जळगाव महाविकास आघाडीमध्ये समविचारी जे वेगवेगळे पक्ष आहेत, ते आमच्याबरोबर आहेत आणि सर्व मिळून आम्ही काम करीत आहोत. मात्र, शिवसेनेने संभाजी ब्रिगेडशी केलेल्या युतीबाबत आजच माहिती मिळाली. त्यात काही वावगे वाटत नाही मात्र शिवसेना कोणाशी युती करीत Shiv Sena Alliance with Sambhaji Brigade असेल तर याबाबत भविष्यात चर्चा होईल, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जळगावात दिली NCP State President Jayant Patil in Jalgaon आहे.
जयंत पाटील यांच जळगाव पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना तंबी उद्धव ठाकरे यांना आपली ताकद दाखवण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी सभासद संख्या वाढवा, अशी तंबी राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यानी जळगाव पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दिली आहे. आगामी निवडणुकांमध्ये शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडी होणार व त्यामध्ये जर आपल्या मतदारसंघात जर सभासद संख्या कमी असेल, तर त्या जागेवर उद्धव ठाकरे म्हणतील की, या ठिकाणी आमचा उमेदवार द्या. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना आपली ताकद दाखवण्यासाठी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या मतदारसंघात जास्तीत जास्त सभासद करण्याची तंबी यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील जळगावात पक्षाचे नेते व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दिली आहे.
पक्ष बांधणीसाठी आघाडीच्या पक्षांची तयारी आघाडीतील पक्ष आपआपली पक्षाची बांधणीकरण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यामुळे आपली सभासदसंख्या जास्त कशी होईल याकडे सर्व पक्षांचे लक्ष आहे. नुकतेच शिवसेनेनेदेखील संभाजी ब्रिगेडशी युती करून आपली राजकीय वाटचाल दाखवून दिली आहे. जळगावात बोलताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, आपण आपली सभासद संख्या वाढवणे गरजेचे आहे. त्यामुळे सक्रिय कार्यकर्ते पक्षात असतील तरच पक्षाला त्या भागासाठी तिकीट मिळेल, अन्यथा त्या विभागावर आघाडीतील इतर पक्ष दावा सांगू शकतो. त्यामुळे आपण आपली सक्रिय कार्यकर्त्यांची फौज तयार केली पाहिजे. याकरिता पदाधिकाऱ्यांना त्यांनी तंबी दिली, आपली ताकद दाखवण्यासाठी पदाधिकाऱ्यांची सभासद संख्या वाढवा.
स्थानिक पातळीवर आघाडी करण्यासंदर्भात मोठी पावले तिन्ही पक्षामध्ये स्थानिक पातळीवर आघाडी करण्यासंदर्भात मोठी पावले उचलली जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी NCP Meating at Silver Oak दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी 10 ऑगस्ट रोजी सायंकाळी सिल्वर ओक आपल्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांची बैठक बोलावली Jayant Patil on Mahavikas Aghadi होती. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
दोन दिवसांपूर्वीच शिवसेनेची संभाजी ब्रिगेडशी युती जाहीर महाराष्ट्राच्या राजकारणात बंडखोरीचा फटका बसलेल्या शिवसेनेला Shiv Sena आता नवा जोडीदार सापडला आहे. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडची युती होणार असल्याची घोषणा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे Shiv Sena Party Chief Uddhav Thackeray यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड येत्या निवडणुकीत एकत्र लढणार असल्याचेही ते म्हणाले. संभाजी ब्रिगेड ही मागील 30 वर्षे संविधान, सामाजिक प्रबोधन करणारी संघटना आहे. आता संविधान वाचवण्यासाठी एकत्र यायचे आहे, असे अनेकजण मला सांगत होते असे ठाकरे म्हणाले. मला आशा आहे की आपण एकत्र येऊ आणि नवा इतिहास रचू. संभाजी ब्रिगेडची Sambhaji Brigade यापूर्वी भाजपशी युती होती. आता त्यांनी शिवसेनेशी युती केल्याने महाराष्ट्रात नवे राजकीय समीकरण सुरू होणार आहे.
हेही वाचा Uday Samant Vs Uddhav Thackeray उदय सामंत यांच्या विरोधात उद्धव ठाकरे समर्थकांची धुळ्यात घोषणाबाजी