जळगांव- सोमवारपासून जिल्ह्यातील सर्वच बाजारपेठा व आस्थापना पुढील सूचना मिळेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी दिले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. या काळात फक्त अत्यावश्यक सेवा सुरू असतील. आदेशाचे पालन न करणाऱ्या व्यावसायिकांविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
जनता कर्फ्यूच्या यशस्वीतेनंतर जिल्हाभरात लॉक डाऊन करण्यात आले आहे. या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व हॉटेल्स, ढाबे, रेस्टॉरंट, खानावळी, लॉजिग, खाद्यपदार्थांचे गाळे, सराफ बाजार, करमणुकीची केंद्र, ब्युटी पार्लर व सलून आदी बंद असतील. तर, जीवनावश्यक वस्तू, मेडिकल व किराणा दुकान, दूध, दवाखाने, पॅथालॉजी आदी आत्यावश्यक सेवा सुरू राहतील.