ETV Bharat / state

जुन्या वादातून जळगावात एकाला बेदम मारहाण; दोघांवर गुन्हा दाखल

author img

By

Published : Oct 30, 2020, 5:37 PM IST

कामावरून काढल्याच्या संशयातून जळगावात एकाला बेदम मारहाण करण्यात आली. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Jalgoan
जळगाव

जळगाव - कामावरून काढल्याचा संशयातून तरूणाने मित्रांच्या मदतीने एकाला बेदम मारहाण केल्याची घटना शहरातील गुरांचा बाजार येथे घडली. एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

अधिक माहिती अशी की, एमआयडीसी परिसरातील भारत पेट्रालियम कॉर्पोरेशन लिमीटेडच्या एलपीजी बॉटलींग प्लान्टमध्ये प्लॉन्ट इन्चार्ज म्हणून मनोज सिताराम वर्मा (वय-४३, रा. गिरनार अपार्टमेंट, लक्ष्मी नगर) गेल्या तीन वर्षांपासून काम करतात. एलपीजी प्लॉन्टमध्ये ठेकेदाराच्या माध्यमातून मजूरांची भरती केली जाते. त्यात राहुल सुभाष सपकाळे (कोळी) रा. मेस्कोमाता नगर हा दोन वर्षांपूर्वी मजूरी काम करत होता. तेव्हा ठेकेदाराने त्याला कामावरून काढून टाकले होते. मनोज वर्मा यांच्यामुळे काढले असा आरोपी राहुल सपकाळेला संशय होता. ‘तुझ्यामुळे मला काढले आहे. तुला मी सोडणार नाही,’ अशी धमकी काही दिवसांपूर्वी राहुलने मनोज यांना दिली होती.

दरम्यान, मनोज वर्मा हे कामावरून चारचाकीने घरी जात असताना ढोर बाजार जवळ राहुल सपकाळे आणि त्याचा एक अनोळखी मित्र दुचाकीवर आले. त्यांनी काहीही न सांगता वर्मा यांनी लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यात ते जखमी झाले. आरोपींनी वर्मा यांच्या खिश्यातील २५ हजार रूपये किंमतीचा मोबाईल बळजबरी हिसकावून घेतला. मनोज वर्मा यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.