ETV Bharat / state

आरएसएस-भाजप ब्लॅकमेलर; प्रकाश आंबेडकरांचा जळगावात घणाघात - प्रकाश आंबेडकर

मोदींचा खून करण्याच्या कटामध्ये प्रकाश आंबेडकर होते, असा चुकीचा प्रचार करण्यात आला. असे असले तर मला पहिल्यांदा पकडा. २ महिने जेलमध्ये आराम करणार. मोदींचे सरकार गेल्यानंतर खोट्या बातम्या पसरवणाऱ्या पोलिसवाल्यांनाही चौकात टांगून फटके मारल्याशिवाय राहणार नसल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

जळगावात प्रचार सभेदरम्यान बोलताना अध्यक्ष प्रकाश आंबेडकर
author img

By

Published : Mar 22, 2019, 8:20 PM IST

Updated : Mar 22, 2019, 8:44 PM IST

जळगाव - आरएसएस आणि भाजप दोन्ही ब्लॅकमेलर आहेत. त्यांनी मलाही ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला होता, अशी घणाघाती टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली. वंचित बहुजन आघाडीच्यावतीने शुक्रवारी दुपारी जळगावात लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांसाठी जाहीर प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत ते बोलत होते.

जळगावात प्रचार सभेदरम्यान बोलताना अध्यक्ष प्रकाश आंबेडकर

मोदींचा खून करण्याच्या कटामध्ये प्रकाश आंबेडकर होते, असा चुकीचा प्रचार करण्यात आला. असे असले तर मला पहिल्यांदा पकडा. २ महिने तुरुंगामध्ये आराम करणार. मोदींचे सरकार गेल्यानंतर खोट्या बातम्या पसरवणाऱ्या पोलिसवाल्यांनाही चौकात टांगून फटके मारल्याशिवाय राहणार नसल्याचे ते म्हणाले.

जे सरकार नितीमत्तेचे नाही आणि पंतप्रधानांना मारणार म्हणून सहानुभूती मिळवायची, अशा राजकारणाला मूठमाती द्या. वंचित बहुजन आघाडीच्या बाजूने उभे रहा. क्रिकेटमध्ये जसे मॅच फिक्सिंग होते. अगदी तशाच प्रकारे मोदींनी आपला विरोधक फिक्स केला आहे. राहुल गांधी विरोधक असून माझी लढाई राहुल गांधीबरोबर आहे, अशा स्वप्नांच्या जगात मोदी वावरत आहेत. मात्र, वास्तवात वातावरण त्यांच्या विरोधात आहे. राज्याराज्यात विरोधकांची लाट आहे. मोदींचा सामना हा काँग्रेससोबत नाहीतर राज्यांच्या प्रादेशिक पक्षांबरोबर आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी आज कुठेच नाहीत. आपला सामना हा सेना-भाजपशी आहे, असेही ते म्हणाले.

आरएसएस-भाजप हे गोळ्या चालवणारे -
गांधी विचारांचे असल्याचे काँग्रेसवाले म्हणतात. मात्र, गांधींच्या पुतळ्यावर गोळ्या झाडण्यात आल्या त्यावेळी एकही काँग्रेसवाला निषेध करताना दिसला नाही. आरएसएस-भाजप हे गोळ्या चालवणारे आहेत. गांधी शांततेच्या मार्गाने जाणारे होते. पण काँग्रेस आज शांततेचा मार्ग टिकवू शकली नाही, अशी टीकाही आंबेडकर यांनी केली.

Intro:जळगाव
आरएसएस आणि भाजप ही ब्लॅकमेलरची पार्टी आहे. त्यांनी मलाही ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला होता. मोदींचा खून करण्याचा जो कट होता; त्यात प्रकाश आंबेडकर होते, असा चुकीचा प्रचार करण्यात आला. असे असेल तर मला पहिल्यांदा पकडा. दोन महिने जेलमध्ये आराम तरी करेल. मोदींना एकच सांगतो, तुमचे सरकार जाऊ द्या. ज्या पोलिसवाल्यांनी अशा बातम्या सोडल्या त्या पोलिसवाल्यांनाही सांगतो, तुम्हाला चौकात टांगून फटके मारल्याशिवाय राहणार नाही, अशी घणाघाती टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी जळगावात केली.

Body:वंचित बहुजन आघाडीच्यावतीने शुक्रवारी दुपारी जळगावात लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांसाठी जाहीर प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, जे सरकार नितीमत्तेचे नाही आणि पंतप्रधानांना मारणार म्हणून सहानुभूती मिळवायची, असे जे राजकारण सुरू आहे त्याला मूठमाती द्या. वंचित बहुजन आघाडीच्या बाजूने उभे रहा. क्रिकेटमध्ये जसे मॅच फिक्सिंग होते, तसे मोदींनी आपला विरोधक फिक्स केला आहे. राहुल गांधी आपला विरोधक असून माझी लढाई राहुल गांधीबरोबर आहे, अशा स्वप्नाच्या जगात ते वावरत आहेत. मात्र, वास्तव्यात वातावरण तुमच्या विरोधात आहे. राज्याराज्यात विरोधकांची लाट आहे. मोदींचा सामना हा काँग्रेससोबत नाही तर राज्यांच्या प्रादेशिक पक्षांबरोबर आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी आज कुठेच नाहीत. आपला सामना हा सेना-भाजपशी आहे, असेही ते म्हणाले.

आरएसएस-भाजप हे गोळ्या चालवणारे-

आपण गांधी विचारांचे आहोत, असे काँग्रेसवाले म्हणतात. पण गांधींच्या पुतळ्यावर गोळ्या झाडण्यात आल्या तेव्हा एकही काँग्रेसवाला मला निषेध करताना दिसला नाही. आरएसएस-भाजप हे गोळ्या चालवणारे आहेत. गांधी हे शांततेच्या मार्गाने जाणारे होते. पण काँग्रेस आज शांततेचा मार्ग टिकवू शकली नाही, अशी टीकाही आंबेडकर यांनी केली.

Conclusion:नवा मनुवाद गाडा-

आम्ही सत्ता मागतोय का तर, इथली कॉन्ट्रॅक्ट पध्दत आम्हाला संपवायची आहे. कॉन्ट्रॅक्ट घेणाऱ्याला 20 हजार रुपये दिले जातात तर कॉन्ट्रॅक्टर जो मजूर कामाला ठेवतो त्याच्याकडून 4 हजार रुपयात काम करून घेतले जाते. हा नवा मनुवाद आलाय. या मनुवादाला आधी भारताच्या मातीत पहिल्यांदा बाबासाहेबांनी गाडला. आता पुन्हा तुम्हा-आम्हाला गाडायचे आहे. तुम्हाला मी आवाहन करतो कोणाला ए टीम करायची असेल कोणाला बी टीम मानायची असेल ती माना, आम्हाला काही फरक पडत नाही. कारण हत्ती जेव्हा चालतो तेव्हा तो कुत्र्यांचा कधीच विचार करत नाही, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

या सभेला जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार अंजली बाविस्कर, रावेर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नितीन कांडेलकर यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे नेतेमंडळी उपस्थित होते.
Last Updated : Mar 22, 2019, 8:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.