ETV Bharat / state

जो आडवा येईल, त्याला पाणी पाजणार - गुलाबराव पाटील - गुलाबराव पाटील

आगामी काळात राज्यात 'मराठवाडा ग्रीड' नावाची महत्त्वाकांक्षी योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेसाठी सुमारे 22 हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत. ही योजना कार्यान्वित झाल्यानंतर राज्यातील प्रत्येक गावालाच नाही तर प्रत्येक घराला मुबलक प्रमाणात पाणी पुरवठा केला जाणार आहे

jalgaon
जो आडवा येईल, त्याला पाणी पाजणार - गुलाबराव पाटील
author img

By

Published : Jan 19, 2020, 11:41 PM IST

जळगाव - मला कॅबिनेट मंत्री म्हणून पाणीपुरवठा खाते मिळाले आहे. हे खाते म्हणजे लोकांना तर पाणी द्यायचेच आहे. याशिवाय जो आडवा येईल, त्याला पाणी पाजण्याचे काम मला करावे लागणार आहे, अशा विनोदी शैलीत मंत्री गुलाबराव पाटील यांनी विरोधकांचा समाचार घेतला. राज्याच्या अनेक भागात पाण्याची समस्या अद्यापही कायम आहे. उन्हाळ्यात तर पाणीटंचाईचे संकट अधिक गडद होते. पाणी संकटावर मात करण्यासाठी राज्य शासनाकडून 'मराठवाडा ग्रीड' नावाची महत्त्वाकांक्षी योजना राबविण्यात येणार आहे, या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक घराला पाणी मिळणार आहे, अशी माहिती राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथे आयोजित एका छोटेखानी कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.

जो आडवा येईल, त्याला पाणी पाजणार - गुलाबराव पाटील

हेही वाचा - कडाक्याच्या थंडीचा केळीला फटका; 'चरका' आणि 'करपा' रोगाचा प्रादुर्भाव

यावेळी गुलाबराव पाटील यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात उदभवलेली राजकीय परिस्थिती, मंत्रिपदाची घालमेल अशा विषयांवर आपल्या खास शैलीत चिमटे देखील काढत उपस्थितांचे चांगलेच मनोरंजन केले. ते पुढे म्हणाले, आगामी काळात राज्यात 'मराठवाडा ग्रीड' नावाची महत्त्वाकांक्षी योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेसाठी सुमारे 22 हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत. ही योजना कार्यान्वित झाल्यानंतर राज्यातील प्रत्येक गावालाच नाही तर प्रत्येक घराला मुबलक प्रमाणात पाणी पुरवठा केला जाणार आहे, असेही पाटील यांनी सांगितले.

मंत्रिपदाची अपेक्षा नव्हतीच

विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर मला कॅबिनेट मंत्रिपद मिळेल, अशी अपेक्षा नव्हती. मंत्रिपद जाहीर होण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत माझे नाव यादीत नव्हते. ऐनवेळी मला मातोश्रीवरून फोन आला आणि माझा जीव भांड्यात पडला. मंत्रिपद जाहीर झाल्यानंतर मला कोणते खाते मिळेल, याची चर्चा रंगली. मात्र, 3 लोकांची पार्टनरशीप असलेले सरकार, त्यातही प्रत्येकाचे 15 मंत्री असे असताना मला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी कॅबिनेट मंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली. यातच मी समाधान मानले. आता या संधीचे सोने करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे, असेही गुलाबराव पाटील म्हणाले.

Intro:जळगाव
राज्याच्या अनेक भागात पाण्याची समस्या अद्यापही कायम आहे. उन्हाळ्यात तर पाणीटंचाईचे संकट अधिक गडद होते. पाणी संकटावर मात करण्यासाठी राज्य शासनाकडून 'मराठवाडा ग्रीड' नावाची एक महत्त्वाकांक्षी योजना राबविण्यात येणार आहे, या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक घराला पाणी मिळणार आहे, अशी माहिती राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.Body:जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथे आयोजित एका छोटेखानी कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी गुलाबराव पाटील यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात उदभवलेली राजकीय परिस्थिती, मंत्रिपदाची घालमेल अशा विषयांवर आपल्या खास शैलीत चिमटे देखील काढत उपस्थितांचे चांगलेच मनोरंजन केले. ते पुढे म्हणाले, आगामी काळात राज्यात 'मराठवाडा ग्रीड' नावाची एक महत्त्वाकांक्षी योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेसाठी सुमारे 22 हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत. ही योजना कार्यान्वित झाल्यानंतर राज्यातील प्रत्येक गावालाच नाही तर प्रत्येक घराला मुबलक प्रमाणात पाणी पुरवठा केला जाणार आहे, असेही गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

मंत्रिपदाची अपेक्षा नव्हतीच-

विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर मला कॅबिनेट मंत्रिपद मिळेल, अशी अपेक्षा नव्हती. मंत्रिपद जाहीर होण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत माझं नाव यादीत नव्हते. ऐनवेळी मला मातोश्रीवरून फोन आला आणि माझा जीव भांड्यात पडला. मंत्रिपद जाहीर झाल्यानंतर मला कोणते खाते मिळेल, याची चर्चा रंगली. मात्र, 3 लोकांची पार्टनरशीप असलेले सरकार. त्यातही प्रत्येकाचे 15 मंत्री. असे असताना मला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मला कॅबिनेट मंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली. यातच मी समाधान मानले. आता या संधीचे सोने करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे, असेही गुलाबराव पाटील म्हणाले.Conclusion:...जो आडवा येईल, त्याला पाणी पाजणार-

मला कॅबिनेट मंत्री म्हणून पाणीपुरवठा खाते मिळाले आहे. हे खाते म्हणजे लोकांना तर पाणी द्यायचेच आहे. याशिवाय जो आडवा येईल, त्याला पाणी पाजण्याचे काम मला करावे लागणार आहे, अशा विनोदी शैलीत त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.