ETV Bharat / state

जळगाव जिल्ह्यात पावसाची दडी; टँकरची संख्या वाढण्याची शक्यता

जळगाव जिल्ह्यात 22 जून ते 7 जुलै या काळात चांगला पाऊस झाल्याने पाणीटंचाईची झळ काहीशी कमी झाली आहे. जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यात सुमारे 200 टँकर सुरू होते. मात्र, आता 147 गावांमध्ये 123 टँकर सुरू आहेत. दरम्यान, पावसाने पुन्हा दडी मारल्याने टँकरची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

जळगाव जिल्ह्यात टँकरची संख्या वाढण्याची शक्यता
author img

By

Published : Jul 19, 2019, 1:14 PM IST

जळगाव - जिल्ह्यात 22 जून ते 7 जुलै या काळात चांगला पाऊस झाल्याने पाणीटंचाईची झळ काहीशी कमी झाली आहे. जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यात सुमारे 200 टँकर सुरू होते. मात्र, आता 147 गावांमध्ये 123 टँकर सुरू आहेत. दरम्यान, पावसाने पुन्हा दडी मारल्याने टँकरची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

जळगाव जिल्ह्यात टँकरची संख्या वाढण्याची शक्यता
जळगाव जिल्ह्यात पावसाने उशिरा का होईना हजेरी लावली. त्यामुळे पाणीटंचाईची समस्या काही प्रमाणात कमी झाली आहे. गेल्या आठवडाभरात 37 गावांचे 35 टँकर बंद झाले आहेत. अद्यापही जिल्ह्यातील 269 गावांना 278 अधिग्रहित विहिरींद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. आत्तापर्यंत जळगाव जिल्ह्यात सुमारे 21.6 टक्के पाऊस झाला आहे. या पावसामुळे टंचाईग्रस्त गावांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी पावसाने दडी दिल्यामुळे परिस्थिती गंभीर होण्याच्या मार्गावर आहे.
जिल्ह्यात सर्वात भीषण परिस्थिती अमळनेर तालुक्यात आहे. यावर्षी 15 जुलैपर्यंत इथे सर्वात कमी म्हणजेच केवळ 95 मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे. या तालुक्यातील 51 गावांमध्ये 35 टँकर सुरू आहेत. विदर्भासह मध्यप्रदेशात तापी नदीच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने तापी नदी दुथडी भरून वाहत आहे. तापी नदीला पाणी आल्याने जळगाव, भुसावळ, रावेर, यावल या तालुक्यातील दुष्काळी गावांना मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात चांगला पाऊस झाला असला तरी पश्चिम पट्टा मात्र अद्यापही कोरडाच आहे.

Intro:जळगाव
जिल्ह्यात 22 जून ते 7 जुलै या काळात चांगला पाऊस झाल्याने पाणीटंचाईची झळ काहीशी कमी झाली आहे. जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यात सुमारे 200 टँकर सुरू होते. मात्र, आता 147 गावांमध्ये 123 टँकर सुरू आहेत. दरम्यान, पावसाने पुन्हा दडी मारल्याने टँकरची संख्या वाढण्याची भीती आहे.Body:जळगाव जिल्ह्यात पावसाने उशिरा का होईना हजेरी लावली आहे. त्यामुळे पाणीटंचाईची समस्या काही प्रमाणात कमी झाली आहे. गेल्या आठवडाभरात 37 गावांचे 35 टँकर बंद झाले आहेत. अद्यापही जिल्ह्यातील 269 गावांना 278 अधिग्रहित विहिरींद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. गेल्या वर्षी पर्जन्यमान कमी झाल्यामुळे पाणीटंचाईची भीषण परिस्थिती निर्माण झाली होती. जिल्ह्यातील शेकडो गावांना मोठ्या प्रमाणावर पाणी समस्येला सामोरे जावे लागले होते. जूनअखेरपर्यंत पाणीटंचाईची समस्या कायम होती. मात्र, आतापर्यंत सुमारे 21.6 टक्के पाऊस झाला असून या पावसामुळे टंचाईग्रस्त गावांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात सर्वात भीषण परिस्थिती अमळनेर तालुक्यात आहे. यावर्षी 15 जुलैपर्यंत सर्वात कमी म्हणजे केवळ 95 मिलीमीटर पाऊस अमळनेर तालुक्यात झाला आहे. या तालुक्यातील 51 गावांमध्ये 35 टँकर सुरू आहेत.Conclusion:विदर्भासह मध्यप्रदेशात तापी नदीच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने तापी नदी दुथडी भरून वाहत आहे. तापी नदीला पाणी आल्याने जळगाव, भुसावळ, रावेर, यावल या तालुक्यातील दुष्काळी गावांना मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात चांगला पाऊस झाला असला तरी पश्चिम पट्टा मात्र अद्यापही कोरडाच आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.