ETV Bharat / state

'बर्ड फ्ल्यू' जळगाव जिल्ह्याच्या सीमेवर; 12 लाख पक्ष्यांचे पोल्ट्री फार्म निगराणीखाली - जळगाव बर्ड फ्ल्यू लेटेस्ट न्यूज

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर आता राज्यात बर्ड फ्ल्यूच्या संकटाने डोके वर काढले आहे. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर येथे तर बर्ड फ्ल्यूने कहर केला आहे. याठिकाणी पोल्ट्री फार्ममधील तब्बल 9 लाख पक्ष्यांचे किलिंग ऑपरेशन राबवले जात आहे. धुळे जिल्ह्यातील मेहरगाव येथेही बर्ड फ्ल्यूचे प्रकरण समोर आले आहे. बर्ड फ्ल्यूचा विषाणू आपल्या जिल्ह्यातही दाखल होऊ शकतो, ही शक्यता गृहीत धरून जळगाव जिल्हा प्रशासनाने विषाणू येण्यापूर्वीच आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत.

जळगाव जिल्हाधिकारी अभिजित राऊत न्यूज
जळगाव जिल्हाधिकारी अभिजित राऊत न्यूज
author img

By

Published : Feb 9, 2021, 12:07 PM IST

जळगाव - नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यासह धुळे जिल्ह्यातही बर्ड फ्ल्यूचा शिरकाव झाला आहे. बर्ड फ्ल्यू जिल्ह्याच्या सीमेवर येऊन ठेपल्याने जळगाव जिल्हा प्रशासन दक्ष झाले आहे. जिल्ह्यातील 12 लाख पक्षी असलेले पोल्ट्री फार्म निगराणीखाली आहेत. सुदैवाने अद्याप जिल्ह्यात एकाही ठिकाणी बर्ड फ्ल्यूचे प्रकरण समोर आलेले नाही. असे असले तरी, पशुसंवर्धन विभागाला आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी देखील अफवांवर विश्वास न ठेवता दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.

जळगाव : 'बर्ड फ्ल्यू'च्या पार्श्वभूमीवर 12 लाख पक्ष्यांचे पोल्ट्री फार्म निगराणीखाली
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर आता राज्यात बर्ड फ्ल्यूच्या संकटाने डोके वर काढले आहे. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर येथे तर बर्ड फ्ल्यूने कहर केला आहे. याठिकाणी पोल्ट्री फार्ममधील तब्बल 9 लाख पक्ष्यांचे किलिंग ऑपरेशन राबवले जात आहे. धुळे जिल्ह्यातील मेहरगाव येथेही बर्ड फ्ल्यूचे प्रकरण समोर आले आहे. बर्ड फ्ल्यूचा विषाणू आपल्या जिल्ह्यातही दाखल होऊ शकतो, ही शक्यता गृहीत धरून जळगाव जिल्हा प्रशासनाने विषाणू येण्यापूर्वीच आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत, असेही जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सांगितले.

हेही वाचा - नवापूर शहरात चिकन, अंडी विक्रीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांची पाहणी

जिल्ह्यातील चार नमुने निगेटिव्ह

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, भडगाव तसेच पाचोरा या तालुक्यातील काही पोल्ट्री फार्ममधील पक्षी मरण पावले होते. पक्ष्यांच्या मृत्यूंचे कारण मात्र, अस्पष्ट होते. राज्यात बर्ड फ्ल्यूची काही प्रकरणे समोर आल्याने या पक्ष्यांच्या मृत्यूमागे बर्ड फ्ल्यू तर नाही ना? या भीतीपोटी तसेच, पक्ष्यांच्या मृत्यूचे नेमके कारण समोर यावे, यासाठी जिल्ह्यातील चार ठिकाणचे नमुने तपासणीसाठी भोपाळच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. मात्र, सुदैवाने हे चारही नमुने निगेटिव्ह आले असून, प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. आता सद्यस्थितीत जिल्ह्यात एकाही ठिकाणी पक्ष्यांच्या मृत्यूचे प्रकरण नाही. तरीही जिल्हा प्रशासन परिस्थितीवर नजर ठेवून आहे.

पोल्ट्री फार्म चालकांना कडक इशारा

बर्ड फ्ल्यूच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने पोल्ट्री फार्म चालकांना कडक शब्दांत सतर्कतेचा इशारा दिला आहे. कोणत्याही परिस्थितीत जिल्ह्यातून बाहेर आणि बाहेरील जिल्ह्यातून आपल्याकडे पक्ष्यांची वाहतूक करू नये, पोल्ट्री फार्ममध्ये जर पक्ष्यांच्या मृत्यूचे प्रमाण अचानकपणे वाढले तर त्याची माहिती तत्काळ पशुसंवर्धन विभाग आणि जिल्हा प्रशासनाला द्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

नागरिकांना खबरदारीचे आवाहन

बर्ड फ्ल्यू संदर्भात जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी नागरिकांना खबरदारीचे आवाहन केले आहे. नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत अफवांवर विश्वास ठेवू नये, बर्ड फ्ल्यू हा इतर विषाणूंच्या तुलनेत मानवी आरोग्यावर कमी प्रमाणात परिणाम करतो. म्हणून घाबरून जाण्याची गरज नाही. व्यवस्थित शिजवलेले मांस व अंडी खाल्ल्याने काहीही होत नाही. फक्त कच्चे मांस व अंडी हाताळताना तोंडाला मास्क असावे, ते हाताळल्यानंतर हात स्वच्छ धुवावेत, असे आवाहन देखील जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले.

हेही वाचा - जिल्ह्यात सर्वाधिक पोल्ट्री फार्म असल्याने सतर्कता बाळगा - जिल्हाधिकारी मांढरे

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.