ETV Bharat / state

मुक्ताईनगर विधानसभा : एकनाथ खडसेंच्या उमेदवारीविषयी संभ्रम; सेना जागेसाठी आग्रही - एकनाथ खडसेंच्या उमेदवारीविषयी संभ्रम

मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे गेल्या ३० वर्षांपासून सलग निवडून येत आहेत. मात्र, ही निवडणूक ते लढवतात की नाही याबाबत संभ्रम आहे. खडसेंसारखा मातब्बर नेता असताना मुक्ताईनगर मतदारसंघाचा हवा तसा विकास झालेला नाही. त्याचा फटका यावेळी भाजपला बसू शकतो.

मुक्ताईनगर विधानसभा: एकनाथ खडसेंच्या उमेदवारीविषयी संभ्रम; सेना जागेसाठी आग्रही
author img

By

Published : Sep 21, 2019, 6:33 PM IST

जळगाव - मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे गेल्या ३० वर्षांपासून सलग निवडून येत आहेत. मात्र, ही निवडणूक ते लढवतात की नाही याबाबत संभ्रम आहे. खडसेंसारखा मातब्बर नेता असताना मुक्ताईनगर मतदारसंघाचा हवा तसा विकास झालेला नाही. त्याचा फटका यावेळी भाजपला बसू शकतो. दुसरीकडे मित्रपक्ष असलेली शिवसेना देखील या जागेसाठी आग्रही आहे. सेनेकडून जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील इच्छुक आहेत. गेल्यावेळी त्यांनी खडसेंना चांगलीच टक्कर दिली होती.

हा मतदारसंघ म्हणजे सन १९९० पासून सलग 6 वेळा निवडून येणारे भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा बालेकिल्ला आहे. विराेधी बाकावर असताना सत्ताधाऱ्यांशी संघर्ष करण्यात ३० वर्षे गेल्यानंतर जेव्हा सत्तेची फळे चाखण्याची वेळ आली, तेव्हा मात्र खडसेंच्या नशिबी 'वनवास' आला. मंत्रिपदावरून पायउतार झालेल्या खडसेंकडे सरकारने जसे दुर्लक्ष केले तशाच त्यांच्या मतदारसंघातील समस्याही प्रलंबीतच राहिल्या. रखडलेले सिंचन प्रकल्प, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या आणि राेजगार हे या मतदारसंघातील वर्षानुवर्षे रखडलेले प्रश्न आहेत. १९९५ मध्ये युतीची सत्ता असतानाही या समस्या हाेत्याच. आताच्या भाजप सरकारमध्येही त्या कायम आहेत. २०१४ मध्ये राज्यात भाजपचे सरकार आले तेव्हा खडसे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार हाेते. मात्र, महसूल मंत्रिपदावर त्यांची बाेळवण झाली. वर्षभराच्या आतच भ्रष्टाचाराच्या आराेपांमुळे त्यांना मंत्रिपद साेडावे लागले. नंतर 'क्लीन चिट' मिळालीही, मात्र मंत्रिपदापासून ते वंचितच राहीले. ही खदखद मनात ठेवून खडसेंनी अनेकदा जाहीरपणे आपल्याच सरकारला खडेबाेल सुनावले. त्याचा परिपाक म्हणजे यंदाच्या निवडणुकीत सातव्यांदा त्यांना तिकीट मिळेल का, याविषयी शंकाच आहे.

खडसेंना शह देण्यासाठी स्वकीयच टपलेले आहेत. जिल्ह्यात भाजपच्या फलकावर आता मुख्यमंत्र्यांच्या बराेबरीने गिरीश महाजन यांची छबी दिसते. तिथे खडसेंना स्थान राहीलेले नाही. गेल्या निवडणुकीत 'कांटे की टक्कर' देणारे शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटीलही खडसेंची कोंडी करण्याची एकही संधी सोडत नाहीत. असे, असले तरीही खडसे आपला बालेकिल्ला राखून आहेत. मात्र, विराेधकांपेक्षा त्यांचा लढा स्वपक्षीयांशीच जास्त आहे. २०१४ मध्ये खडसेंनी हरिभाऊ जावळेंचे तिकीट कापून स्नुषा रक्षा यांना खासदारकीची उमेदवारी दिली. पत्नी मंदाकिनी यांना महानंद-दूध संघाचे अध्यक्षपद, मुलगी रोहिणी यांना जिल्हा बँकेचे अध्यक्षपद, वस्त्रोद्योग महामंडळाचे उपाध्यक्षपद दिले. या कुटुंबकेंद्रित राजकारणाने कार्यकर्ते दुरावले आहेत. आता मुलगी रोहिणी खडसे यांच्या राजकीय पुनर्वसनाचे मुक्ताईनगरातून प्रयत्न होऊ शकतात.

असा आहे मुक्ताईनगर मतदारसंघ-

या मतदारसंघात ३ तालुक्यांतील १७४ गावांचा समावेश होतो. त्यात सावदा ते रावेरचा पट्ट्यात केळी उत्पाद शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत. उर्वरीत पट्ट्यातील प्रमुख पीक कापूस आहे. परंतु, प्रक्रिया उद्याेगांचा अभाव असल्याने स्थानिकांना राेजगार नाही. जागतीक दर्जाच्या केळीचे उत्पन्न येथील शेतकरी घेतात. त्यांच्या निर्यातीसाठी सक्षम यंत्रणा नाही. खासदार रक्षा खडसे यांच्या माध्यमातून रेल्वेची सुविधा मिळाली, तीही ताेकडीच ठरली आहे. मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागल्यापासून नाराज असलेले खडसे पक्षावर नाराज आहेत. अंतर्गत कलहातून खडसेंचे पंख छाटण्यात आल्याची भावना त्यांच्या समर्थकांमध्ये आहे. गेल्या निवडणुकीत शिवसेनेशी युती ताेडण्याचा निर्णय खडसेंनी जाहीर केला हाेता. तेव्हापासून शिवसेना खडसेंवर नाराज आहे. प्रकृती अस्वास्थामुळे यंदा निवडणूक लढवायची किंवा नाही याचा निर्णय ऐनवेळी घेऊ, असे खडसेंनी सांगितले आहे. मात्र, त्यांनीच निवडणूक लढवावी, असा समर्थकांचा आग्रह आहे. दुसरीकडे मुक्ताईनगरची जागा शिवसेनेला साेडण्याचे दोन्ही पक्षाच्या वरीष्ठ नेत्यांमध्ये ठरले असल्याचा दावा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील करत आहेत. त्यामुळे मुक्ताईनगरची जागा काेणाकडे जाईल, याविषयी संभ्रम आहे. आघाडीत हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आहे. मात्र, अनेक वर्षांपासून पराभवच हाेत असल्याने आघाडीच्या गाेटात शांतताच आहे. वंचित बहुजन आघाडी व संभाजी ब्रिगेड यंदा निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहे.

संभाव्य उमेदवार-

भाजपकडून एकनाथ खडसे, त्यांच्या कन्या तथा जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे-खेवलकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, शिवसेनेकडून जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस डाॅ.जगदीश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य विनोद तराळ हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत.

हे प्रश्न अद्यापही कायम-

मुक्ताईनगरजवळून पूर्णा नदी वाहते. तरीही या शहराला पाणीटंचाईला तोंड द्यावे लागते. पावसाळ्यात गढूळ व गाळमिश्रित पाणी लोकांना प्यावे लागते. २० वर्षांत वारंवार आश्वासने देऊनही मुक्ताई उपसासिंचन, कुऱ्हा-वढोदा-इस्लामपूर उपसासिंचन योजना पूर्ण झालेली नाही. बोदवड तालुक्यातही पाणीप्रश्न गंभीर आहे. रोजगार निर्मितीच्या दृष्टीने उद्योगधंद्यांचा अभाव आहे.

जातीय समीकरणे-

आदिवासी ३ टक्के
मुस्लिम ८ टक्के
कोळी ७ टक्के
इतर ११ टक्के
धनगर ७ टक्के
गुजर ८ टक्के
मराठा पाटील ३० टक्के
लेवा पाटील २५ टक्के

२०१४ विधानसभा काैल-

एकनाथ खडसेे : (भाजप) ८४,९१३
चंद्रकांत पाटील : (शिवसेना) ७५,६१७
अरुण पाटील : (राष्ट्रवादी) ०६,४७९

लोकसभेतील काैल-

भाजप १ लाख ७,३८३
काँग्रेस ४७ हजार ५३०

Intro:जळगाव
गेली ३० वर्षे मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून सलग निवडून येत असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यावेळी निवडणूक लढवतात की नाही, याविषयी सस्पेन्स वाढला आहे. खडसेंसारखा मातब्बर नेता असताना मुक्ताईनगर मतदारसंघाचा हवा तसा विकास झालेला नाही. त्याचा फटका यावेळी भाजपला बसू शकतो. दुसरीकडे मित्रपक्ष असलेला शिवसेना देखील या जागेसाठी आग्रही आहे. सेनेकडून जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील इच्छुक आहेत. गेल्यावेळी त्यांनी खडसेंना चांगली टक्कर दिली होती.Body:सन १९९० पासून सलग सहा वेळा निवडून येणारे भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा बालेकिल्ला असलेला हा मतदारसंघ. विराेधी बाकावर असताना सत्ताधाऱ्यांशी संघर्ष करण्यात ३० वर्षे गेल्यानंतर जेव्हा सत्तेची फळे चाखण्याची वेळ अाली, तेव्हा मात्र खडसेंच्या नशिबी 'वनवास' अाला. मंत्रिपदावरून पायउतार झालेल्या खडसेंकडे सरकारने जसे दुर्लक्ष केले तशाच त्यांच्या मतदारसंघातील समस्याही प्रलंबितच राहिल्या. रखडलेले सिंचन प्रकल्प, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या अाणि राेजगार हे या मतदारसंघातील वर्षानुवर्षे रखडलेले प्रश्न आहेत. १९९५ च्या युतीच्या सत्ता काळातही हे प्रश्न हाेते, अाताच्या भाजप सरकारमध्येही ते कायम राहिले. २०१४ मध्ये राज्यात भाजपचे सरकार सत्तारूढ झाले तेव्हा खडसे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार हाेते. मात्र, महसूल मंत्रिपदावर त्यांची बाेळवण झाली. वर्षभराच्या अातच भ्रष्टाचाराच्या अाराेपांमुळे त्यांना मंत्रिपद साेडावे लागले. नंतर 'क्लीन चिट' मिळाली, पण पुन्हा मंत्रिपदपासून ते वंचितच राहिले. ही खदखद मनात ठेवून खडसेंनी अनेकदा जाहीरपणे अापल्याच सरकारला बाेल लावले. त्याचा परिपाक म्हणजे यंदाच्या निवडणुकीत सातव्यांदा त्यांना तिकीट मिळेल का, याविषयीच शंका अाहे.

खडसेंना शह देण्यासाठी स्वकियच टपलेले अाहेत. जिल्ह्यात भाजपच्या फलकावर अाता मुख्यमंत्र्यांच्या बराेबरीने गिरीश महाजन यांची छबी दिसते. तिथे खडसेंना स्थान राहिलेले नाही. गेल्या निवडणुकीत 'कांटे की टक्कर' देणारे शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटीलही खडसेंची कोंडी करण्याची संधी सोडत नाहीत. असे असले तरी खडसे अापला बालेकिल्ला राखून अाहेत. मात्र विराेधकांपेक्षा त्यांचा लढा स्वपक्षीयांशीच जास्त अाहे. २०१४ मध्ये खडसेंनी हरिभाऊ जावळेंचे तिकीट कापून स्नुषा रक्षा यांना खासदारकीची उमेदवारी दिली. पत्नी मंदाकिनी यांना महानंद-दूध संघाचे अध्यक्षपद, मुलगी रोहिणी यांना जिल्हा बँकेचे अध्यक्षपद, वस्त्रोद्योग महामंडळाचे उपाध्यक्षपद दिले. या कुटुंबकेंद्रित राजकारणाने कार्यकर्ते दुरावले आहेत. आता मुलगी रोहिणी खडसे यांच्या राजकीय पुनर्वसनाचे मुक्ताईनगरातून प्रयत्न होऊ शकतात.

असा आहे मुक्ताईनगर मतदारसंघ-

या मतदारसंघात ३ तालुक्यांतील १७४ गावांचा समावेश होतो. त्यात सावदा ते रावेरचा पट्टा केळी उत्पादकांचा पट्टा आहे. उर्वरित पट्ट्यातील प्रमुख पीक कापूस आहे. परंतु प्रक्रिया उद्याेगांचा अभाव असल्याने स्थानिक राेजगार नाही. जागतिक दर्जाच्या केळीचे उत्पन्न येथील शेतकरी घेतात. परंतु त्याच्या निर्यातीसाठी सक्षम यंत्रणा नाही. खासदार रक्षा खडसे यांच्या माध्यमातून रेल्वेची सुविधा मिळाली, तीही ताेकडीच ठरली आहे.

मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागल्यापासून नाराज असलेले खडसे पक्षावर नाराज अाहेत. अंतर्गत स्पर्धेतून खडसेंचे पंख छाटण्यात अाल्याची भावना त्यांच्या समर्थकांमध्ये अाहे. गेल्या निवडणुकीत शिवसेेेनेशी युती ताेडण्याचा निर्णय खडसेंनी जाहीर केला हाेता. तेव्हापासून शिवसेना खडसेंवर नाराज अाहे. 'प्रकृती अस्वास्थ्यामुळे यंदा निवडणूक लढवायची किंवा नाही याचा निर्णय ऐनवेळी घेऊ, असे खडसेंनी सांगितले अाहे. मात्र, त्यांनीच निवडणूक लढवावी, असा समर्थकांचा अाग्रह अाहे. दुसरीकडे मुक्ताईनगरची जागा शिवसेनेला साेडण्याचे वरिष्ठ नेत्यांमध्ये ठरले असल्याचा दावा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील करत अाहेत. त्यामुळे मुक्ताईनगरची जागा काेणाकडे जाईल, याविषयी संभ्रम अाहे. अाघाडीत हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे अाहे. मात्र, अनेक वर्षांपासून पराभवच हाेत असल्याने अाघाडीच्या गाेटात शांतताच अाहे. वंचित बहुजन अाघाडी व संभाजी ब्रिगेड मात्र यंदा निवडणूक लढविण्याच्या तयारीत अाहे.

संभाव्य उमेदवार-

भाजपकडून एकनाथ खडसे, त्यांच्या कन्या तथा जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे-खेवलकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, शिवसेनेकडून जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस डाॅ.जगदीश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य विनोद तराळ हे निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत.

हे प्रश्न अद्यापही कायम-

मुक्ताईनगरजवळून पूर्णा नदी वाहते. तरीही या शहराला पाणीटंचाईला तोंड द्यावे लागते. पावसाळ्यात गढूळ व गाळमिश्रित पाणी लोकांना प्यावे लागते. २० वर्षात वारंवार आश्वासने देऊनही मुक्ताई उपसा सिंचन, कुऱ्हा-वढोदा-इस्लामपूर उपसा सिंचन योजना पूर्ण झालेली नाही. बोदवड तालुक्यातही पाणीप्रश्न गंभीर आहे. रोजगार निर्मितीच्या दृष्टीने उद्योगधंद्यांचा अभाव आहे.Conclusion:जातीय समीकरणे-

आदिवासी ३ टक्के
मुस्लिम ८ टक्के
कोळी ७ टक्के
इतर ११ टक्के
धनगर ७ टक्के
गुजर ८ टक्के
मराठा पाटील ३० टक्के
लेवा पाटील २५ टक्के

२०१४ विधानसभा काैल-

एकनाथ खडसेे : (भाजप) ८४,९१३
चंद्रकांत पाटील : (शिवसेना) ७५,६१७
अरुण पाटील : (राष्ट्रवादी) ०६,४७९

लोकसभेतील काैल-

भाजप १ लाख ७,३८३
काँग्रेस ४७ हजार ५३०
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.