ETV Bharat / state

जळगावात वकिलाला दहा हजारांचा 'ऑनलाइन' गंडा

author img

By

Published : Oct 24, 2020, 3:47 PM IST

जळगाव जिल्ह्याच्या मुक्ताईनगरात राहणाऱ्या एका विधिज्ञाला अज्ञात व्यक्तीने 10 हजार 84 रुपयांचा ऑनलाइन गंडा घातला आहे. याबाबत त्या विधिज्ञाने पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला असून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

जिल्हापेठ पोलीस ठाणे
जिल्हापेठ पोलीस ठाणे

जळगाव - एका वकिलाच्या बँक खात्यातून ऑगस्ट महिन्यात कुणीतरी दहा हजार रुपयांची रक्कम ऑनलाइन पद्धतीने परस्पर काढल्याचा प्रकार शनिवारी (दि. 24 ऑक्टोबर) उघडकीस आला. संबंधित वकिलाला आपली फसवणूक झाल्याचे कळताच त्याने तत्काळ जिल्हापेठ पोलीस निरीक्षकांची भेट घेत तक्रार दाखल करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

शहरातील मुक्ताईनगरातील रहिवासी अ‌ॅड. योगेश जयवंतराव पाटील हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्यास आहेत. त्यांचे रिंगरोडवरील स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये बचत खाते आहे. पाटील हे पासबुकमध्ये नियमित नोंदी करीत होते. परंतु, कोरोनामुळे त्यांना गेल्या काही महिन्यांपासून पासबुकवर नोंदी करता आल्या नसल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

बँक स्टेटमेंटवरून आले लक्षात

योगेश पाटील यांना गेल्या महिन्यात 14 सप्टेंबरला त्यांना बँक स्टेंटमेंट मिळाले. यात त्यांना 18 ऑगस्ट ते 8 सप्टेंबरपर्यंत कुणीतरी वेळोवेळी त्यांच्या खात्यातून एकूण 10 हजार 84 रुपये काढून घेतल्याची महिती समोर आली.

व्यवहार न करता झाली कपात

अ‌ॅड. पाटील यांनी कुठलाही ऑनलाइन व्यवहार न करता तसेच त्यांना कुठलाही ओटीपी क्रमांक आलेला नसताना त्यांच्या खात्यातून ऑनलाइन पद्धतीने पैसे काढण्यात आले. अखेर त्यांनी शनिवारी (दि. 24 ऑक्टोबर) जिल्हापेठ पोलीस ठाणे गाठून पोलीस निरीक्षक अकबर पटेल यांना संपूर्ण घटनेची माहिती दिली. तसेच बँकेच्या कर्मचाऱ्यांनाही बोलवून घेण्यात आले. त्यानंतर संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशा मागणीचा तक्रार अर्ज अ‌ॅड. योगेश पाटील यांनी पोलिसांना दिला.

हेही वाचा - जळगावातील मेहरूण परिसरात दोन गटात हाणामारी; दोन जखमी, चार जणांना अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.