ETV Bharat / state

बलात्काऱ्यांना फाशी द्या, उत्तरप्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करा; राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

हाथरस येथील घटना माणुसकीला काळिमा फासणारी असून नैतिकता ठेवत उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसकडून जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.

author img

By

Published : Oct 3, 2020, 3:27 PM IST

राष्ट्रवादीचे कार्यकर्ते
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते

जळगाव - उत्तरप्रदेशातील हाथरस येथील सामूहिक बलात्कार प्रकरणामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेमुळे उत्तरप्रदेशासह देशातील महिला सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. हाथरस येथील घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी शनिवारी (दि. 3 ऑक्टोबर) दुपारी जळगावात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निदर्शने करण्यात आली. त्यानंतर विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. या घटनेतील आरोपींना तत्काळ फाशीची शिक्षा द्यावी, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राजीनामा द्यावा, उत्तरप्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.

बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी

उत्तरप्रदेशातील हाथरस येथे एका तरुणीवर काही नराधमांनी अमानुषपणे सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर तिला जीवे मारण्याचा देखील प्रयत्न केला. या घटनेनंतर पीडित तरुणीचा रुग्णालयात उपचार सुरू असताना दुर्दैवी मृत्यू झाला. अतिशय संतापजनक असणाऱ्या या घटनेमुळे समाजमन सुन्न झाले असून, देशभरात संतप्त पडसाद उमटले आहेत. या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी शनिवारी दुपारी जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात निदर्शने करण्यात आली. हाथरस येथे घडलेल्या अमानुष घटनेमुळे माणुसकीला काळिमा फासली आहे. केंद्र सरकारने या घटनेची गंभीरतेने दखल घेण्याची गरज होती. मात्र, केंद्र सरकारची भूमिका संशयास्पद आहे. आज हाथरसमध्ये विरोधी पक्षांच्या नेत्यांना येऊ दिले जात नाही. पीडितेच्या कुटुंबीयांना डांबून ठेवले आहे. प्रसारमाध्यमांना देखील पीडितेच्या कुटुंबियांना भटालया दिले जात नाही. माध्यमांना पीडितेच्या कुटुंबियांपर्यंत पोहचू दिले जात नाही. सत्य दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. ही लोकशाहीची हत्या आहे, अशा भावना आंदोलकांनी व्यक्त केल्या.

दरम्यान, या घटनेतील पीडितेला व तिच्या कुटुंबीयांना न्याय मिळायला हवा. या घटनेनंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, उत्तर प्रदेशातील परिस्थिती लक्षात घेता त्या ठिकाणी राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, अशा मागण्या आंदोलकांच्या वतीने करण्यात आल्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‌ॅड. रवींद्र पाटील, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा कल्पिता पाटील यांसह आदींची उपस्थिती होती.

हेही वाचा - बलात्काऱ्यांना फाशी द्या; जळगावात संविधान बचाव कृती समितीची मागणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.