ETV Bharat / state

यश देशमुख यांना हौतात्म्य आल्याने पिंपळगाव बुडाले शोकसागरात; गावात पेटली नाही एकही चूल! - जळगाव यश देशमुख यांना हौतात्म्य

हुतात्मा जवान यश देशमुख यांच्या पार्थिवाकडे त्यांच्या कुटुंबासह गावकरी आस लावून बसले आहेत. पार्थिव शनिवारी (दि. २८) सकाळी पिंपळगाव येथे पाेहचणार असून, सकाळी १० वाजेच्या सुमारास घोडेगाव रस्त्यावरील मोकळ्या पटांगणावर त्यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.

जळगाव
जळगाव
author img

By

Published : Nov 27, 2020, 8:10 PM IST

जळगाव - देश सेवेचे स्वप्न उराशी बाळगून जम्मू काश्मिरमध्ये सैन्य दलाच्या सेवेत तैनात असताना, जळगाव जिल्ह्याचे सुपुत्र यश दिगंबर चव्हाण यांना गुरुवारी दुपारी दहशतवाद्यांशी लढताना हौतात्म्य आले. यश यांच्या अचानक जाण्याने पिंपळगाववासी शोकसागरात बुडाले आहेत. यश यांच्या हौताम्याची बातमी धडकल्यानंतर पिंपळगावातील एकाही घरात चूल पेटलेली नाही. सीमेवर लढणाऱ्या जवानांचा हकनाक बळी घेणाऱ्या अतिरेक्यांचा केंद्र सरकारने कायमस्वरुपी बिमोड करावी, अशी संतप्त प्रतिक्रिया गावकऱ्यांमधून हाेत आहे.

यश देशमुख यांना हौतात्म्य आल्याने पिंपळगाव बुडाले शोकसागरात

हुतात्मा जवान यश देशमुख यांच्या पार्थिवाकडे त्यांच्या कुटुंबासह गावकरी आस लावून बसले आहेत. पार्थिव शनिवारी (दि. २८) सकाळी पिंपळगाव येथे पाेहचणार असून, सकाळी १० वाजेच्या सुमारास घोडेगाव रस्त्यावरील मोकळ्या पटांगणावर त्यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. चाळीसगाव तालुका प्रशासनाकडून यश त्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी पूर्णत्वास आली आहे.

वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी वीरमरण -

यश देशमुख यांचा जन्म ६ एप्रिल १९९९ रोजी झालेला होता. शेतकरी कुटुंबात जन्म झाल्याने ते आधीपासूनच मेहनती होते. लहानपणापासून लष्करी सेवेचे त्यांना आकर्षक होते. मोठे झाल्यावर सैन्यात भरती होऊन देशाची सेवा करण्याचे त्यांचे ध्येय होते. मात्र, सैन्यात दाखल झाल्यानंतर वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी त्यांना वीरमरण आले. आयुष्याच्या ऐन उमेदीच्या काळात ते सर्वांना सोडून गेले.

गेल्या महिन्यातच सुटीवरून कर्तव्यावर झाले होते रुजू-

२७ जून २०१९ रोजी पुणे येथे मराठा बटालियन १०१ एटी इन्फन्ट्रीमध्ये पॅरा कंमाडो म्हणून ते भरती झाले होते. त्यानंतर त्यांनी नऊ महिने बेळगाव येथे सैन्य दलाचे खडतर प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षण पूर्ण केल्यांनतर दोन महिने जम्मू काश्मिर येथील रामबण येथे सेवा बजावल्यानंतर सप्टेंबर महिन्यात १५ दिवसांच्या सुट्टीवर ते घरी पिंपळगाव येथे आले होते. सुट्टी संपताच गेल्या महिन्यातच ३ ऑक्टाेबर राेजी पुन्हा श्रीनगर येथे रूजू झाले होते. गुरुवारी दुपारी श्रीनगर शहराबाहेरील एचएमटी परिसरात दहशतवाद्यांनी गस्तीवर असलेल्या लष्कराच्या शीघ्र कृती दलाच्या ताफ्यावर बेछूट गोळीबार केला. दहशतवाद्यांच्या याच भ्याड हल्ल्यात यश देशमुख यांच्यासह दोघे जवान गंभीररित्या जखमी झाले होते. उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकाऱ्यांची पिंपळगावला भेट-

चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी रात्रीच पिंपळगाव येथे भेट देवून देशमुख कुटुंबीयांचे सांत्वन केले. उपविभागीय अधिकारी लक्ष्मीकांत साताळकर यांच्यासह महसूल व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, पोलीस दलाच्या अधिकाऱ्यांनी पिंपळगाव येथे भेट देवून शहीद जवान यश यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. गावापासून जवळ असलेल्या घोडेगाव रस्त्यावर मोकळ्या पटांगणावर वीरमरण आलेल्या जवानाला सकाळी १० वाजता अखेरचा निरोप दिला जाणार आहे, अशी माहिती उपविभागीय अधिकारी लक्ष्मीकांत साताळकर यांनी दिली आहे.

सजवलेल्या ट्रॅक्टरवरून निघणार अंत्ययात्रा-

हुतात्मा जवान यश देशमुख यांचे मित्र, गावातील तरुण व ग्रामस्थ मनावर दगड ठेऊन आपल्या दुःखाला आवर घालत सुपूत्राला अखेरचा निरोप देण्याच्या तयारीत लागल्याचे दिसून आले. यश यांच्या मित्र परिवाराला त्यांच्या निधनाची बातमीने मोठा धक्का बसला आहे. काही मित्रांनी यश यांच्या आठवणींना उजाळा दिला. पिंपळगावसह चाळीसगाव तालुक्यात ठिकठिकाणी यश देशमुख यांना श्रद्धांजली वाहणारे बॅनर लावण्यात आले आहेत. अंत्यसंस्काराप्रसंगी तब्बल ४० क्विंटल झेंडुची फुले व २ क्विंटल रांगाेळी मागवण्यात आली आहे. सजवलेल्या ट्रॅक्टरवरून जवानाचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी नेण्यात येणार आहे. गावात प्रत्येक घरासमोर रांगोळ्या टाकण्यात येणार आहेत.

परमेश्वर देशमुख कुटुंबीयांना दुःखातून सावरण्याची शक्ती देवो- गुलाबराव पाटील

यश देशमुख यांना दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आले. खान्देशच्या सुपुत्राला देश सेवा करत असताना हौतात्म्य आले, याचा सर्वांना अभिमान आहे. मी देशमुख कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहे. परमेश्वर देशमुख कुटुंबीयांना दुःखातून सावरण्याची शक्ती देवो, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. दरम्यान, हुतात्मा जवान यश देशमुख यांनी देशासाठी आपले बलिदान दिले आहे. त्यांचे बलिदान तरुणांना कायम प्रेरणा देत राहील. यश यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी आपण आहोत, अशा भावना आमदार मंगेश चव्हाण यांनी व्यक्त केल्या.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.