ETV Bharat / state

लॉकडाऊनचा फटका : जळगावात भासतोय औषधांचा तुटवडा, रुग्णांना मनस्ताप

लॉकडाऊनमुळे अन्य शहरांसह राज्यांमधून येणारा औषधींचा पुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे आता दुर्धर आजारांवरील महागड्या औषधे मिळणे कठीण झाले आहे. लॉकडाऊनमुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही ठप्प आहे. अशा परिस्थितीत वाहतूक व्यवस्था देखील प्रभावित झाल्याने जळगावात विविध प्रकारच्या औषधांचा तुटवडा भासत आहे.

medicine-shortage-in-jalgoan-due-to-lockdown
लॉकडाऊनचा फटका : जळगावात भासतोय औषधांचा तुटवडा
author img

By

Published : Apr 1, 2020, 7:16 PM IST

जळगाव - कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारने देशभरात 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. लॉकडाऊनमुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही ठप्प आहे. अशा परिस्थितीत वाहतूक व्यवस्था देखील प्रभावित झाल्याने जळगावात विविध प्रकारच्या औषधांचा तुटवडा भासत आहे.

लॉकडाऊनमुळे अन्य शहरांसह राज्यांमधून येणारा औषधींचा पुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे आता दुर्धर आजारांवरील महागड्या औषधे मिळणे कठीण झाले आहे.

लॉकडाऊनचा फटका : जळगावात भासतोय औषधांचा तुटवडा

गेल्या आठवड्यात 24 मार्च रोजी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. लॉकडाऊन सुरू होऊन काही दिवस उलटल्यानंतर आता त्याचे विपरीत परिणाम जाणवत आहेत. मुखत्त्वे करून जळगाव जिल्ह्यात औषधींचा तुटवडा जाणवत आहे. मधुमेह, अति रक्तदाब यासारख्या अनेक गंभीर स्वरुपाच्या आजारांसह मूत्रपिंड, यकृत प्रत्यारोपण, कर्करोग, पक्षघाताची मोठी शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांना आवश्यक असलेली औषधे मिळत नसल्याचे समोर आले आहे. स्थानिक बाजारपेठेतील बहुसंख्य मेडिकल्समध्ये असलेला औषधांचा साठा आता संपला आहे. नव्याने मागणी नोंदवूनही औषधींचा पुरवठा कंपन्यांकडून होत नाहीये. लॉकडाऊनमुळे औषधी कंपन्यांच्या उत्पादनावर देखील मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला आहे. कंपन्यांमध्ये लॉकडाऊनपूर्वी उत्पादित झालेला साठाही वाहतूक व्यवस्था ठप्प असल्याने स्थानिक पातळीपर्यंत पुरवण्यात अडचणी येत आहेत.

रुग्णांना होतोय मनस्ताप -

गरजू रुग्णांना वेळेवर औषधी मिळत नसल्याने त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहरातील नामांकित मेडिकल्समध्ये देखील आवश्यक ती औषधी तसेच इतर सामुग्री मिळत नसल्याचे पाहायला मिळत आहे. लॉकडाऊनला सुरुवात झाल्यानंतर काही लोकांनी खबरदारी म्हणून आवश्यक ती औषधी गरजेपेक्षा अधिक प्रमाणात घेऊन ठेवली आहे. त्यामुळे देखील काही औषधी संपली आहेत. औषधींचा तुटवडा जाणवत असल्याने रुग्णांची होणारी अडचण लक्षात घेऊन काही मेडिकल्स चालक मागणी नोंदवून घेत आहेत. त्यानंतर जसजसा औषधींचा साठा उपलब्ध होत आहे, तसा तो मागणीनुसार रुग्णांना पुरवत आहेत.

महानगरांमध्ये शस्त्रक्रिया झालेल्यांचे हाल-

अनेक रुग्ण मूत्रपिंड, यकृत प्रत्यारोपण, कर्करोग, पक्षघाताची मोठी शस्त्रक्रिया मुंबई, पुण्यासारख्या महानगरातील नामांकित दवाखान्यात करतात. तेथे शस्त्रक्रिया झाल्यानंतर प्रकृती सुधारण्यासाठी आवश्यक असलेली औषधी देखील त्याठिकाणीच मिळते. मात्र, लॉकडाऊनमुळे सार्वजनिक तसेच खासगी वाहतूक व्यवस्था बंद असल्याने औषधी घेण्यास जात येत नाहीये. अशा परिस्थितीत मुंबई, पुणे अशा महानगरांमध्ये शस्त्रक्रिया झालेल्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.