ETV Bharat / state

जुन्या वादातून जळगावात जाळल्या २ दुचाकी; मध्यप्रदेशातील एकाला अटक - जुन्या वादातून दुचाकी पेटवल्या

मध्यप्रदेशमध्ये घडलेल्या जुन्या वादातून जळगावात दोन दुचाकी जाळल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. जळगावातील पिंप्राळा परिसरात ही घटना घडली होती.

जळगावात जाळल्या २ दुचाकी
जळगावात जाळल्या २ दुचाकी
author img

By

Published : Nov 26, 2020, 3:53 PM IST

जळगाव - मध्यप्रदेशात एकाच गावात राहणाऱ्या दोन तरुणांमध्ये किरकोळ कारणांवरुन काही महिन्यांपूर्वी वाद झाले होते. यानंतर एक तरुण जळगावातील पिंप्राळा येथे येऊन राहत होता. तर दुसऱ्याने बदला घेण्याच्या उद्देशाने दुचाकीने २०० किलोमीटर अंतर कापुन जळगाव गाठले. त्याच्या दुचाकी पेटवून पुन्हा मध्यप्रदेशात पळून गेला होता. या प्रकरणात १५ दिवसांनंतर पोलिसांनी संशयित तरुणास अटक केली आहे.

रोहित रामकिशन पवार (वय २०, रा. बेलवाडी, जि. खंडवा, मध्यप्रदेश) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. रोहिती याने पिंप्राळा परिसरात राहणारे राहुल गबरू पवार (वय २४, रा. सावखेडा ता. गणपतीनगर, पिंप्राळा) यांच्या (एमपी १२ एमव्ही ९२४२ व एमपी १२ एमएक्स ५३४९) दोन दुचाकी १० नोव्हेंबरच्या रात्री पेटवल्या होत्या.

माथेफिरुने पेटवल्याचा संशय-

रोहित व राहुल हे दोघे मुळचे बेलवाडी येथील रहिवासी आहेत. काही महिन्यांपूर्वी दोघांमध्ये किरकोळ कारणावरुन वाद झाले होते. दरम्यान, राहुल हा जळगावातील पिंप्राळा परिसरात स्थायिक झाला होता. तसेच खासगी कंपनीत नोकरी करुन तो गुजारन करीत होता. १० तारखेला रात्री रोहितने दोन्ही दुचाकी पार्किंग आवारात लावल्या होत्या. मध्यरात्री १.३० वाजेच्या सुमारास माथेफीरुंनी दोन्ही दुचाकी पेटवून दिल्या. घरासमोरील वॉचमन राधेश्याम पवार यांनी आरडा ओरड केल्यानंतर प्रकार लक्षात आला. त्यानंतर पाणी टाकून आग विझविली. यामध्ये सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले होते. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपी निष्पन्न

या प्रकरणी तपास सुरू असताना पोलिसांनी घटनास्थळावरुन काही सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले होते. या फुटेजवरुन दुचाकी पेटवणारा तरुण हा रोहित असल्याची पुसटशी कल्पना आली होती. त्यानुसार पोलिसांनी पुढील तपास सुरू केला. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले, नरेंद्र वारुळे, विजय पाटील, रामनंदनगरचे अनिल बडगुजर, अलताफ पठाण, प्रवीण जगदाळे, होमगार्ड सर्फराज पिंजारी यांच्या पथकाने रोहितबद्दलची संपूर्ण माहिती काढली. सीडीआरच्या माध्यमातून घटनेच्या दिवशीचे रोहितचे लोकेशन जळगावात असल्याची माहिती मिळाली. यानंतर पथकाने बेलवाडी येथे जाऊन रोहितला ताब्यात घेतले. रोहितने गुन्ह्याची कबुली दिली आहे. राहुलसोबत झालेल्या वादाचा बदला घेण्यासाठी बेलवाडी येथुन दुचाकीने जळगावात येऊन राहुलच्या दुचाकी पेटवून पळून गेल्याची कबुली त्याने दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.