ETV Bharat / state

जळगाव ग्रामीण मतदारसंघातून सेनेचे गुलाबराव पाटील विजयी

राज्यभरात सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया आज सकाळी आठपासून सुरू करण्यात आली. जळगाव ग्रामीण या मतदार संघातून सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील हे 46 हजार मतांनी विजयी झाल्याचे घोषित करण्यात आले. मतदारसंघातील लढत खऱ्या अर्थाने भाजपच्या बंडखोरीने गाजली होती. भाजपचे चिन्ह व प्रचार साहित्याचा सर्रास उपयोग करत बंडखोर उमेदवार चंद्रशेखर अत्तरदेंनी प्रचार केला. त्यामुळे गुलाबराव पाटलांनी हा मुद्दा लावून धरत गिरीश महाजनांशी वाद घातला होता.

जळगाव ग्रामीण मतदारसंघातून सेनेचे गुलाबराव पाटील विजयी
author img

By

Published : Oct 24, 2019, 6:11 PM IST

Updated : Oct 24, 2019, 9:46 PM IST

जळगाव - सहकार राज्यमंत्री व शिवसेना उमेदवार गुलाबराव पाटील यांनी जळगाव ग्रामीण मतदारसंघातून सुमारे 46 हजार मतांची आघाडी घेत पुन्हा विजयी झाले आहेत. गुलाबराव पाटील यांच्याविरोधात राष्ट्रवादीच्या उमेदवार पुष्पा महाजन यांच्यासह भाजपचे बंडखोर चंद्रशेखर अत्तरदे यांचे आव्हान होते. मात्र, पाटील यांनी त्यांना अस्मान दाखवले आहे.

जळगाव ग्रामीण मतदारसंघातून सेनेचे गुलाबराव पाटील विजयी

हेही वाचा - जळगावात कोण राखणार गड? उत्सुकता शिगेला...

राज्यभरात सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया आज सकाळी आठपासून सुरू करण्यात आली. जळगाव ग्रामीण या मतदार संघातून सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील हे 46 हजार मतांनी विजयी झाल्याचे घोषित करण्यात आले. मतदारसंघातील लढत खऱ्या अर्थाने भाजपच्या बंडखोरीने गाजली होती. भाजपचे चिन्ह व प्रचार साहित्याचा सर्रास उपयोग करत बंडखोर उमेदवार चंद्रशेखर अत्तरदेंनी प्रचार केला. त्यामुळे गुलाबराव पाटलांनी हा मुद्दा लावून धरत गिरीश महाजनांशी वाद घातला होता. या वादामुळे निवडणुकीच्या प्रचारात अधिक रंग भरला गेला. शिवाय लढत चुरशीची होवून निकाल गुलाबराव पाटील यांना कमी मताधिक्‍य मिळण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली होती. मात्र, यामध्ये गुलाबराव पाटील यांनी बाजी मारत बंडखोर उमेदवार अत्तरदे हे खुप पिछाडीवर राहिले.

हेही वाचा - जळगाव LIVE : मुक्ताईनगरमध्ये रोहिणी खडसेंचा धक्कादायक पराभव... अपक्ष चंद्रकांत पाटील विजयी

जळगाव ग्रामीण मतदार संघातील पुर्ण झालेल्या मतमोजणीनंतर गुलाबराव पाटील यांना 93 हजार 209 प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांना 51 हजार 139 मते मिळवून दुसऱ्या क्रमांकावर आहे. राष्ट्रवादीच्या उमेदवार पुष्पा महाजन यांची मतसंख्या आतापर्यंत 14 हजार 327 एवढीच आहे. यामुळे जळगाव ग्रामीणवर शिवसेनेने आपले वर्चस्व कायम राखत जागा काबीज केली आहे.

Intro:जळगाव
सहकार राज्यमंत्री व शिवसेना उमेदवार गुलाबराव पाटील यांनी जळगाव ग्रामीण मतदारसंघातून सुमारे 46 हजार मतांची आघाडी घेत पुन्हा विजयी झाले आहेत. गुलाबराव पाटील यांच्याविरोधात राष्ट्रवादीच्या उमेदवार पुष्पा महाजन यांच्यासह भाजपचे बंडखोर चंद्रशेखर अत्तरदे यांचे आव्हान होते. मात्र, पाटलांनी त्यांना अस्मान दाखवले आहे.Body:राज्यभरात सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया आज सकाळी आठपासून सुरू करण्यात आली. जळगाव ग्रामीण या मतदार संघातून सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील हे 46 हजार मतांनी विजयी झाल्याचे घोषित करण्यात आले. या मतदारसंघातील लढत खऱ्या अर्थाने गाजली ती भाजपच्या बंडखोरीने. भाजपचे चिन्ह व प्रचार साहित्याचा सर्रास उपयोग करत बंडखोर उमेदवार चंद्रशेखर अत्तरदेंनी प्रचार केला. त्यामुळे गुलाबराव पाटलांनी हा मुद्दा लावून धरत गिरीश महाजनांशी वाद घातला होता. या वादामुळे निवडणुकीच्या प्रचारात अधिक रंग भरला गेला. शिवाय लढत चुरशीची होवून निकाल गुलाबराव पाटील यांना कमी मताधिक्‍य मिळण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली होती. परंतु यामध्ये गुलाबराव पाटील यांनी बाजी मारत बंडखोर उमेदवार अत्तरदे हे खुप पिछाडीवर राहिले.Conclusion:जळगाव ग्रामीण मतदार संघातील पुर्ण झालेल्या मतमोजणीनंतर गुलाबराव पाटील यांना 93 हजार 209 प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांना 51 हजार 139 मते मिळवून दुसऱ्या क्रमांकावर आहे. राष्ट्रवादीच्या उमेदवार पुष्पा महाजन यांची मतसंख्या आतापर्यंत 14 हजार 327 एवढीच आहे. यामुळे जळगाव ग्रामीणवर शिवसेनेने आपले वर्चस्व कायम राखत जागा काबीज केली आहे.
Last Updated : Oct 24, 2019, 9:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.