ETV Bharat / state

महाराष्ट्र दिन : जळगावात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण

महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्ह्यातील नागरिकांना शुभेच्छा प्रदान केल्या. कोरोना संसर्ग वाढू नये, यासाठी लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन करावे. कोरोनाविरुद्धच्या लढाईत घरीच राहून प्रशासनाला सहकार्य करावे. असे आवाहन करत त्यांनी कोरोनाविरुद्धची लढाई आपण निश्चित जिंकू, असा विश्वास व्यक्त केला.

author img

By

Published : May 1, 2020, 9:59 AM IST

Minister Gulabrao Patil hoisted flag at Collector Headquarters
जळगावात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण

जळगाव - महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त जळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आज (1 मे) सकाळी 8 वाजता जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रथमच महाराष्ट्र दिनाचा ध्वजारोहण समारंभ फक्त वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याच उपस्थितीत पार पडला.

जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जिल्हाधिकारी मुख्यालयात ध्वजारोहण

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने यावर्षी सुरक्षेच्या दृष्टीने सर्वसामान्य नागरिकांना ध्वजारोहण समारंभाला परवानगी नाकारण्यात आली होती. ध्वजारोहण समारंभाला जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, पोलीस अधीक्षक डाॅ. पंजाबराव उगले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, अपर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे, निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम, प्रांताधिकारी दीपमाला चौरे, तहसीलदार श्वेता संचेती, नायब तहसीलदार रवी मोरे आदी उपस्थित होते.

हेही वाचा... महाराष्ट्र दिन : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण

महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्ह्यातील नागरिकांना शुभेच्छा प्रदान केल्या. कोरोना संसर्ग वाढू नये, यासाठी लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन करावे. कोरोनाविरुद्धच्या लढाईत घरीच राहून प्रशासनाला सहकार्य करावे. असे आवाहन करत त्यांनी कोरोनाविरुद्धची लढाई आपण निश्चित जिंकू, असा विश्वास व्यक्त केला.

जळगाव - महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त जळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आज (1 मे) सकाळी 8 वाजता जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रथमच महाराष्ट्र दिनाचा ध्वजारोहण समारंभ फक्त वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याच उपस्थितीत पार पडला.

जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जिल्हाधिकारी मुख्यालयात ध्वजारोहण

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने यावर्षी सुरक्षेच्या दृष्टीने सर्वसामान्य नागरिकांना ध्वजारोहण समारंभाला परवानगी नाकारण्यात आली होती. ध्वजारोहण समारंभाला जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, पोलीस अधीक्षक डाॅ. पंजाबराव उगले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, अपर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे, निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम, प्रांताधिकारी दीपमाला चौरे, तहसीलदार श्वेता संचेती, नायब तहसीलदार रवी मोरे आदी उपस्थित होते.

हेही वाचा... महाराष्ट्र दिन : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण

महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्ह्यातील नागरिकांना शुभेच्छा प्रदान केल्या. कोरोना संसर्ग वाढू नये, यासाठी लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन करावे. कोरोनाविरुद्धच्या लढाईत घरीच राहून प्रशासनाला सहकार्य करावे. असे आवाहन करत त्यांनी कोरोनाविरुद्धची लढाई आपण निश्चित जिंकू, असा विश्वास व्यक्त केला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.