ETV Bharat / state

जळगाव सत्तासंघर्ष : शिवसेनेकडून महापौर पदासाठी जयश्री महाजन; उपमहापौर पदासाठी कुलभूषण पाटील यांचे अर्ज दाखल

author img

By

Published : Mar 17, 2021, 12:40 PM IST

Updated : Mar 17, 2021, 4:54 PM IST

महापौर व उपमहापौर पदासाठीची निवड प्रक्रिया उद्या पार पडणार आहे. त्यात दोन्ही पदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आजची शेवटची मुदत आहे. त्यामुळे आज शिवसेनेकडून महापौर व उपमहापौर पदासाठी दोन्ही इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले.

jayashri mahajan filed nomination for mayor election jalgaon mnc
महापौर पदासाठी जयश्री महाजन यांचे अर्ज दाखल

जळगाव - महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठीची निवड प्रक्रिया उद्या (गुरुवारी) पार पडणार आहे. या निवडणुकीच्या प्रक्रियेत आज (बुधवारी) शिवसेनेकडून महापौर पदासाठी जयश्री महाजन यांनी तर उपमहापौर पदासाठी, भाजपत बंडखोरी करून शिवसेनेत दाखल झालेले नगरसेवक कुलभूषण पाटील यांनी आपले प्रत्येकी २ अर्ज दाखल केले.

याबाबतच्या प्रतिक्रिया.

महापौर व उपमहापौर पदासाठीची निवड प्रक्रिया उद्या पार पडणार आहे. त्यात दोन्ही पदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आजची शेवटची मुदत आहे. त्यामुळे आज शिवसेनेकडून महापौर व उपमहापौर पदासाठी दोन्ही इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले. दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज अंतिम मुदत असून, देखील भाजपकडून अद्याप आपल्या दोन्ही उमेदवारांची नावे निश्चित झालेली नाहीत. भाजपच्या ३० नगरसेवकांनी ऐनवेळी बंडखोरी केल्याने भाजप 'बॅकफूट'वर गेला आहे. त्यामुळे भाजप नेते सावध पावले टाकत आहेत. ऐनवेळी काही अडचण निर्माण होऊ नये म्हणून भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणी दोन्ही उमेदवारांची नावे जाहीर केली जातील, असे सांगितले जात आहे.

बंडखोर कुलभूषण पाटील जळगावात परतले -

भाजपचे बंडखोर नगरसेवक कुलभूषण पाटील यांना शिवसेनेकडून उपमहापौर पदाची संधी मिळाली आहे. आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ते जळगावात परतले. त्यांच्यासोबत भाजपचे सभागृह नेते तथा माजी महापौर ललित कोल्हे तसेच इतर नगरसेवक देखील जळगावात दाखल झाले आहेत. हे सर्वजण शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांसोबत अर्ज दाखल करताना सोबत होते. यावेळी माध्यमांशी बोलताना कुलभूषण पाटील म्हणाले की, आमची कोणत्याही नेत्यावर वैयक्तिक नाराजी नव्हती. मात्र, गेल्या अडीच वर्षांच्या काळात आम्हाला विश्वासात घेतले गेले नाही. निर्णय प्रक्रियेत डावलले गेले. भाजपकडे बहुमत होते. त्यामुळे शहराच्या विकासाच्या दृष्टीने निर्णय होणे अपेक्षित होते. शहराच्या विकासाची जबाबदारी ही स्थानिक आमदारांवर असताना त्यांनी सातत्याने ठेकेदारीला पाठबळ दिले. आम्ही हा विषय वेळोवेळी भाजप नेते गिरीश महाजन यांच्याकडे मांडला. पण त्यांनीही लक्ष दिले नाही. शेवटी आम्हाला नाईलाजाने शिवसेनेसोबत जाण्याचा हा निर्णय घ्यावा लागला. मी आज शिवसेनेकडून उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा - जळगाव महापालिका सत्तासंघर्ष : भाजपच्या बंडखोर नगरसेवकांना रुचली नाही राष्ट्रवादीच्या खडसेंची 'एन्ट्री'!

दोन्ही पदांवर विजय आमचाच - जयश्री महाजन

शिवसेनेच्या महापौर पदाच्या उमेदवार जयश्री महाजन यांनी यावेळी सांगितले की, आज मी शिवसेनेकडून महापौर पदासाठी अर्ज दाखल केला आहे. आम्हाला आमच्या वरिष्ठ नेत्यांनी संख्याबळाबाबत आश्वस्त केले आहे. त्यामुळे उद्या होणाऱ्या निवडणुकीत दोन्ही पदांवर आमचा विजय होईल, अशी आपल्याला खात्री असल्याचे जयश्री महाजन यांनी सांगितले.

शहराच्या विकासासाठी घेतला शिवसेनेने पुढाकार- नितीन लढ्ढा

शिवसेनेचे स्थानिक नेते तथा माजी महापौर नितीन लढ्ढा म्हणाले, गेल्या अडीच वर्षांच्या काळात भाजपचे बहुमत असताना शहरात कोणत्याही प्रकारची विकासकामे झाली नाहीत. याबाबत खुद्द भाजपचे काही नगरसेवक नाराज होते. शहराच्या विकासासाठी त्यांनी आमच्याशी संपर्क साधून एकत्र येण्याचे आवाहन केले. त्यांना आम्ही साथ दिली. आता उद्या आम्ही आमचे अपेक्षित संख्याबळ दाखवून देऊ. ते संख्याबळ निश्चितच भाजपला सत्तेपासून दूर ठेवणारे असेल, असा विश्वास नितीन लढ्ढा यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादीच्या एका स्थानिक नेत्याकडून 'लॉबिंग'चा प्रयत्न -

दरम्यान, महापौर व उपमहापौर पदाच्या उमेदवारीसंदर्भात भाजप आणि शिवसेनेत जोरदार घडामोडी घडत असताना, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या जळगावातील एका बड्या नेत्यानेही आपल्या मर्जीतील इच्छुकांना संधी मिळावी म्हणून लॉबिंग करण्याचा प्रयत्न केला. हा नेता भाजपचे विद्यमान उपमहापौर सुनील खडके यांच्या नावासाठी आग्रही होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या नेत्याने मंगळवारी रात्री उशिरा शिवसेनेचे विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांच्याशी फोनवर संपर्क साधून त्यांना त्यांच्या पत्नी जयश्री महाजन यांचा अर्ज महापौर पदासाठी दाखल करू नये, तुम्ही जयश्री महाजन आणि कुलभूषण पाटील यांच्या नावांचा व्हीप का काढला, तुम्हाला अधिकार कुणी दिले, असे सांगत दबाव आणण्याचा प्रयत्न केला.

एव्हढेच नव्हे तर भाजपचे माजी महापौर व आता शिवसेनेच्या बाजूने असलेले ललित कोल्हे यांनाही संपर्क करून 'तुझ्या बाजूच्या १० नगरसेवकांना जयश्री महाजन यांना मतदान करू नये म्हणून सांग' असे सांगितले. मात्र, यानंतर शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी आपल्या वरिष्ठांशी संपर्क साधून घडलेल्या प्रकाराबाबत माहिती दिली. त्यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशीही चर्चा केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थेट राष्ट्रवादीच्या तया नेत्याला फोन करून आता सारी सूत्रं जमलेली आहेत. तुम्ही या भानगडीत पडू नका, असे सांगितले. त्यानंतर या सार्‍या प्रकरणावर पडदा पडल्याची देखील सूत्रांची माहिती आहे.

हेही वाचा - जळगाव महापौर निवडणूक : उमेदवार जाहीर न करताच भाजपने जारी केला व्हिप

Last Updated : Mar 17, 2021, 4:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.