ETV Bharat / state

'सगळं पाप करावं पण ग्रामपंचायतीची निवडणूक लढू नये'

जळगाव तालुक्यातील शिरसोली प्र.बो. येथील ग्रामपंचायतीच्या नवीन इमारतीसह विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी त्यांनी राजकारणाबाबत आपल्या खुमासदार शैलीत मत मांडले.

मंत्री गुलाबराव पाटील
मंत्री गुलाबराव पाटील
author img

By

Published : Oct 3, 2020, 7:48 PM IST

Updated : Oct 3, 2020, 9:36 PM IST

जळगाव - सगळ्यात वाईट राजकारण कुठले असेल तर ते ग्रामपंचायतीचे असते. आमदारकीची निवडणूक सोपी असते. पण, ग्रामपंचायतीची महाकठीण असते. राजकारणाच्या भाजीचे तरण म्हणजे ग्रामपंचायत असते. म्हणूनच सगळ पाप कराव पण ग्रामपंचायतीची निवडणूक लढू नये, असे मत राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले.

बोलताना मंत्री गुलाबराव पाटील

जळगाव तालुक्यातील शिरसोली प्र.बो. येथील ग्रामपंचायतीच्या नवीन इमारतीसह विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा शनिवारी (दि. 3 ऑक्टोबर) दुपारी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी ते बोलत होते. गुलाबराव पाटील यांनी यावेळी आपल्या खुमासदार शैलीत ग्रामपंचायतीच्या राजकारणाविषयी मत मांडले.

मंत्री पाटील म्हणाले, कोणत्याही ग्रामपंचायतीचे राजकारण खूप कठीण असते. त्यापेक्षा आमदारकीची निवडणूक सोपी असते. आमदारकीच्या निवडणुकीत उमेदवाराला एका गावात मत मिळाले नाही तर दुसऱ्या गावात मत मिळून जाते. एका विशिष्ट जातीचे मत मिळाले नाही तर दुसऱ्या जातीचे मत मिळून जाते. पण, ग्रामपंचायत निवडणुकीत एकाच वॉर्डात मत घ्यायचे असते. त्यामुळे अनेकदा जुना बदला घेतला जातो. खूप बारीक राजकारण ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत केले जाते. त्यामुळे मी नेहमी म्हणतो की, राजकारणाच्या भाजीचे तरण म्हणजे ग्रामपंचायत असते. म्हणूनच सगळ पाप कराव पण ग्रामपंचायतीची निवडणूक लढू नये, असे गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

...तोपर्यंत विरोधी पक्षनेत्याला टीव्हीवाले पण बघत नाहीत

शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी महाविकास आघाडी सरकारवर केलेल्या टिकेबद्दल पत्रकारांनी गुलाबराव पाटील यांना विचारणा केली असता ते म्हणाले, भाजपच्या काळात झालेल्या कर्जमाफीची प्रक्रिया 3 वर्षे चालली. पण, आम्ही दिलेल्या कर्जमाफीची प्रक्रिया अवघ्या 8 महिन्यांत पूर्ण झाली, तेही कोरोनाच्या काळात. एवढेच नाही तर आता प्रत्येक शेतकऱ्याला अपघात विम्याचे 2 लाखांपर्यंतचे संरक्षण देण्याची योजना प्रस्तावित आहे. राज्य सरकार ही जबाबदारी घेणार आहे. 2 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण झाली. आता 2 लाखांहून अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांचे सर्वेक्षण सुरू आहे. ज्यांनी नियमित कर्जाची परतफेड केली त्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन देण्याचे काम सुरू आहे. येत्या डिसेंबरपर्यंत 2 लाखांहून अधिक कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर लाभाची रक्कम जमा होईल. भाजपचे नेते महाविकास आघाडी सरकारच्या कामकाजावर बोलूच शकत नाहीत. विरोधी पक्ष नेत्याचे कामच असते बोलणे आणि सरकारचे काम असते काम करून दाखवणे. जोपर्यंत विरोधी पक्षनेता बोलत नाही, तोपर्यंत विरोधी पक्षनेत्याला टीव्हीवाले पण बघत नाहीत, असा टोलाही गुलाबराव पाटील यांनी प्रवीण दरेकरांना लगावला.

हेही वाचा - बलात्काऱ्यांना फाशी द्या, उत्तरप्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करा; राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

Last Updated : Oct 3, 2020, 9:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.