ETV Bharat / state

जळगावात १० वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार ; खाऊचे आमिष दाखवून गैरकृत्य - physical abuse cases in jalgaon

ही संतापजनक घटना शुक्रवारी दुपारी एक ते दीडच्या सुमारास शहरातील गोलाणी मार्केटमध्ये तिसऱ्या मजल्यावर घडली. मुलीवर अत्याचार केल्यानंतर नराधम घटनास्थळावरून पळून गेला. पीडित मुलगी तिच्या आजीसोबत भीक मागून उदरनिर्वाह करत असल्याची माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आली आहे.

jalgaon crime news
खाऊचे आमिष दाखवून एका नराधमाने 10 वर्षाच्या मुलीवर पाशवी अत्याचार केला.
author img

By

Published : Jul 10, 2020, 7:58 PM IST

जळगाव - खाऊचे आमिष दाखवून एका नराधमाने 10 वर्षाच्या मुलीवर पाशवी अत्याचार केला. ही संतापजनक घटना शुक्रवारी दुपारी एक ते दीडच्या सुमारास शहरातील गोलाणी मार्केटमध्ये तिसऱ्या मजल्यावर घडली. मुलीवर अत्याचार केल्यानंतर नराधम घटनास्थळावरून पळून गेला.

खाऊचे आमिष दाखवून एका नराधमाने 10 वर्षाच्या मुलीवर पाशवी अत्याचार केला.

पीडित मुलगी तिच्या आजीसोबत भीक मागून उदरनिर्वाह करत असल्याची माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आली आहे. शुक्रवारी दुपारी साधारणत: एक वाजेच्या सुमारास गोलाणी मार्केटजवळ असलेल्या हनुमान मंदिराच्या मागे पीडित मुलगी उभी होती. त्यावेळी एका अज्ञात नराधमाने 'तुला खाऊ देतो', असे सांगत तिला गोलाणी मार्केटच्या तिसऱ्या मजल्यावरील निर्जनस्थळी नेले. याठिकाणी आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर तो फरार झाला.

पीडित मुलगी रक्ताने माखलेल्या कपड्यांसह रडत खाली आली. तिने आपल्या आजीला सर्व हकीगत सांगितली. त्यानंतर आजीने पीडित नातीला सोबत घेत शहर पोलीस ठाणे गाठले. पीडितेचे कपडे रक्ताने माखले होते. भेदरलेली असल्यामुळे तिला व्यवस्थित माहिती देखील सांगता येत नव्हती. महिला पोलिसांनी तिला धीर देत हळूहळू बोलते केले.

सीसीटीव्हीत धागेदोरे?

या घटनेनंतर शहर पोलिसांनी तात्काळ गोलाणी मार्केट गाठले. पीडित मुलीकडून घटनास्थळ आणि घटनेबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली. टाळेबंदीमुळे संपूर्ण मार्केट बंद आहे. त्याचाच फायदा घेऊन त्या नराधमाने हे गैरकृत्य केले आहे. शहर पोलीस मार्केटमधील दुकानांच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यातून पोलिसांना धागेदोरे मिळू शकतात. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.