ETV Bharat / state

जिद्दीला सलाम... जळगावातील प्रयोगशील शेतकऱ्यांनी अडचणीतून शोधला मार्ग, शेतमालाची थेट ग्राहकांना करताहेत विक्री - vijay chaudhary

विजय चौधरी आणि कमलेश पाटील अशी या उपक्रमशील शेतकऱ्यांची नावे आहेत. त्यातील विजय चौधरी हे जळगाव तालुक्यातील उमाळे येथील तर कमलेश पाटील हे पारोळा तालुक्यातील बाहुटे येथील रहिवासी आहेत. दोघांनी कोरोनामुळे शेतकऱ्यांवर आलेल्या संकटाला संधी मानून त्यावर मात तर केलीच, शिवाय 'शेतकरी ते ग्राहक' या संकल्पनेच्या माध्यमातून शेतमाल विक्रीचा नवा पर्याय देखील शोधून काढला.

farmers motivate news
जिद्दीला सलाम... जळगावातील प्रयोगशील शेतकऱ्यांनी अडचणीतून शोधला मार्ग
author img

By

Published : Apr 18, 2020, 10:24 AM IST

जळगाव - कोरोनामुळे शेतमाल वाहतुकीची साखळी विस्कळीत झाल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. पिकलेला शेतमाल शेतातच सडू लागल्याने अनेकांचा धीर सुटत आहे. मात्र, अशाही विपरीत परिस्थितीत जळगावातील 2 प्रयोगशील शेतकऱ्यांनी अडचणीतून मार्ग शोधलाय. 'शेतकरी ते ग्राहक' या अभिनव संकल्पनेच्या माध्यमातून ते आपल्या शेतमालाची विक्री करत आहेत. विशेष म्हणजे, वाजवी दरात उत्तम शेतमाल घरपोच मिळत असल्याने त्याला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्साह दुणावला आहे.

जिद्दीला सलाम... जळगावातील प्रयोगशील शेतकऱ्यांनी अडचणीतून शोधला मार्ग

विजय चौधरी आणि कमलेश पाटील अशी या उपक्रमशील शेतकऱ्यांची नावे आहेत. त्यातील विजय चौधरी हे जळगाव तालुक्यातील उमाळे येथील तर कमलेश पाटील हे पारोळा तालुक्यातील बाहुटे येथील रहिवासी आहेत. दोघांनी कोरोनामुळे शेतकऱ्यांवर आलेल्या संकटाला संधी मानून त्यावर मात तर केलीच, शिवाय 'शेतकरी ते ग्राहक' या संकल्पनेच्या माध्यमातून शेतमाल विक्रीचा नवा पर्याय देखील शोधून काढला. विशेष म्हणजे, शेतमाल विक्रीच्या प्रक्रियेतील दलाल आणि व्यापारी ही साखळीच त्यांनी मोडून काढली. आपला शेतमाल आपण स्वतः कसा विक्री करायचा? याचे तंत्र त्यांना चांगलेच अवगत झाले असून यापुढेही ते याच पद्धतीने शेतमालाची विक्री करणार आहेत.

जळगाव जिल्ह्यातील बहुतांश भाग हा अवर्षणप्रवण आहे. याशिवाय गेल्या 4 ते 5 वर्षांपासून सातत्याने दुष्काळ पडत असल्याने जिल्ह्यातील शेती व्यवसायावर मोठा परिणाम झाला. मात्र, सुदैवाने गेल्या वर्षी पावसाळा चांगला झाला. त्यामुळे नद्या-नाले, विहिरी, कुपनलिकांना मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असल्याने अनेक शेतकऱ्यांनी पारंपरिक पीक पद्धतीला फाटा देऊन नव्या पीक पद्धतीचा अवलंब केला. अशाच प्रकारे विजय चौधरी यांनी आपल्या शेतात 6 एकरावर टरबूज तर कमलेश पाटील यांनी 5 एकरावर टरबूज तर 11 एकरावर खरबूज लागवड केली होती. लागवडीनंतर सुरुवातीपासून उत्तम पीक व्यवस्थापन केल्याने पीक बहरले. उत्तम फळधारणाही झाली. मात्र, ऐन फळ काढणीच्या वेळी सर्वत्र कोरोनाचा संसर्ग फैलावला. त्याला अटकाव करण्यासाठी लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे शेतमाल वाहतुकीची साखळी विस्कळीत झाली. अशा परिस्थितीत निर्यातक्षम टरबूज, खरबूज कसे विकायचा, हा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिला. व्यापाऱ्यांशी संपर्क साधला तर त्यांनी गरज लक्षात घेऊन कवडीमोल दरात माल मागितला. शेवटी आपणच हा माल विकायचा या जिद्दीने त्यांनी पाऊल टाकले. तेथूनच सोनेरी पहाट उजाडली.

farmers motivate news
जळगावातील प्रयोगशील शेतकऱ्यांनी अडचणीतून शोधला मार्ग, शेतमालाची थेट ग्राहकांना करताहेत विक्री
कृषी विभागाचे मिळाले पाठबळ-'शेतकरी ते ग्राहक' या अभिनव संकल्पनेच्या माध्यमातून दोघेही शेतमाल विकणार असल्याने कृषी विभागाने त्यांना पाठबळ दिले. शेतमाल विक्रीसाठी परवानेही उपलब्ध करून दिले. या कामी त्यांना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, कृषी उपसंचालक अनिल भोकरे यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. सध्या ते जळगाव शहरासह ग्रामीण भागातील ग्राहकांना थेट वाजवी दरात टरबूज, खरबूज विक्री करत आहेत. त्यांना ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

प्रयोगशीलतेमुळे टळले नुकसान-

विजय चौधरी आणि कमलेश पाटील यांनी प्रयोगशीलतेमुळे आपले आर्थिक नुकसान टाळले आहे. शेतात टरबूज आणि खरबूजचा माल तयार असताना शेतमाल वाहतुकीची साखळी विस्कळीत झाल्याने ते शेतातच खराब होण्याची भीती होती. व्यापाऱ्यांनी अडचण ओळखून नाडण्याचा प्रयत्न केला. पण ते खचले नाहीत. काहीतरी वेगळे करून दाखवण्याच्या जिद्दीमुळे त्यांचा योग्य मार्ग सापडला. सद्यस्थितीत दोघांच्या शेतातून प्रत्येकी 8 ते 10 टन माल निघतोय. ते 10 ते 12 प्रतिकिलो दराने टरबूज, खरबूज विक्री करत आहेत. या माध्यमातून दिवसाला 40 ते 42 हजार रुपयांची उलाढाल होत आहे. खर्चवजा जाता दोन पैसे हातात पडत आहेत. विक्रीतून नफा नाही, किमान शेतीत टाकलेला खर्च निघत असल्याचे समाधान आहे, असेही दोघांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.