ETV Bharat / state

जळगाव : तरूणाच्या डोक्यात फोडली बिअरची बाटली; चौघांवर गुन्हा - jalgaon crime news

दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याने, एकाच्या डोक्यात बियरची बाटली फोडून त्याला जखमी केल्याची घटना जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरातील गणपती नगरामध्ये घडली आहे.

Man hits another man with beer bottle at jalgaon
जळगाव : तरूणाच्या डोक्यात फोडली बिअरची बाटली; चौघांवर गुन्हा
author img

By

Published : Jan 4, 2021, 5:21 PM IST

जळगाव - दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याने, एकाच्या डोक्यात बियरची बाटली फोडून त्याला जखमी केल्याची घटना जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरातील गणपती नगरामध्ये घडली आहे. याप्रकरणी चार जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, राकेश दिलीप कुंभार (वय २५ रा. गणपती नगर पिंप्राळा ) हा तरूण हातमजूरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. ३ जानेवारी रोजी तो राहत असलेल्या गल्लीमध्ये एकाचा लग्नाचा कार्यक्रम सुरू होता. या कार्यक्रमात सहभागी झालेले राकेश मिलिंद जाधव (वय २५ रा. मळी चौक पिंप्राळा), गंमप्या (पुर्ण नाव माहित नाही) , वण्या (पुर्ण नाव माहित नाही) दोन्ही रा. बौध्दवाडा आणि योगेश पाटील (चायनिजवाला रा. गणपती नगर पिंप्राळा) हे चौघे राकेश कुंभारजवळ येवून दारू पिण्यासाठी पैसे मागितले. तेव्हा राकेशने पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या चौघांनी राकेशला शिवीगाळ करून मारहाण केली. यात राकेश जाधवने त्यांच्या हातातील बिअरची बाटली राकेश कुंभारच्या डोक्यात मारली. यात राकेशच्या डोक्याला जखम झाली.

यानंतर चौघांनी राकेशच्या खिशातील ५०० रूपये जबरदस्तीने काढून घेतले तसेच बिअर बाटलीचा धाक दाखवून गळ्यातील ३० हजार रूपये किंमतीची सोन्याची चैन देखील हिसकावून घेतली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात चौघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा - ट्रकची ताडपत्री फाडून साडेसात लाखांचे खाद्यतेल चोरणारे तिघे अटकेत

हेही वाचा - खाऊचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नराधमाला अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.