ETV Bharat / state

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस एकनाथ खडसेंच्या दारी! गिरीश महाजनही होते उपस्थित - Leader of Opposition Devendra Fadnavis

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या कोथळी येथील घरी सकाळी 11 वाजेच्या सुमारास सदिच्छा भेट दिली. यावेळी माजीमंत्री गिरीश महाजन हे देखील उपस्थित होते.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस एकनाथ खडसेंच्या दारी!

author img

By

Published : Jun 1, 2021, 1:05 PM IST

Updated : Jun 1, 2021, 2:44 PM IST

जळगाव - राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे आज (मंगळवारी) जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याची सुरुवात त्यांनी मुक्ताईनगर येथून केली. दरम्यान, फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या कोथळी येथील घरी सकाळी 11 वाजेच्या सुमारास सदिच्छा भेट दिली. यावेळी माजीमंत्री गिरीश महाजन हे देखील उपस्थित होते. या ठिकाणी त्यांनी एकनाथ खडसेंच्या सून तथा भाजप खासदार रक्षा खडसे यांच्यासह इतर भाजप पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. फडणवीसांच्या या भेटीने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस एकनाथ खडसेंच्या दारी!

खडसेंच्या घरी दिली सदिच्छा भेट

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर व रावेर तालुक्यात गेल्या आठवड्यात मान्सूनपूर्व वादळी पावसाने मोठे थैमान घातले आहे. यात केळी बागांसह घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. दौऱ्याची सुरुवात करण्यापूर्वी त्यांनी मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथे खडसेंच्या घरी सदिच्छा भेट दिली.

खडसे-फडणवीस यांच्यात आहे राजकीय वैर

माजीमंत्री एकनाथ खडसे हे भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे आपल्याला भाजप पक्ष सोडावा लागला, असा आरोप एकनाथ खडसे यांनी केला होता. त्यानंतर फडणवीस यांनी आरोपाचे खंडन केले होते. मात्र, नंतर दोन्ही नेत्यांकडून एकमेकांवर सातत्याने आरोप-प्रत्यारोप केले जातात. अशा परिस्थितीत आज फडणवीस यांनी त्यांच्या घरी सदिच्छा भेट दिल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे.

खडसेंच्या बालेकिल्ल्यात दिलेल्या भेटीने उंचावल्या नजरा

दोन्ही नेत्यांमध्ये हाडवैर असताना फडणवीस यांनी खडसेंच्या बालेकिल्ल्यात दिलेली सदिच्छा भेट अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे. या भेटीत राजकीय गणिते ठरणार असल्याची चर्चा सुरू आहे. खडसेंनी पक्ष सोडल्यानंतर डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहेत. 'मिशन लोटस'चा हा एक भाग असल्याची शक्यता आहे.

हेही वाचा - प्रत्येक भेटीचा राजकीय अर्थ लावणे चुकीचे; देवेंद्र फडणवीस-शरद पवार यांच्या भेटीवर संजय राऊत यांची प्रतिक्रिया

Last Updated : Jun 1, 2021, 2:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.