जळगाव - जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग वेगाने सुरूच आहे. गुरुवारी जिल्ह्यात पुन्हा 321 नवे कोरोना पॉझिटिव्ह आढळले. तर 8 जणांचे कोरोनामुळे मृत्यू झाला. सद्यस्थितीत जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 13 हजार 87 इतकी झाली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 584 रुग्णांचे मृत्यू झाले आहेत.
जिल्हा प्रशासनाला गुरुवारी रात्री प्राप्त झालेल्या तपासणी अहवालांमध्ये 321 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यात सर्वाधिक 79 पॉझिटिव्ह रुग्ण हे जळगाव शहरात आढळले आहेत. त्याचप्रमाणे, जळगाव ग्रामीण 12, भुसावळ 19, अमळनेर 15, चोपडा 20, पाचोरा 18, धरणगाव 18, यावल 09, एरंडोल 51, जामनेर 15, रावेर 06, पारोळा 03, चाळीसगाव 18, मुक्ताईनगर 36, बोदवड 01 आणि दुसऱ्या जिल्ह्यातील 1 असे एकूण 321 रुग्ण नव्याने समोर आले आहेत.
जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात 8 जणांचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्यांमध्ये चाळीसगाव आणि धरणगाव तालुक्यातील प्रत्येकी 2 तसेच जळगाव, रावेर, पाचोरा आणि एरंडोल तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत 3 हजार 358 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 9 हजार 145 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.