ETV Bharat / state

'पंकजा मुंडेंनी शिवसेनेत यावं; आमच्याकडे त्यांचा सन्‍मानच होईल' - pankaja munde should join shivsena

2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर पंकजा मुंडे यांना भाजपकडून हवे तसे प्रतिनिधित्त्व मिळाले नाही. मुळात दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी भाजपसाठी पडतीच्‍या काळात खूप मोठे काम केले आहे. आता मात्र त्‍यांच्‍या कन्‍या पंकजा मुंडे यांना प्रतिनिधित्वासाठी संघर्ष करावा लागत आहे.

pankaja munde gulabrao patil
पंकजा मुंडे गुलाबराव पाटील
author img

By

Published : Jul 30, 2021, 2:26 PM IST

जळगाव - मुंडे परिवाराचे काम आभाळाएवढे मोठे आहे, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. ते नव्याने सांगायला नको. म्हणूनच मुंडे साहेबांच्या वारसदाराला कुठेतरी न्‍याय, सन्‍मान मिळायला हवा, अशी समाजाची रास्त अपेक्षा आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे या शिवसेनेत आल्‍या तर त्‍यांचे स्‍वागतच आहे. त्‍यांना आमच्याकडे स्‍थान व सन्‍मान मिळेल, असे मत राज्‍याचे सार्वजनिक पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले. गुलाबराव पाटील हे आज (शुक्रवारी) सकाळी जळगाव जिल्ह्यातील किनोद गावी एका कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

माध्यमांशी बोलताना मंत्री गुलाबराव पाटील

सध्या भाजपच्‍या नेत्‍या पंकजा मुंडे यांच्‍या समर्थकांनी त्‍यांनी शिवसेनेत प्रवेश करावा, अशी मागणी करत सोशल मीडियावर मोहीम सुरू केली आहे. यासंदर्भात पत्रकारांनी मंत्री गुलाबराव पाटील यांना विचारणा केली असता त्यांनी आपले मत मांडले.

पुढे काय म्हणाले गुलाबराव पाटील?

मंत्री गुलाबराव पाटील म्‍हणाले की, 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर पंकजा मुंडे यांना भाजपकडून हवे तसे प्रतिनिधित्त्व मिळाले नाही. मुळात दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी भाजपसाठी पडतीच्‍या काळात खूप मोठे काम केले आहे. आता मात्र त्‍यांच्‍या कन्‍या पंकजा मुंडे यांना प्रतिनिधित्वासाठी संघर्ष करावा लागत आहे. राष्ट्रवादीचे नेते जे आधी भाजपमध्ये होते ते म्हणजे एकनाथ खडसे तसेच भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे व पंकजा मुंडे यांना भाजपने तिकिट दिले नव्‍हते. याचाच अर्थ ओबीसी समाजाचे भाजपकडून कुठेतरी खच्‍चीकरण केले जात आहे, असे गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

त्यांच्या पदाबाबत मुख्यमंत्री निर्णय घेणार -

मुंडे परिवाराचे काम मोठे आहे. यामुळे मुंडेंचा वारसदार म्‍हणून पंकजा मुंडे यांना योग्‍य स्‍थान व प्रतिनिधित्त्व शिवसेनेत मिळेल; अशी समाजाची अपेक्षा आहे. यामुळे पंकजा मुंडे यांनी शिवसेनेत प्रवेश केला तर त्‍यांचे स्‍वागतच राहील. प्रवेश केल्‍यानंतर त्‍यांना पद काय द्यायचे, हे मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे ठरवतील. ते सांगण्यासाठी मी एवढा मोठा नाही, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

हेही वाचा - 'बोगद्याच्या माध्यमातून महापुराचे पाणी दुष्काळग्रस्त भागात वळवणे महत्त्वाचे'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.