरदारी घेतली आहे.

रावेर ग्रामपंचायत निवडणूक
jalgao police preventive action
author img

By

Published : Dec 22, 2020, 3:55 PM IST

जळगाव - बुधवारपासून ग्रामपंचायतींच्या नामनिर्देशनाला सुरुवात होत आहे. निवडणूक होणाऱ्या गावांमध्ये शांतता व कायदा सुव्यवस्था टिकून राहावी यासाठी पोलिस प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. रावेर पोलिस ठाण्यांतर्गत निवडणूक होणाऱ्या १६ गावांमधील १८३ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे.
कारवाई प्रक्रिया सुरु

तालुक्यातील एकूण ४८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया बुधवारपासून सुरु होत आहे. निवडणूक काळात संबंधित गावांमध्ये शांतता कायम रहावी, कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याची खबरदारी पोलिस प्रशासनाने घेतली आहे. रावेर तालुक्यात रावेर , निंभोरा व सावदा या तीन पोलिस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रातील निवडणूक होणाऱ्या गावांमध्ये उपाययोजना आखल्या जात आहेत. रावेर पोलिस ठाण्याअंतर्गत २१ गावांमध्ये निवडणूक होत आहे. त्यामुळे पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी गावातील १८३ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.

गावनिहाय कारवाई आकडेवारी
गावातील उपद्रवींवर प्रतिबंधात्मक कारवाईला सुरुवात झाली आहे. सर्वाधिक कारवाई रसलपूर येथील ८५ जणांविरुद्ध होत असून पाडला येथे १४, वाघोड -२०, केऱ्हाळा बुद्रूक -१८, शिंदखेडा -९, खिरोदा प्र. रावेर- ८, मोरगाव- ७, चोरवड- ५, अहिरवाडी व भोकरी प्रत्येकी- ४, रमजीपूर-३, कर्जोद -२, मोहगन, खानापूर, अजनाड, मुंजालवाडी या गावातील प्रत्येकी एकाविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. निंभोरा व सावदा पोलिस ठाण्याअंतर्गतही अशी कारवाई केली जाणार आहे.

हेही वाचा - कोरोनाच्या नियमांचा भंग केल्याप्रकरणी ३४ जणांवर गुन्हा दाखल; मोठ्या सेलिब्रिटींचा समावेश

हेही वाचा - मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी पूर्वेश व विहंग सरनाईकांना पुन्हा ईडीचा समन्स

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.