ETV Bharat / state

कालच शिवसेनेत आले, मंत्रीपद मिळाले तरीही नाराजी कशाला; गुलाबराव पाटलांचा सत्तारांना टोला

अब्दुल सत्तार यांच्या नाराजी नाट्याविषयी, "त्यांनी नाराज होण्याची गरजच नव्हती. कारण शिवसेनेने रामदास कदम, दिवाकर रावते आणि भास्कर जाधव यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना मंत्रिपदे दिली नाहीत. दुसरीकडे, अब्दुल सत्तार हे कालच शिवसेनेत आले. तरीही त्यांना पक्षाने राज्यमंत्री पद दिले. असे असताना त्यांनी नाराज का म्हणून व्हावे", अशी प्रतिक्रीया शिवसेनेचे उपनेते तथा नवनियुक्त पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.

patil
पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील
author img

By

Published : Jan 5, 2020, 5:37 PM IST

जळगाव - 'कालच शिवसेनेत आले आणि राज्यमंत्री पद मिळाले. त्यामुळे पक्षावर नाराजी व्यक्त न करता समाधानी राहिले पाहिजे' अशा शब्दात शिवसेनेचे उपनेते तथा नवनियुक्त पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी अब्दुल सत्तार यांना टोला लगावला आहे. आज(5 जानेवारी) दुपारी तालुक्यातील शिरसोली येथे आयोजित एका कार्यक्रमावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

अब्दुल सत्तार यांच्या नाराजी नाट्याविषयी पत्रकारांनी विचारणा केली असता ते म्हणाले की, "अब्दुल सत्तार यांनी आपण नाराज नसून मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला नाही, असे कालच पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर जाहीर केले आहे. मात्र, जर ते नाराज होते तर, त्यांनी नाराज होण्याची गरजच नव्हती. कारण शिवसेनेने रामदास कदम, दिवाकर रावते आणि भास्कर जाधव यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना मंत्रिपदे दिली नाहीत. दुसरीकडे, अब्दुल सत्तार हे कालच शिवसेनेत आले. तरीही त्यांना पक्षाने राज्यमंत्री पद दिले. असे असताना त्यांनी नाराज का म्हणून व्हावे"

हेही वाचा - 'मी राजीनामा देणार नाही, कुणीतरी अफवा पसरवली'

गुलाबराव पाटील यांना कृषी खाते मिळणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले होते. मात्र, ऐनवेळी त्यांना पाणीपुरवठा व स्वच्छता खाते मिळाले. यासंदर्भात विचारणा केली असता, ते म्हणाले "मला पक्षाकडून पाणीपुरवठा व स्वच्छता खाते मिळाले याचा मला आनंद आहे. पाणी हा विषय राज्यातील सर्व नागरिकांशी निगडीत आहे. त्यामुळे मी या खात्याचा मंत्री म्हणून अधिकाधिक चांगले काम करायचा प्रयत्न करणार आहे. प्रत्येक वाड्या-वस्त्यांसह प्रत्येक गावात पाणी पोहचवण्यावर माझा भर असेल" या खात्याच्या माध्यमातून परमार्थासोबतच समाजसेवा करण्याची संधी मिळणार असल्याची भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

Intro:जळगाव
कालच शिवसेनेत आले, राज्यमंत्रिपद मिळाले. तरीही पक्षाविषयी नाराजीचा सूर कशाला आवळता, अशा शब्दांत शिवसेनेचे उपनेते तथा नवनियुक्त पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी अब्दुल सत्तार यांना टोला लगावला आहे.Body:रविवारी दुपारी जळगाव तालुक्यातील शिरसोली येथे आयोजित एका कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर गुलाबराव पाटील पत्रकारांशी बोलत होते. अब्दुल सत्तार यांच्या नाराजी नाट्याविषयी पत्रकारांनी विचारणा केली असता ते पुढे म्हणाले की, अब्दुल सत्तार यांनी आपण नाराज नसून मंत्रिपदाचा देखील राजीनामा दिलेला नाही, असे कालच पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर जाहीर केले आहे. मात्र, जर ते नाराज होते तर मात्र, त्यांनी नाराज होण्याची गरजच नव्हती. कारण शिवसेनेने रामदास कदम असतील, दिवाकर रावते असतील तसेच भास्कर जाधव यांच्या सारख्या ज्येष्ठ नेत्यांना मंत्रिपदे दिली नाहीत. दुसरीकडे, अब्दुल सत्तार हे कालच शिवसेनेत आले. तरीही त्यांना पक्षाने राज्यमंत्रिपद दिले. असे असताना त्यांनी नाराज का म्हणून व्हावं, असे गुलाबराव पाटील यांनी यावेळी सांगितले.Conclusion:मिळालेल्या खात्याविषयी आनंदच-

गुलाबराव पाटील यांना कृषी खाते मिळणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले होते. मात्र, ऐनवेळी त्यांना पाणीपुरवठा व स्वच्छता खाते मिळाले. यासंदर्भात विचारणा केली असता, ते म्हणाले, मला पक्षाकडून पाणीपुरवठा व स्वच्छता खाते मिळाले याचा मला आनंद आहे. पाणी हा विषय राज्यातील सर्व नागरिकांशी निगडीत आहे. त्यामुळे मी या खात्याचा मंत्री म्हणून अधिकाधिक चांगले काम करायचा प्रयत्न करणार आहे. प्रत्येक वाड्या-वस्त्यांसह प्रत्येक गावात पाणी पोहचविण्यावर माझा भर असेल. या खात्याच्या माध्यमातून परमार्थासोबतच मला समाजसेवा करण्याची संधी मिळणार आहे, असेही ते म्हणाले.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.