ETV Bharat / state

Eknath Khadse Heart Attack : एकनाथ खडसेंना हृदयविकाराचा झटका; मुंबईला हलवण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून एअर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था

Eknath Khadse Heart Attack : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका आला होता. यानंतर खडसे यांना तातडीनं जळगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. पुढील उपचारासाठी खडसे यांना मुंबईला हलवण्यात येणार आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीनं एअर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था केली असल्याची माहिती मिळत आहे.

MLA Eknath Khadse
MLA Eknath Khadse
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 5, 2023, 4:51 PM IST

Updated : Nov 5, 2023, 5:34 PM IST

जळगाव Eknath Khadse Heart Attack : राष्ट्रवादीचे नेते तथा विद्यमान आमदार एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका आल्याचं वृत्त आहे. खडसे यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका आल्याचं कळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीनं त्यांच्यासाठी रुग्णवाहिकेची व्यवस्था केल्याचं सांगण्यात येतंय.

सध्या प्रकृती स्थिर : आमदार एकनाथ खडसे यांना मुंबईतील रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी एकनाथ खडसे यांच्या छातीत अचानक दुखू लागलं होतं. यानंतर त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्यांची प्रकृती आता ठीक असल्याचं सांगण्यात येत आहे.

खडसेंच्या नियमित तपासणीत बदल : एकनाथ खडसे हे नियमित तपासणी करण्यासाठी मुक्ताईनगर येथील रुग्णालयात गेले होते. या दरम्यान तपासणीत काही बदल आढलून आले. त्यानुसार एकनाथ खडसे यांना तातडीनं जळगावच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. या ठिकाणी त्यांच्या तपासण्या करण्यात आल्या. त्यांना रविवारी रात्री उशिरा एअर ॲम्बुलन्सनं मुंबईला रवाना करण्यात येणार असल्याची माहिती विश्वासनिय सूत्रांकडून मिळाली आहे.

रोहिणी खडसे रुग्णालयात उपस्थित : एकनाथ खडसे यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ खडसे रविवारी नियमित तपासणीसाठी मुक्ताईनगर येथील खासगी रुग्णालयात गेले होते. यादरम्यान तपासणीत काही बदल हे आढळून आले. त्या बदलानुसार पुढच्या तपासण्या करण्यासाठी त्यांना तातडीनं जळगावला रवाना करण्यात आलं. रुग्णालयात रोहिणी खडसे उपस्थित असल्याची माहिती मिळत आहे.

तातडीनं मुंबईला हलवणार? : जळगाव शहरातील गजानन हॉस्पिटलमध्ये त्यांच्या तपासण्या करण्यात येत आहेत. खडसेंच्या प्रकृतीबाबतची माहिती मिळाल्यानंतर रुग्णालयात कार्यकर्त्यांनी गर्दी करण्यास सुरुवात केली. खडसे यांच्यासोबत त्यांच्या कन्या रोहिणी खडसे रुग्णालयात आहेत. या ठिकाणी काही चाचण्या केल्यानंतर त्यांना तातडीनं मुंबईला रवाना करण्यात येणार असल्याची माहिती विश्वासनिय सूत्रांकडून मिळाली आहे.

हेही वाचा -

  1. Lok Sabha Elections २०२३ : मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघावरुन रस्सीखेच; रामदास कदमांनी थेटच सांगितलं
  2. Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटलांनी राज्य सरकारचं वाढवलं टेन्शन; जाहीर केला मोठा निर्णय
  3. Agra Accident : मुलीला ट्रेनमध्ये बसवल्यानंतर डॉक्टर पित्याचा काही वेळेतच रेल्वे रुळावर मृत्यू, नेमका अपघात कसा झाला?

Last Updated : Nov 5, 2023, 5:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.