जळगाव - राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे ( Eknath Khadse ) व त्यांची कन्या रोहिणी खडसे-खेवलकर ( Rohini Khadse ) यांच्याकडून माझ्या जिवाला धोका असल्याचा धक्कादायक आरोप शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील ( MLA Chandrakant Patil Allege on Eknath Khadse ) यांनी केला आहे.
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसने मुक्ताईनगरात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे अवैध धंदे असल्याचा आरोप करत पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले होते. त्यावर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत असा कुठलाही प्रकार नसल्याचे उत्तर दिले होते. आता आमदार चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या आरोपावरुन महाविकास आघाडीत बिघाडी होत असल्याची चर्चा शहरात सुरू आहे.
हे ही वाचा - Chopda Police Red : चोपड्यात कुंटणखान्यावर धाड, 23 तरुणींची सुटका