ETV Bharat / state

महिला सुरक्षेच्या मुद्यावरून राष्ट्रवादी महिला काँग्रेस आक्रमक; जळगावात सरकारचे घातले श्राद्ध - राष्ट्रवादी महिला काँग्रेस आक्रमक

भाजप सरकारच्या काळात महिला व युवतींवर अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. मात्र, सरकार कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना करत नाही. महिलांवर वाढणाऱ्या अत्याचाराला सरकारच जबाबदार आहे, असा आरोप करत राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सरकारचे श्राद्ध घातले.

राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे आंदोलन
author img

By

Published : Sep 14, 2019, 6:26 PM IST

Updated : Sep 14, 2019, 8:30 PM IST

जळगाव - राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत एका व्यक्तीने आक्षेपार्ह वर्तन केल्याची धक्कादायक घटना दोन दिवसांपूर्वी मुंबईतील दादर रेल्वे स्थानकावर घडली होती. या घटनेनंतर महिला सुरक्षेच्या मुद्यावरून राष्ट्रवादी महिला काँग्रेस आक्रमक झाली आहे. शुक्रवारी जळगाव जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सरकारचे श्राद्ध घालत या घटनेचा निषेध नोंदवला.

राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे आंदोलन

हेही वाचा - सुप्रिया सुळेंसोबत गैरवर्तन प्रकरण; ठाण्यातील राष्ट्रवादी आघाडीच्या महिलांनी काळ्या साड्या घालून केला निषेध

दोन दिवसांपूर्वी खासदार सुप्रिया सुळे या औरंगाबाद दौराकरून देवगिरी एक्सप्रेसने मुंबईत आल्या. दादर स्थानकावर उतरत असताना कुलजित सिंह मल्होत्रा नामक एका टॅक्सी एजंटने त्यांच्याशी आक्षेपार्ह वर्तन केले. या घटनेमुळे महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सुप्रिया सुळे यांच्यासारख्या खासदार असलेल्या महिलेसोबत असा निंदनीय प्रकार घडू शकतो तर सर्वसामान्य युवती व महिलांच्या सुरक्षेचे काय असा प्रश्न राष्ट्रवादी महिला काँग्रेसने उपस्थित केला आहे. या घटनेनंतर महिला सुरक्षेचा मुद्दा पुढे करत शुक्रवारी जळगाव जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सरकारचा निषेध नोंदवण्यासाठी श्राद्ध घालत आंदोलन केले. या आंदोलनावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

हेही वाचा - उदयनराजेंना राष्ट्रवादीत त्रास होत असल्याचे 15 वर्षानंतर आत्ता कळले - सुप्रिया सुळे

महिलांच्या सुरक्षेबाबत सरकारला देणे घेणे नाही -

Intro:जळगाव
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत एका व्यक्तीने आक्षेपार्ह वर्तन केल्याची धक्कादायक घटना दोन दिवसांपूर्वी मुंबईतील दादर रेल्वे स्थानकावर घडली होती. या घटनेनंतर महिला सुरक्षेच्या मुद्यावरून राष्ट्रवादी महिला काँग्रेस आक्रमक झाली आहे. शुक्रवारी जळगाव जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सरकारचे श्राद्ध घालत या घटनेचा निषेध नोंदवला.Body:दोन दिवसांपूर्वी खासदार सुप्रिया सुळे या औरंगाबाद दौरा करून देवगिरी एक्सप्रेसने मुंबईत आल्या. दादर स्थानकावर उतरत असताना कुलजित सिंह मल्होत्रा नामक एका टॅक्सी एजंटने त्यांच्याशी आक्षेपार्ह वर्तन केले. या घटनेमुळे महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सुप्रिया सुळे यांच्यासारख्या खासदार असलेल्या महिलेसोबत असा निंदनीय प्रकार घडू शकतो तर सर्वसामान्य युवती व महिलांच्या सुरक्षेचे काय असा प्रश्न राष्ट्रवादी महिला काँग्रेसने उपस्थित केला आहे. या घटनेनंतर महिला सुरक्षेचा मुद्दा पुढे करत शुक्रवारी जळगाव जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सरकारचा निषेध नोंदवण्यासाठी श्राद्ध घालत आंदोलन केले. या आंदोलनावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.Conclusion:महिलांच्या सुरक्षेबाबत सरकारला नाही देणेघेणे-

भाजप सरकारच्या काळात महिला व युवतींवर अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. परंतु, सरकार कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना करत नाही. महिलांवर वाढणाऱ्या अत्याचाराला सरकारच जबाबदार आहे, असा आरोप करत राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सरकारचे श्राद्ध घातले.
Last Updated : Sep 14, 2019, 8:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.