ETV Bharat / state

सुव्यवस्थेचे धिंडवडे : जळगाव जिल्हा कारागृहात कैद्यांच्या बराकीत आढळला मोबाईल - कैद्यांच्या बराकीत आढळला मोबाईल

जिल्हा कारागृहात कैद्यांची झडती घेतली असता, बराक क्रमांक सहामध्ये इलेक्ट्रिक बोर्डामागे एक मोबाईल आढळून आला. या घटनेमुळे पुन्हा एकदा कारागृहाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.

कारागृह
कारागृह
author img

By

Published : Aug 12, 2020, 8:33 AM IST

जळगाव - जिल्हा कारागृहात कैद्यांची झडती घेतली असता, बराक क्रमांक सहामध्ये इलेक्ट्रिक बोर्डामागे एक मोबाईल आढळून आला. या घटनेमुळे पुन्हा एकदा कारागृहाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. दरम्यान, कारागृहातील कैद्यांना मोबाइल, त्याचप्रमाणे नशेचे साहित्य पुरवण्यात कारागृहातील काही कर्मचाऱ्यांचे लागेबांधे असल्याचा संशय व्यक्त होत आहे.

२५ जुलै रोजी कारागृह रक्षकाच्या डोक्याला पिस्तुल लावून सुशील मगरे, गौरव पाटील व सागर पाटील या तीन कैद्यांनी पलायन केले. या तिघांनी कारागृहात मोबाईल, पिस्तुलचा वापर केल्याचे तपासात उघड झाले आहे. यानंतर काही दिवसातच कारागृहाच्या भिंतीवरून आतमध्ये विडी बंडल, कपडे, साबण आत फेकताना दोन जणांना पोलिसांनी रंगेहात अटक केली. पलायन केलेले कैदी अद्याप पोलिसांच्या हाती लागले नाहीत. हे दोन्ही प्रकरण ताजे असताना मंगळवारी कारागृह अधीक्षक जोसेफ गायकवाड यांनी अचानकपणे कैद्यांची झडती घेतली. यावेळी बराक क्रमांक सहामध्ये इलेक्ट्रिक बोर्डाच्या मागे एक मोबाईल आढळून आला. हा मोबाईल कोणाचा आहे?, कारागृहात कसा आला?, कोण वापर करत होते? याबाबत कैद्यांना विचारणा केली असता कोणीही समाधानकारक उत्तर दिले नाही.

दरम्यान, कारागृहात मोबाईलचा सर्रासपणे वावर होत असल्याचे या घटनेतून उघड झाले आहे. बराक क्रमांक सहामध्ये गंभीर गुन्ह्यात संशयित असलेले कैदी आहेत. याशिवाय संपूर्ण कारागृहात ४०० पेक्षा जास्त बंदी आहेत. अशात थेट बराकमध्ये मोबाईल आढल्याने कारागृहाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. कैदी थेट मोबाईलच्या माध्यमातून बाहेरील लोकांशी संपर्कात असल्याचे यातून सष्ट झाले आहे.

कारागृह प्रशासनाचा माहिती लपविण्याचा प्रयत्न- या प्रकरणी कारागृह अधीक्षक गायकवाड यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी ही अफवा असल्याचे सांगत उत्तर देण्यास टाळाटाळ केली. तर काही कर्मचाऱ्यांनी घडलेल्या प्रकारास दुजोरा दिला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.