ETV Bharat / state

जळगावात प्रौढाची गळफास घेऊन आत्महत्या; कारण अस्पष्ट - प्रौढाची गळफास घेऊन आत्महत्या

संतोष पाटील हे पत्नी व आईसोबत ज्ञानदेव नगरात वास्तव्यास होते. सोनल टेंट हाऊस नावाने लग्नकार्यासाठी लागणारे साहित्याचे त्यांचे दुकान होते. आज (शुक्रवारी) सकाळी कुटुंबीयांना बाथरुमला जावून येतो, असे सांगून ते घराच्या वरच्या मजल्यावर गेले.

Dead Santosh patil
मृत संतोष पाटील
author img

By

Published : Jun 5, 2020, 9:33 PM IST

Updated : Jun 5, 2020, 9:43 PM IST

जळगाव - शहरातील जुना खेडी रोड परिसरातील ज्ञानदेव नगरात एका प्रौढाने गळफास घेऊन आत्महत्या केली. संतोष रामदास पाटील-माळी (वय 38) असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. शुक्रवारी दुपारी ही घटना उजेडात आली. याप्रकरणी शनिपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

संतोष पाटील हे पत्नी व आईसोबत ज्ञानदेव नगरात वास्तव्यास होते. सोनल टेंट हाऊस नावाने लग्नकार्यासाठी लागणारे साहित्याचे त्यांचे दुकान होते. आज (शुक्रवारी) सकाळी कुटुंबीयांना बाथरुमला जावून येतो, असे सांगून ते घराच्या वरच्या मजल्यावर गेले. त्यानंतर त्यांनी घरातील पंख्याला सुताने गळफास घेत आत्महत्या केली.

बराचवेळ झाला तरी पती बाथरुमवरुन का आले नाहीत? हे बघण्याठी त्यांची पत्नी वरच्या मजल्यावर गेली. घराचा दरवाजा आतून बंद असल्याचे त्यांचे लक्षात आले. दरवाजा तोडला असता संतोष यांनी पंख्याला गळफास घेतल्याचे दिसून आले. हे बघताच त्यांच्या पत्नीसह कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला.

पोलिसांची घटनास्थळी धाव -

या घटनेची माहिती मिळताच, शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विठ्ठल ससे, अश्‍विन हडपे, रवी पवार यांनी तात्काळ घटनास्थळी जावून पंचनामा केला. याप्रकरणी सचिन महाजन यांच्या खबरीवरुन शनिपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. संतोष यांनी आत्महत्या नेमकी कोणत्या कारणामुळे केली? याबाबत कुठलीही माहिती पोलिसांना मिळून आली नाही.

Last Updated : Jun 5, 2020, 9:43 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.