ETV Bharat / state

जळगाव जिल्ह्यात प्रेमीयुगुलाची गळफास घेऊन आत्महत्या, त्याच दिवशी होता साखरपुडा - suicide breaking news

यावल तालुक्यातील परसाडे गावात एका प्रेमीयुगुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आज दुपारी घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. घटनेतील मृत तरुणाचा आज साखरपुडा होणार होता.

प्रेमीयुगुलाची आत्महत्या
प्रेमीयुगुलाची आत्महत्या
author img

By

Published : Apr 13, 2021, 10:27 PM IST

Updated : Apr 14, 2021, 2:53 PM IST

जळगाव : यावल तालुक्यातील परसाडे गावात एका प्रेमीयुगुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आज दुपारी घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. 19 वर्षीय शाहरूख बाबू तडवी व 22 वर्षीय मीना शावखाँ तडवी अशी आत्महत्या करणाऱ्या प्रेमीयुगुलाची नावे असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

सुसाईड

घटनेसंदर्भात ग्रामस्थांनी दिलेली माहिती अशी की, शाहरूख तडवी व मीना तडवी यांच्यात प्रेमसंबंध होते. दोघांनी आज दुपारच्या सुमारास वड्री-परसाडे रस्त्यावरील एका शेतात निंबाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही बाब रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांच्या लक्षात आली. ही घटना समोर आल्यावर परसाडे गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेबाबत वड्री गावाचे पोलीस पाटील इब्राहीम तडवी यांनी यावल पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. नंतर दोघांचे मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

तरुणाचा आज होता साखरपुडा?
दरम्यान, या घटनेतील मृत तरुण शाहरूख तडवी याचा विवाह दुसऱ्या एका मुलीशी निश्चित झालेला होता. त्याचा आज साखरपुडा होणार होता. मात्र, साखरपुडा होण्यापूर्वी त्याने आत्महत्या केली, अशी ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे. मात्र, या चर्चेला पोलिसांनी दुजोरा दिला नाही. मृत दोघांच्या प्रेमसंबंधाला विरोध असावा, त्यातून त्यांनी टोकाचे पाऊल उचलले असावे, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

हेही वाचा : उद्या संध्याकाळपासून महाराष्ट्रात 144 कलम लागू, वाचा सविस्तर, काय सुरू काय बंद...

Last Updated : Apr 14, 2021, 2:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.