ETV Bharat / state

हिम्मत असेल तर ३७० अन् तिहेरी तलाक मागे घेऊन दाखवा, मोदींचे विरोधकांना आव्हान

प्रधान नरेंद्र मोदी यांची राज्यातील पहिली सभा जळगावात पार पडली. यावेळी विरोधकांवर टीका करत मोदींनी घोषणांची खैरात केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी
author img

By

Published : Oct 13, 2019, 12:52 PM IST

Updated : Oct 13, 2019, 3:45 PM IST

जळगाव - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जळगावमध्ये पहिली प्रचारसभा घेत विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुकले. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत मोदी यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. तुमच्यात हिंमत असेल तर कलम ३७०, ३५ ए आणि तिहेरी तलाक निर्णय बदलण्याची जाहिरनाम्यात घोषणा करा, आव्हान यावेळी मोदींनी विरोधकांना दिले. सोबतच घोषणांची खैरात केल्याचेही पाहायला मिळाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीश महाजनही उपस्थित होते.

देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे -

  • ही निवडणूक प्रतिष्ठेची पण कोणाशी लढायचे ते दिसत नाही
  • युतीच्या वादळात काँग्रेस आणि राष्ट्रवादी नेस्तनाबूत होणार
  • पवारांच्या पक्षाची तर अवस्था वाईट
  • पवारांना हातवारे करणे शोभत नाही
  • शेतकऱ्यांना मदतीचा हात सरकारने दिला, उत्तर महाराष्ट्राचे चित्र बदलणार. मेगा रिचार्ज स्कीम कार्यान्वित करून पाण्याची उपलब्धता करू, लाखो हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणू, प्रत्येक शेतीला पाणी देऊ, अनुशेष राहू देणार नाही
  • जळगाव महापालिका रसातळाला गेली होती, पण आम्ही मोठा निधी देऊन जळगावचे चित्र बदलले.
  • बंडखोरांकडे लक्ष देऊ नका, त्यांना कोणाचाही आशीर्वाद नाही, अधिकृत उमेदवार निवडून आणा

पंतप्रधान मोदींच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे -

  • कसं काय जळगाव, मी बघतो आहे, जळगाव महाजनादेशासाठी सज्ज झाले आहे, तुम्ही पण देणार ना महाजनादेश
  • मराठीतून केली भाषणाची सुरुवात
  • जळगावची जनसभा अभूतपूर्व आहे
  • येणाऱ्या पाच वर्षात महायुती सरकारसाठी पुन्हा एकदा समर्थन मागण्यासाठी मी आलोय, पण फक्त एवढा उद्देश नाही
  • गेल्या पाच वर्षात आम्हाला जो पाठींबा दिला, त्याचे आभार मानायला आलोय
  • नव्या भारताच्या निर्माणासाठी तुम्ही चार महिन्यांपूर्वी तुम्ही आम्हाला कौल दिला
  • नव्या भारताचा नवा जोश जगाला दिसतोय आता, पहिले असे होत नव्हते, हे मोदींमुळे होत नाही तर तुम्ही दिलेल्या मतांमुळे होत आहे, आज जगाला नव्या भारताचा जलवा आहे, तो केवळ 130 कोटी भारतीयांमुळे, तुम्ही जे भरभरून मतदान केले, त्यामुळे जगात भारताचा गौरव होत आहे.
  • विधानसभा निवडणुकीच्या मतदानात महिला पुरुषांच्या पुढे जायला हव्यात, चला मुकाबला होऊन जाऊद्या
  • जनतेच्या जनादेशामुळे भारताच्या प्रतिमेला चार चांद लागले, म्हणून जगातील प्रत्येक देश भारतासोबत यायला तयार आहे, नवा भारत आव्हानांना सामोरे जाण्याची धमक ठेवतो.
  • 5 ऑगस्टला भाजप सरकारने अभूतपूर्व निर्णय घेतला, ज्या विषयी आधी विचार करणे पण अशक्य होतं, 70 वर्षे होऊनही जम्मू काश्मीर आणि लडाखमध्ये तेथील लोकांना त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवले होते, आधी फक्त तेथे दहशतवादाचा विस्तार होत होता, जम्मू काश्मीर आणि लडाख आमच्यासाठी फक्त जमिनीचा तुकडा नाही, तर ते देशाचे मस्तक आहे, 40 वर्षांपर्यंत जी असामान्य परिस्थिती होती तिला सामान्य करण्यात चार महिने पण लागणार नाहीत, पण आज दुर्दैवाने सांगावे लागते आहे की काही राजकीय पक्ष राजकारण करत आहेत, महाराष्ट्रात पण ते आज तुमची मते मागायला येत आहेत, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची वक्तव्ये बघा, त्यांच्या विचार, गोष्टींमध्ये भारत कमी आणि शेजारील देशाची भाषा बोलताना दिसत आहेत, ते विविध कारण देऊन गोंधळात टाकत आहेत
  • मी विरोधकांना आव्हान देतो की तुमच्यात हिंमत असेल तर स्पष्ट बहुमत घेऊन समोर या, तुमच्यात हिंमत असेल तर या निवडणुकीत आणि पुढच्या निवडणुकीमध्येही जाहीरनाम्यात, कलम 370, 35 अ हे परत आणू ही घोषणा करा, 5 ऑगस्टच्या निर्णयाला विरोध करून दाखवा, मगरीचे अश्रू ढाळु नका, भारत हा निर्णय मागे घेऊन देणार नाही, हा निर्णय म्हणजे भाजपच्या संस्कारांचा आरसा आहे, आमचं काम स्पष्ट आहे,
  • तिहेरी तलाक संदर्भात काँग्रेससह अनेक पक्षांनी कायद्याच्या मार्गात अडथळे आणले, पण आम्ही मुस्लीम समाजातील महिलांना जे आश्वासन दिले होते ते पूर्ण केलेच, विरोधकांमध्ये जर हिंमत असेल तर ही पण घोषणा करा की तिहेरी तलाक कायदा मोडीत काढू
  • मुस्लीम समाजातील पुरुष पतीच्या नात्याने नाही तर पिता आणि भाऊच्या नात्याने या निर्णयाला समर्थन देतात, अजून देशाला दुसरं काय हवं
  • पाच वर्षांपूर्वी मी दिलेले आश्वासन पाळले की नाही, स्थिर सरकार, पारदर्शक सरकार, जोशाचे सरकार दिले की नाही?
  • आधी तर अशा ग्रहांची सावली होती की काय सांगू, 5 वर्षांत भ्रष्टाचार कमी झाला, राज्याला पुढे नेण्याचे काम सरकारने केले, मूलभूत सुविधा तसेच शिक्षण, कृषी क्षेत्रात राज्य अग्रेसर झाले
  • थकलेले नेते राज्याची स्थिती बदलू शकत नाही, युवकांचे प्रश्न सोडवू शकत नाहीत, आमचे नेते बघा, प्रत्येकजण नव्या दमाचा, नव्या जोमाचा आहे
  • जे आपल्या पक्षाला मोठं करू शकत नाही ते तुमच्या मुलांना काय मोठं करतील
  • आज महाराष्ट्रातील 10 लाख गरीब कुटुंब हक्काच्या घरात आहेत, येणाऱ्या काही दिवसात अजून 10 लाख कुटुंबांना हक्काचे पक्के घर मिळणार, 2022 पर्यंत हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही जोमाने कामाला लागलो आहोत, म्हणून तुमचा जनादेश मागण्यासाठी आम्ही सर्व एकत्र आलो आहोत
  • भाजपच्या जाहिरनाम्यातील अनेक बाबी सत्यात उतरल्या तर अनेक योजनांची अंमलबजावणी होत आहे
  • ज्यांच्या आधारमध्ये नावात चूक आहे, पत्ता बदललेला आहे अशा लाभार्थ्यांना देखील योजनांचा लाभ देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे
  • 18 लाख शेतकरी शेतकरी पेन्शन योजनेचा लाभ घेताय
  • आम्ही पाण्याचा संकल्प केला आहे, साडेतीन लाख कोटी रुपये या कामी खर्च होतील, महाराष्ट्राला या कामाचा खूप फायदा होईल, जल बचतीसाठी जे प्रयत्न होत आहेत, त्यांना तांत्रिकदृष्ट्या जोडले जाईल
  • पाणी फक्त शेतीसाठी नाही तर उद्योगांसाठीही महत्त्वाचे आहे, महायुतीच्या सरकारने ही समस्या सोडविण्याचा निर्णय घेतला आहे.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Oct 13, 2019, 3:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.