जळगाव- अत्यंत चुरशीच्या झालेल्या बोदवड नगरपंचायतीच्या निकालात शिवसेनेने मुसंडी मारली आहे. 9 जागांवर विजय मिळवत शिवसेनेने बोदवड नगरपंचायत ( Shivsena won in Bodwad Nagarpanchayat election ) ताब्यात घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना त्यांच्या मतदारसंघातील जबर धक्का मानला ( Eknath Khadse lose in Bodwad Nagarpanchayat election ) जात आहे.
बोदवड नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या वाट्याला 7 जागा आल्या आहेत. तर भाजपला तर अवघी 1 जागा मिळविता आली आहे. ईश्वर चिठ्ठीने ही जागा भाजपकडे आली. त्याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला.
बोदवड नगरपंचायतीवर शिवसेनेचा नगराध्यक्ष
सकाळी मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली तेव्हा, राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी घेतली होती. मात्र, त्यानंतर शिवसेनेने जोरदार मुसंडी मारत 17 पैकी 9 जागांवर विजय मिळवला. बोदवड नगरपंचायतीवर शिवसेनेचा नगराध्यक्ष विराजमान होणार ( Shivsena mayor in Bodwad Nagarpanchayat election ) आहे. ही निवडणूक दोन टप्प्यात पार पडली. पहिल्या टप्प्यात 13 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली होती.
रेखा चौधरी यांचा पराभव
4 जागांसाठी दुसरा टप्पा पार पडला. दोन्ही टप्प्यात सर्वपक्षीय 68 उमेदवार रिंगणात होते. यावेळी काही प्रभागात धक्कादायक निकाल समोर आले. प्रभाग क्रमांक 10 मध्ये एकनाथ खडसे यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे कैलास चौधरी यांच्या पत्नी रेखा चौधरी यांचा ( Rekha Chaudhary defeat in nagarpanchayat election ) पराभव झाला. सलग 25 वर्षे प्रतिनिधित्व करणाऱ्या चौधरींचा या ठिकाणी पराभव झाला. त्या ठिकाणी सेनेच्या मंजुषा बडगुजर विजयी झाल्या आहेत.
हेही वाचा-बॉलीवूडमधील कलावंताचे वकील जेष्ठ विधीज्ञ श्रीकांत शिवदे यांचे निधन
आमदार चंद्रकांत पाटील ठरले किंगमेकर!
शिवसेनेचे स्थानिक आमदार चंद्रकांत पाटील हे या निवडणुकीत किंगमेकर ठरले आहेत. बोदवड नगरपंचायतीची निवडणूक जाहीर झाली आहे. तेव्हापासून एकनाथ खडसे आणि चंद्रकांत पाटलांमध्ये जोरदार वाद रंगला होता. दोन्ही नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत होते. त्यामुळे बोदवड नगरपंचायतीवर कोणाची सत्ता येणार? याची प्रचंड उत्सुकता होती. अखेर या ठिकाणी शिवसेनेने बाजी मारत राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवले आहे.
खडसेंना होमपीचवर जबर धक्का-
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्यासाठी हा निकाल अत्यंत धक्कादायक मानला जात आहे. भाजप सोडल्यानंतर खडसेंनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेली ही सर्वात मोठी आणि प्रतिष्ठेची निवडणूक होती. एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात सलग 40 वर्षे प्रतिनिधित्व केलं आहे. त्यामुळे खडसेंच्या दृष्टीने ही निवडणूक प्रतिष्ठेची होती. पण त्यात त्यांना अपयश आले आहे.
भाजपसाठी चिंतेचा निकाल-
बोदवड नगरपंचायतीचा निकाल समोर आल्यानंतर भाजपच्या वाट्याला अवघी एक जागा आली आहे. ईश्वर चिठ्ठीच्या मदतीने भाजपला ही जागा मिळाली. त्यामुळे भाजपच्या दृष्टीने हा निकाल चिंता वाढवणारा आहे. भाजप नेते गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाचीही या निवडणुकीत कसोटी होती. त्यामुळे गिरीश महाजन याठिकाणी सपशेल अपयशी ठरल्याचे दिसत आहे.