ETV Bharat / state

जळगावात लॉकडाऊनमध्ये काहीअंशी शिथिलता; दारुसह सर्व प्रकारची दुकाने उघडण्यास सशर्त परवानगी - जळगाव लॉकडाऊन

जिल्ह्यात सुरक्षा तसेच दक्षतेच्या कारणास्तव एकूण 16 कटन्मेंट झोन तयार केले आहेत. त्यामधील नागरिकांना बाहेर जाता किंवा बाहेरून त्यामध्ये कोणालाही प्रवेश करता येणार नाही. या झोनमधील 60 वर्षावरील नागरिकांची विशेष दक्षता घेण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला देण्यात आल्या आहे.

jalgaon collector
डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हाधिकारी
author img

By

Published : May 5, 2020, 11:05 AM IST

जळगाव - कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने तिसऱ्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. या लॉकडाऊनमध्ये काहीअंशी शिथिलता देण्यात आली आहे. जळगावात मंगळवारपासून काही दुकाने खुली होणार आहेत. मात्र, सर्वांसाठी सोशल डिस्टन्सिंग पाळणे बंधनकारक असणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिली. विशेष म्हणजे, दारुची दुकाने उघडणार असल्याने जळगावातील तळीरामांचा घसा ओला होणार आहे.

डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हाधिकारी

लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्याची माहिती देण्यासाठी नियोजन भवनात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. ढाकणे बोलत होते. याप्रसंगी पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, महापालिकेचे आयुक्त सतीश कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. किरण पाटील आदि उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी माहिती देतांना पुढे सांगितले की, सर्व प्रकारच्या ग्राहक उपयोगी दुकाने सुरु ठेवण्याची अनुमती देत असतानाच त्यांना काही अटी व शर्ती घालून दिलेल्या आहेत. यामध्ये सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन करणे, ग्राहक आणि दुकानदार यांनी मास्क वापरणे, दुकानाच्या बाहेर ग्राहकांसाठी सॅनिटायझर उपलब्ध करुन देणे, दिलेल्या वेळेतच दुकाने सुरू ठेवणे, अशाप्रकारे नियमांचे काटेकोरपणे पालन केल्यास दिलेल्या सवलती पुढेही सुरू ठेवता येतील. याशिवाय लग्न समारंभास 50 लोकांची उपस्थिती तर अंत्ययात्रेस 20 लोक उपस्थित राहू शकतील. मात्र, तेथेही सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपण पालन अपेक्षित आहे. सर्व प्रकारची दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देत असताना सार्वजनिक वाहतूक, धार्मिक कार्यक्रम, शाळा, महाविद्यालये, मॉल्स, स्पा, सलून दुकाने, ब्युटीपार्लर, हॉटेल्स, रेस्टॉरंट, परमिट रुम व बार 17 मे पर्यंत बंद राहतील, असेही त्यांनी सांगितले.

जिल्ह्यात सुरक्षा तसेच दक्षतेच्या कारणास्तव एकूण 16 कटन्मेंट झोन तयार केले आहेत. त्यामधील नागरिकांना बाहेर जाता किंवा बाहेरून त्यामध्ये कोणालाही प्रवेश करता येणार नाही. या झोनमधील 60 वर्षावरील नागरिकांची विशेष दक्षता घेण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला देण्यात आल्या आहे. जिल्ह्यात आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी कोविड केअर सेंटर, कोविड हेल्थ सेंटर स्थापन करण्यात आले आहे. त्याचबरोबर वैद्यकीय कारण वगळता मुंबई/पुण्यातून कोणालाही जिल्ह्यात येण्यासाठी तसेच जाण्यासाठी परवानगी नाही. त्याचबरोबर जिल्ह्याच्या सीमा 17 मे पर्यंत बंदच राहणार असून मजूर, विद्यार्थी यांना जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी त्यांची पूर्णपणे वैद्यकीय तपासणी करून त्यांच्यात कोरोनाचे कुठल्याही प्रकारचे लक्षणे नाहीत, याची खात्री पटल्यावरच त्यांना त्यांच्या जिल्ह्यात जाण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने पास देण्यात येत आहे, असे ते म्हणाले.

हे सुरू राहणार

* सर्व प्रकारची दुकाने

* शॉपिंग कॉम्प्लेक्‍समधील दुकाने

* लिकर, वाइन शॉप

* खासगी दवाखाने

* सर्वच कार्यालये 33 टक्के उपस्थितीसह

* जीवनावश्‍यक मालवाहतूक

* उद्योग

* बियाणे, खते विक्री

* फळ, भाजीपाला व दूध

* किराणा, मेडिकल दुकाने

* रुग्णवाहिका, शववाहिनी

* पेट्रोल, डिझेल

* धान्य दुकानातून वितरणConclusion:हे बंद राहणार

* शाळा, महाविद्यालये

* एस.टी. बस, रेल्वे, विमान सेवा

* हॉटेल, रेस्टॉरंट, खानावळ

* पाणीपुरी व भेलपुरीची दुकाने

* सलून, ब्युटीपार्लर, स्पा

* जिल्ह्याच्या सीमा

* मॉल्स, सिनेमा थिएटर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.