ETV Bharat / state

Jayashree Mahajan : 'शिवसेना सोडून शिंदे गटात येण्यासाठी दबाव'; जळगावच्या महापौरांचा गंभीर आरोप - महापौर जयश्री महाजन मराठी बातमी

शिंदे गटात खासदारानंतर कार्यकर्तेही दाखल होत आहे. त्यात आता शिंदे गटात सामील होण्यासाठी दबाव आणत असल्याचा आरोप जयश्री महाजन यांनी केला ( jayashree mahajan allegation shinde group ) आहे.

Jayashree Mahajan
Jayashree Mahajan
author img

By

Published : Jul 22, 2022, 8:19 PM IST

जळगाव - एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 40 आमदारांसह बंड केलं. त्यानंतर त्यांनी भाजपसोबत जात सत्ता स्थापन केली. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री. एकनाथ शिंदेंनी बंड केल्याने शिवसेनेत दोन गट पडले आहे. शिंदे गटात खासदारानंतर कार्यकर्तेही दाखल होत आहे. त्यात आता जळगावच्या महापौरांनी शिंदे गटावर गंभीर आरोप केला आहे. त्यांच्यावर शिंदे गटात सामील होण्यासाठी दबाव आणत असल्याचे, महापौर जयश्री महाजन यांनी म्हटलं ( jayashree mahajan allegation shinde group ) आहे.

जयश्री महाजन प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना

'विश्वासाला मी तडा जाऊ देणार...' - प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना जयश्री महाजन म्हणाल्या की, शिवसेना सोडून आपल्या गटात आल्यास शहराचा विकास केला जाईल. अन्यथा शहराचा विकास थांबवून अडचणी निर्माण करण्यात येणार असल्याचे मेसेज शिंदे गटाकडून येत आहेत. मात्र, दबाव व धमक्याला बळी न पडता जळगाव शहराची निष्ठा व नागरिकांचा विश्वास हा महत्त्वाचा आहे. त्यामुळे या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नसल्याचे स्पष्टीकरण जयश्री महाजन यांनी दिलं आहे.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी कसली कंबर - दरम्यान, विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर शिवसेनेच्या ४० आमदारांना एकनाथ शिंदे यांनी सुरतमध्ये नेत बंड ( 40 Shivsena Rebel MLA ) केलं. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबतची आघाडी तोडून भाजपसोबत युती करण्याची भूमिका घेतली. राज्यातील मविआ सरकारचे संख्याबळ घटल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला. शिवसेना पक्षप्रमुख ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवरून खेचत, भाजपसोबत सत्ता स्थापन करून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. यानंतर शिंदेंनी शिवसेनेला सुरुंग लावण्यास सुरुवात केली आहे. अनेक पदाधिकाऱ्यांना शिंदे गटात सामावून घेत, सेनेचे बालेकिल्ल्यामध्ये वर्चस्व निर्माण करत आहेत. बारा आमदारांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला. शिंदे गटात येणाऱ्या पदाधिकाऱ्यांची संख्या वाढू लागल्याने धनुष्यबाण चिन्हासाठी त्यांनी निवडणूक आयोगाकडे दावा केला आहे. मात्र, चिन्ह शिंदे गटाकडे जाऊ द्यायचा नाही, यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि कंबर कसली आहे. त्यामुळे सेनेतील गळती रोखण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे सक्रिय झाले आहेत.

हेही वाचा - Krupal Tumane : 'खासदारांना विनायक राऊतांचा प्रचंड त्रास, लोकसभेत बाजू मांडू देत नसत'; कृपाल तुमानेंचा आरोप

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.