ETV Bharat / state

जळगाव जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत आरोग्य विभागाचे वाभाडे

जळगाव जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सर्व सदस्यांनी आरोग्य विभागाच्या कार्यपद्धतीचे वाभाडे काढले. त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर णत्याही पदाधिकाऱ्यांचे आणि सदस्यांचे म्हणणे ऐकूण घेत नाहीत, असा आरोप केला.

author img

By

Published : Jun 18, 2019, 3:45 AM IST

जळगाव जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा

जळगाव - जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा सोमवारी दुपारी जिल्हा परिषद अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी सभेत सर्व सदस्यांनी आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी बेजबाबदारपणे वागत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर यांच्या कार्यमुक्तीचा ठराव करण्यात आला.

जळगाव जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा

कमलापूरकर या कोणत्याही पदाधिकाऱ्यांचे आणि सदस्यांचे म्हणणे ऐकूण घेत नाहीत. सदस्यांना नीट माहिती देत नाहीत, अशा स्वरूपाच्या तक्रारी सदस्यांनी केल्या. त्याचप्रमाणे औषध खरेदीची तरतूद ५ लाख रूपयांनी कमी केल्याने सदस्यांनी डॉ. कमलापूरकर यांना धारेवर धरले. श्वानदंश, रूबेला यासह विविध औषध खरेदीची तरतूद परस्पर कमी केल्याच्या कारणावरून सदस्यांनी त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांनीही आरोग्य विभागातील अनागोंदीची पोलखोल केली. कर्मचाऱ्यांच्या प्रतिनियुक्तीचे अधिकारी विभागीय आयुक्तांना असताना आरोग्य अधिकाऱ्यांनी सीईओंची मान्यता न घेता तसेच त्यांना न कळवता आपल्या अधिकाराचा गैरवापर करून कर्मचाऱ्यांच्या प्रतिनियुक्त्या केल्याचा ठपका ठेवला. राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत आरोग्य विभागातील विविध बाबींची नियमानुसार खरेदी केली नसल्याचे आरोप देखील त्यांनी कागदोपत्री पुराव्यानिशी केले.

एनआरएचएमच्या कर्मचाऱ्यांची बदली करण्याचे अधिकार नसताना त्या बदल्या देखील करण्यात आल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे सर्वच सदस्य संतप्त झाले. शेवटी डॉ. कमलापूरकर यांच्या कार्यमुक्तीचा ठराव करण्यात आला.

आरोग्य केंद्राच्या उद्घाटनावरून गदारोळ

चोपडा तालुक्यातील चहार्डी येथे आरोग्य केंद्राच्या नव्या इमारतीचे उद्घाटन करताना जिल्हा परिषदेच्या आरोग्य सभापतींसह पंचायत समितीच्या सभापतींना आमंत्रित करण्यात आले नाही. कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत देखील कुणाचेही नाव टाकण्यात आले नाही, असा आरोप मधुकर काटे यांनी केला. शासनाकडून ४ कोटी निधीतून उभारण्यात आलेल्या या इमारतीच्या उद्घाटनाला पदाधिकाऱ्यांना का बोलविले नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करून कामाचे बिल रोखण्याची मागणी सदस्यांनी केली. त्यावर सीईओंनी या प्रकरणाचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.

सभेला अध्यक्षा उज्ज्वला पाटील, उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, सभापती प्रभाकर सोनवणे, दिलीप पाटील, रजनी चव्हाण, जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी (सीईओ) डॉ.बी.एन. पाटील, अतिरिक्त सीईओ संजय मस्कर आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी.एस. अकलाडे उपस्थित होते.

Intro:जळगाव
जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सर्व सदस्यांनी आरोग्य विभागाच्या कार्यपद्धतीचे अक्षरशः वाभाडे काढले. आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी बेजबाबदारपणे वागत असल्याने सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांबाबत सर्वाधिक तक्रारी असल्याने सभेत त्यांच्या कार्यमुक्तीचा ठराव करण्यात आला.Body:जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा सोमवारी दुपारी अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. व्यासपीठावर उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, सभापती प्रभाकर सोनवणे, दिलीप पाटील, रजनी चव्हाण, सीईओ डॉ.बी.एन. पाटील ,अतिरिक्त सीईओ संजय मस्कर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी.एस. अकलाडे आदी उपस्थित होते.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर या कोणत्याही पदाधिकाऱ्यांचे व सदस्यांचे म्हणणे ऐकूण घेत नाहीत. सदस्यांना नीट माहिती देत नाहीत, अशा स्वरूपाच्या तक्रारी सदस्यांनी केल्या. त्याचप्रमाणे औषध खरेदीची तरतूद ५ लाख रुपयांनी कमी केल्याने सदस्यांनी डॉ. कमलापूरकर यांना धारेवर धरले. श्वानदंश, रूबेला यासह विविध औषध खरेदीची तरतूद परस्पर कमी केल्याच्या कारणावरून सदस्यांनी त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांनी तर आरोग्य विभागातील अनागोंदीची पोलखोल केली. कर्मचाऱ्यांच्या प्रतिनियुक्तीचे अधिकारी विभागीय आयुक्तांना असताना आरोग्य अधिकाऱ्यांनी सीईओंची मान्यता न घेता अथवा त्यांना न कळविता आपल्या अधिकाराचा गैरवापर करून कर्मचाऱ्यांच्या प्रतिनियुक्त्या केल्याचा ठपका ठेवला. राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत आरोग्य विभागातील विविध बाबींची नियमानुसार खरेदी केली नसल्याचे आरोप देखील त्यांनी कागदोपत्री पुराव्यानिशी केले. एनआरएचएमच्या कर्मचाऱ्यांची बदली करण्याचे अधिकार नसतांना त्या बदल्या देखील करण्यात आल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे सर्वच सदस्य संतप्त झाले. शेवटी डॉ. कमलापूरकर यांच्या कार्यमुक्तीचा ठराव करण्यात आला.Conclusion:आरोग्य केंद्राच्या उदघाटनावरून गदारोळ-

चोपडा तालुक्यातील चहार्डी येथे आरोग्य केंद्राच्या नव्या इमारतीचे उदघाटन करताना जिल्हा परिषदेच्या आरोग्य सभापतींसह पंचायत समितीच्या सभापतींना आमंत्रित करण्यात आले नाही. सभापती तालुक्याचे असताना त्यांना देखील बोलवले नाही. कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत देखील कुणाचेही नाव घेण्यात आले नाही, असा आरोप मधुकर काटे यांनी केला. शासनाकडून ४ कोटी निधीतून उभारण्यात आलेल्या या इमारतीच्या उद्घाटनाला पदाधिकाऱ्यांना का बोलविले नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करून कामाचे बिल रोखण्याची मागणी सदस्यांनी केली. त्यावर सीईओंनी या प्रकरणाचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.