जळगाव - जिल्ह्यातील पहिल्या काेराेनामुक्त झालेल्या रुग्णांच्या प्लाझ्मा दानाला एक महिना तीन दिवस उलटला आहे. त्यानंतर दाेन दिवसांपूर्वी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्लाझ्माच्या पहिल्या क्लिनिकल ट्रायलला सुरुवात झाली. यात ४८ वर्षीय गंभीर काेराेना रुग्णांवर ही ट्रायल घेण्यात येत आहे.
राज्यात १२ जुलै राेजी १६ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्लाझ्मा संकलन झाले. त्याच दिवशी जळगाव जिल्ह्यातील पहिल्या काेराेना मुक्त 48 वर्षीय व्यक्तीने प्लाझ्मा दान केले. त्याला एक महिना तीन दिवस उलटल्यानंतर १५ ऑगस्ट राेजी ही जिल्ह्यातील पहिली प्लाझ्मा क्लिनिकल ट्रायल सुरु झाली. जिल्हा काेविड रुग्णालयातील ४८ वर्षीय महिला रुग्णांवर प्लाझ्मा थेरेपीला सुरुवात झाली आहे. ही महिला काेराेनाची गंभीर रुग्ण आहे.
जिल्ह्यात काेराेनामुक्त झालेल्यांची संख्या १२ हजारांच्या पुढे असताना आतापर्यंत केवळ १३ जणांनी प्लाझ्माचे दान केले आहे. त्यातील एका दात्याचा प्लाझ्मा यापूर्वीच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत असलेल्या ५८ वर्षीय व्यक्तीवर प्लाझ्मा ऑफ लेबल थेरेपीसाठी वापरण्यात आला आहे.