ETV Bharat / state

Gulabrao Patil Reaction : एलसीबीसारखी आता ED झाली - मंत्री गुलाबराव पाटील - गुलाबराव पाटील प्रतिक्रिया यशवंत जाधव आयटी छापा

शिवसेनेचे मुंबई महानगरपालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्या घरी आयकर विभागाने छापेमारी (IT Raid) केली. या बाबत पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

minister gulabrao patil
मंत्री गुलाबराव पाटील
author img

By

Published : Feb 25, 2022, 3:40 PM IST

Updated : Feb 25, 2022, 4:46 PM IST

जळगाव - शिवसेनेचे मुंबई महानगरपालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्या घरी आयकर विभागाने छापेमारी (IT Raid) केली. या बाबत पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ईडी आता एलसीबीसारखी झाली असल्याचा टोला त्यांनी लगावला.

गुलाबराव पाटील - पालकमंत्री, जळगाव

नवाब मलिक यांना अटक झाल्यानंतर शिवसेनेचे मुंबई महानगरपालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्याकडे आयकर विभागाने छापेमारी केली. यावर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. गुलाबराव पाटील म्हणाले की, एलसीबीसारखी आता ED झाली असून, रोज मरेमरे त्याला कोण रडे अशी परिस्थिती या ED ने केली आहे. जोपर्यंत चालवायचे तोपर्यंत चालू द्या, अशी प्रतिक्रिया मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.

यशवंत जाधव यांच्या घरावर छापा -

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर आता केंद्रीय तपास यंत्रणांनी आपला मोर्चा शिवसेनेकडे वळवला आहे. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सकाळी मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष आणि शिवसेना नेते यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्या माझगाव येथील घरावर छापा टाकला. आयकर विभाग अधिकारी सीआरपीएफ जवानांसह सकाळीच यशवंत जाधव यांच्या घरी दाखल झाले होते. त्यानंतर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी घरातच यशवंत जाधव यांची चौकशी सुरु केली.

Last Updated : Feb 25, 2022, 4:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.