ETV Bharat / state

बिहारमध्ये प्रचारात भाजपच्या बंडखोरीचा मुद्दा मांडणार- गुलाबराव पाटील

बिहार विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारात आम्ही भाजपच्या बंडखोरीचा मुद्दा मतदारांसमोर मांडणार आहोत, अशी माहिती शिवसेनेचे प्रवक्ते तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.

author img

By

Published : Oct 9, 2020, 4:30 PM IST

Updated : Oct 9, 2020, 4:39 PM IST

minister gulabrao patil
मंत्री गुलाबराव पाटील

जळगाव - महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत भाजपने शिवसेनेसोबत युतीचे नाटक करून बंडखोरीला खतपाणी घातले. या माध्यमातून शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न केला. आता बिहारमध्ये भाजप हाच फॉर्म्युला वापरून नितीश कुमारांना संपवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे बिहार विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारात आम्ही भाजपच्या बंडखोरीचा मुद्दा मतदारांसमोर मांडणार आहोत, अशी माहिती शिवसेनेचे प्रवक्ते तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज जळगावात दिली.

मंत्री गुलाबराव पाटील

शहरातील अजिंठा विश्रामगृहात गुलाबराव पाटील पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी बिहार विधानसभा निवडणूक, एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा अशा विषयांवर मते मांडली. ते पुढे म्हणाले, बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पक्षाने माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला 'स्टार प्रचारक' म्हणून संधी दिली आहे. हा जळगाव आणि खान्देशाचा सन्मान आहे, असे मी मानतो. योगायोगाने आपल्या आणि त्यांच्या प्रदेशातील भाषेचा वेगळा वेगळा प्रभाव असणार आहे. मी निश्चितच पक्षासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करणार आहे, असेही गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

भाजपचा चेहरा उघड करू-

भाजपने महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीवेळी बंडखोरीच्या माध्यमातून शिवसेनेसोबत जो दगाफटका केला, तोच कित्ता आता ते बिहारमध्ये नितीश कुमार यांच्यासोबत गिरवत आहेत. आपण पाहिले असेल की बिहारमध्ये लोक जनशक्ती पार्टी कोणी दुसरं नाही तर भाजप फोडत आहे. भाजपने ज्याप्रमाणे महाराष्ट्रात युती असूनही आमच्या विरोधात अधिकृत बंडखोर उमेदवार उभे केले होते, त्याचप्रमाणे आता भाजपकडून तिकीट नाकारलेले लोक जनशक्ती पार्टीमध्ये जात आहेत. म्हणजेच 'चीत भी मेरी आणि पट भी मेरी', अशी भाजपची खेळी आहे. ज्याठिकाणी नितीश कुमारांचा उमेदवार आहे, त्याचठिकाणी लोक जनशक्ती पार्टीच्या उमेदवाराला भाजपकडून बळ दिले जात आहे.

ज्याप्रकारे महाराष्ट्रात बंडखोरीतून शिवसेनेची कोंडी करत संपवण्याचा प्रयत्न केला. तशाच प्रकारे नितीश कुमारांच्या उमेदवाराला पाडण्याचा प्रयत्न होणार आहे. आधी शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न झाला, नंतर पंजाबमध्ये बादलांना संपवण्याचा प्रयत्न केला. आता बिहारमध्ये नितीश कुमारांचा गेम करण्याचा भाजपचा उद्देश आहे. हाच मुद्दा आम्ही प्रचारात मांडून भाजपचा चेहरा उघड करू, असे गुलाबराव पाटील म्हणाले. दरम्यान, शिवसेनेवर भाजपकडून हिंदुत्त्व आणि मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून होणाऱ्या टीकेबाबत मत मांडताना त्यांनी सांगितले की, आम्ही बिहारमध्ये हिंदीतून प्रचार करू म्हणून विरोधक टीका करत आहेत. पण हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे. आम्ही हिंदुस्थानात असतो तेव्हा हिंदुस्थानी असतो आणि महाराष्ट्रात असतो तेव्हा मराठी असतो. शिवसेनाप्रमुखांनी देखील आम्हाला हेच सांगितले असल्याचे ते म्हणाले.

खडसे कुठेही गेले तरी आनंदच-

भाजपचे माजीमंत्री एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा सुरू आहे. याबाबत विचारणा केली असता गुलाबराव पाटील म्हणाले की, एकनाथ खडसे हे ज्येष्ठ नेते आहेत. लीडर म्हणून त्यांची पत आहेच. ते 30 वर्षे आमदार राहिले आहेत. मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. ते शिवसेनेत आले, राष्ट्रवादी गेले किंवा काँग्रेसमध्ये गेले तरी आम्हाला आनंद आहे. खडसे भाजपतून गेले, हा विषय आमच्यासाठी महत्त्वाचा आहे, असे मत त्यांनी मांडले.

Last Updated : Oct 9, 2020, 4:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.