ETV Bharat / state

जलसंपदा मंत्र्यांच्या जिल्ह्यात ओझरखेड धरणाला गळती; नागरिकांमध्ये भितीचे वातावरण - ओझरखेड धरण

वरणगाव-तळवेल उपसा सिंचन योजनेसाठी नव्याने बांधण्यात आलेल्या साठवण तलावाच्या मुख्य भिंतीलाच तडे गेले आहेत. त्यामुळे मोठी गळती लागली असून धरणातून रोज लाखो लीटर पाण्याची नासाडी होत आहे. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांना कोकणातील तिवरे धरणाच्या दुर्घटनेची आठवण होत आहे.

ओझरखेड धरणाला गळती
author img

By

Published : Jul 10, 2019, 8:03 PM IST

Updated : Jul 10, 2019, 8:35 PM IST

जळगाव - कोकणातील तिवरे धरण फुटण्याची घटना ताजी असताना जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यात असलेल्या ओझरखेड धरण फुटण्याची भीती आहे. पावसाळ्यात तुडूंब भरलेल्या या धरणाच्या मुख्य संरक्षक भिंतीला पडलेल्या भेगांतून पाणी बाहेर पडत आहे. याबाबत जलसंपदामंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचे आमदार संजय सावकारे यांनी सांगितले, तर गळतीची दुरुस्ती करू, अशी ग्वाही तापी महामंडळाचे अधिकारी देत आहेत.

धरणाच्या गळतीबदद्ल माहिती देताना अधिकारी

वरणगाव-तळवेल उपसा सिंचन योजनेसाठी नव्याने बांधण्यात आलेल्या साठवण तलावाच्या मुख्य भिंतीलाच तडे गेले आहेत. त्यामुळे मोठी गळती लागली असून धरणातून रोज लाखो लीटर पाण्याची नासाडी होत आहे. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांना कोकणातील तिवरे धरणाच्या दुर्घटनेची आठवण होत आहे. वेळीच ओझरखेडा येथील धरणाची दुरुस्ती न केल्यास भविष्यात मोठा धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती नागरिकांमध्ये व्यक्त केली जात आहे. याबाबत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे तक्रार करणार असल्याची माहिती आमदार संजय सावकारे यांनी दिली आहे.

युती शासनाच्या काळात तत्कालीन पाटबंधारे मंत्री एकनाथ खडसे यांनी हतनूर धरणातून समुद्रात वाहून जाणारे पाणी साठवण्यासाठी ओझरखेड येथे धरणाच्या कामास मंजुरी मिळवून दिली होती. हे काम सद्यस्थितीत पूर्णत्वास आले आहे. या धरणातील पाण्याचा मुक्ताईनगर, भुसावळ, बोदवड या तालुक्यासह विदर्भातील काही भागातील १६ हजार ९४८ हेक्टर शेतीला सिंचनासाठी उपयोग होणार आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने वेळीच लक्ष घालून धरणाची दुरुस्ती करावी, अशी अपेक्षा नागरिकांसह शेतकऱ्यांकडून केली जात आहे. तातडीने या धरणाची दुरुस्ती केली जाईल, अशी ग्वाही तापी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

वेळीच या धरणाची दुरुस्ती केली नाही तर भविष्यात त्याला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. एकीकडे प्रशासनाचे अधिकारी हे गळती धरणातून होत नसून दीपनगरला पाणीपुरवठा होणाऱ्या पाईपातून होत आहे, असा दावा करत आहेत. मात्र, धरणाच्या पाण्याची नासाडी या गळतीद्वारे होत असून भविष्यात संभाव्य धोका उद्भवू शकतो, हे मात्र अधिकारी नाकारत आहेत.

Intro:जळगाव
कोकणातील तिवरे धरण फुटण्याची घटना ताजी असताना जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यात असलेल्या ओझरखेड धरण फुटीची भीती आहे. पावसाळ्यात तुडुंब भरलेल्या या धरणाच्या मुख्य संरक्षक भिंतीला पडलेल्या भेगांतून पाणी बाहेर पडत आहे. याबाबत जलसंपदामंत्र्यांकडे तक्रार करण्याचा इशारा आमदार संजय सावकारे यांनी दिला आहे. तर गळतीची दुरुस्ती करू, अशी ग्वाही तापी महामंडळाचे अधिकारी देत आहेत.Body:वरणगाव-तळवेल उपसा सिंचन योजनेसाठी भुसावळ तालुक्यातील ओझरखेड येथील नव्याने बांधण्यात आलेल्या साठवण तलावाच्या मुख्य भिंतीलाच तडे गेल्याने मोठी गळती लागली असून धरणातून रोज लाखो लीटर पाण्याची नासाडी होत आहे. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांना कोकणातील तिवरे धरणाच्या दुर्घटनेची आठवण होत आहे. वेळीच ओझरखेडा येथील धरणाची दुरुस्ती न केल्यास भविष्यात मोठा धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती नागरिकांमध्ये व्यक्त केली जात आहे. याबाबत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे तक्रार करणार असल्याची माहिती आमदार संजय सावकारे यांनी दिली आहे.

युती शासनाच्या काळात तत्कालीन पाटबंधारे मंत्री एकनाथ खडसे यांनी हतनूर धरणातून समुद्रात वाहून जाणारे पाणी उचलून साठविण्यासाठी ओझरखेड येथे धरणाच्या कामास मंजुरी मिळवून दिली होती. हे काम सद्यस्थितीत पूर्णत्वास आले आहे .या धरणातील पाण्याचा मुक्ताईनगर, भुसावळ, बोदवड या तालुक्यासह विदर्भातील काही भागातील १६ हजार ९४८ हेक्टर शेतीला सिंचनासाठी उपयोग होणार आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने वेळीच लक्ष घालून धरणाची दुरुस्ती करावी, अशी अपेक्षा नागरिकांसह शेतकऱ्यांकडून केली जात आहे. तातडीने या धरणाची दुरुस्ती केली जाईल, अशी ग्वाही तापी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.Conclusion:वेळीच या धरणाची दुरुस्ती केली नाही तर भविष्यात त्याला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. एकीकडे प्रशासनाचे अधिकारी हे गळती धरणातून होत नसून दीपनगरला पाणीपुरवठा होणाऱ्या पाईपातून होत आहे, असा दावा करत आहेत. मात्र, धरणाच्या पाण्याची नासाडी या गळतीद्वारे होत असून भविष्यात संभाव्य धोका उद्भवू शकतो, हे मात्र अधिकारी नाकारत आहेत.
Last Updated : Jul 10, 2019, 8:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.