ETV Bharat / state

मातीच्या ढिगाऱ्यावरून दुचाकी घसरून पडल्याने तरुणाचा मृत्यू; संतप्त नातेवाईकांनी मृतदेह आणला पोलीस ठाण्यात - jagaon

बिपीनसिंग राजरमणसिंग (वय 32) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेनंतर गुरुवारी सकाळी बिपीनसिंग याच्या नातेवाईकांनी या घटनेस कारणीभूत असलेल्या ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करत मृतदेह एमआयडीसी पोलीस ठाण्यात आणला होता. मात्र, पोलिसांनी संतप्त झालेल्या नागरिकांची समजूत काढल्याने तणाव निवळला.

जळगाव पोलीस स्टेशन
author img

By

Published : Mar 1, 2019, 2:23 PM IST

जळगाव - सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी रस्ता खोदून पाईप टाकल्यानंतर रस्त्यावर झालेल्या मातीच्या ढिगाऱ्यावरून दुचाकी घसरल्याने पडलेल्या एका तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास शहरातील एमआयडीसी परिसरातील एम सेक्टरमध्ये घडली.

बिपीनसिंग राजरमणसिंग (वय 32) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेनंतर गुरुवारी सकाळी बिपीनसिंग याच्या नातेवाईकांनी या घटनेस कारणीभूत असलेल्या ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करत मृतदेह एमआयडीसी पोलीस ठाण्यात आणला होता. मात्र, पोलिसांनी संतप्त झालेल्या नागरिकांची समजूत काढल्याने तणाव निवळला.

बिपीनसिंग राजरमणसिंग हा मूळचा मध्यप्रदेशातील रिवा येथील रहिवासी आहे. कामानिमित्त तो जळगाव शहरात आलेला होता. एमआयडीसीतील एका चटईच्या कंपनीत मनुष्यबळ पुरवणारा ठेकेदार म्हणून तो काम पाहत होता. बुधवारी रात्री तो त्याच्या (एमएच 19 डब्ल्यू 6068) क्रमांकाच्या दुचाकीवरून जात होता. त्यावेळी त्याची दुचाकी एम सेक्टरमध्ये रस्त्यावर असलेल्या मातीच्या ढिगाऱ्यावरून घसरली. त्यात बिपीनसिंगच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली. या अपघातानंतर त्याला काही नागरिकांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याचा उपचारापूर्वी मृत्यू झाला.

या घटनेनंतर गुरुवारी सकाळी बिपीनसिंगच्या नातेवाईकांनी त्याचा मृतदेह रुग्णवाहिकेतून एमआयडीसी पोलीस ठाण्यात आणला. पाईप टाकण्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराने काम झाल्यावर रस्ता व्यवस्थित न केल्याने हा अपघात झाला. त्यामुळे संबंधीत ठेकेदारावर तसेच एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलिसांनी संतप्त झालेल्या नागरिकांची समजूत काढल्याने तणाव निवळला.

undefined

बिपीनसिंग याचा अपघात होण्यापूर्वी एम सेक्टरमध्ये याच मातीच्या ढिगाऱ्याजवळ एका व्यक्तीचा अपघात झाला होता. त्या व्यक्तीची प्रकृतीदेखील गंभीर आहे. तरीही रस्ता व्यवस्थित करण्यात आलेला नाही. या प्रकारामुळे एमआयडीसीत काम करणाऱ्या काही कामगारांनी पोलीस ठाण्यात संताप व्यक्त केला.

Intro:जळगाव

सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी रस्ता खोदून पाईप टाकल्यानंतर रस्त्यावर झालेल्या मातीच्या ढिगाऱ्यावरून दुचाकी घसरून पडल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरातील एम सेक्टरमध्ये घडली. बिपीनसिंग राजरमणसिंग (वय 32, रा. सुधाकरनगर, जळगाव. मूळ रा. रिवा, मध्यप्रदेश) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेनंतर गुरुवारी सकाळी बिपीनसिंग याच्या नातेवाईकांनी या घटनेस कारणीभूत असलेल्या ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करत मृतदेह एमआयडीसी पोलीस ठाण्यात आणला होता. मात्र, पोलिसांनी संतप्त झालेल्या नागरिकांची समजूत काढल्याने तणाव निवळला.

Body:बिपीनसिंग राजरमणसिंग हा मूळचा मध्यप्रदेशातील रिवा येथील रहिवासी आहे. कामधंद्यानिमित्त तो जळगाव शहरात आलेला होता. एमआयडीसीतील एका चटईच्या कंपनीत मनुष्यबळ पुरवणारा ठेकेदार म्हणून तो काम पाहत होता. बुधवारी रात्री तो त्याच्या (एमएच 19 डब्ल्यू 6068) क्रमांकाच्या दुचाकीवरून जात होता. त्यावेळी त्याची दुचाकी एम सेक्टरमध्ये रस्त्यावर असलेल्या मातीच्या ढिगाऱ्यावरून घसरली. त्यात बिपीनसिंगच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली. या अपघातानंतर त्याला काही नागरिकांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याचा उपचारापूर्वी मृत्यू झाला. या घटनेनंतर गुरुवारी सकाळी बिपीनसिंगच्या नातेवाईकांनी त्याचा मृतदेह रुग्णवाहिकेतून एमआयडीसी पोलीस ठाण्यात आणला. पाईप टाकण्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराने काम झाल्यावर रस्ता व्यवस्थित न केल्याने हा अपघात झाला असून संबंधित ठेकेदारावर तसेच एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलिसांनी संतप्त झालेल्या नागरिकांची समजूत काढल्याने तणाव निवळला.

Conclusion:यापूर्वीही घडलीय घटना-

बिपीनसिंग याचा अपघात होण्यापूर्वी एम सेक्टरमध्ये याच मातीच्या ढिगाऱ्याजवळ एका व्यक्तीचा अपघात झाला होता. त्या व्यक्तीची प्रकृती देखील गंभीर आहे. तरीही रस्ता व्यवस्थित करण्यात आलेला नाही. या प्रकारामुळे एमआयडीसीत काम करणाऱ्या काही कामगारांनी पोलीस ठाण्यात संताप व्यक्त केला.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.