ETV Bharat / state

जळगावः अनधिकृतपणे बसवलेला पुतळा हटवण्याच्या कारणावरून निमखेडीत तणाव

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील निमखेडीत ही घटना घडली आहे. अनधिकृतपणे बसवलेला पुतळा हटवण्यासाठी प्रशासन कारवाई करत असताना दगडफेक केली. यानंतर तणाव निर्माण झाला. सध्या निमखेडीत पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

author img

By

Published : Jan 19, 2021, 7:41 PM IST

जळगावः अनधिकृतपणे बसवलेला पुतळा हटवण्याच्या कारणावरून निमखेडीत तणाव
जळगावः अनधिकृतपणे बसवलेला पुतळा हटवण्याच्या कारणावरून निमखेडीत तणाव

जळगाव - अनधिकृतपणे बसवलेला पुतळा हटवण्याच्या कारणावरून ग्रामस्थ आणि पोलिसांमध्ये वाद झाल्याची घटना जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यातील निमखेडी खुर्द गावात मंगळवारी सकाळी घडली. या घटनेत काही ग्रामस्थांनी पोलिसांवर दगडफेक केली. त्यात एका पोलीस अधिकाऱ्यासह तीन पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत. कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

काय आहे नेमका प्रकार?
निमखेडी खुर्द गावातील मुख्य चौकात सोमवारी मध्यरात्रीनंतर अज्ञात व्यक्तींनी एका ठिकाणी चबुतरा बांधून त्यावर महापुरूषाचा पुतळा बसवला. सकाळी हा प्रकार उजेडात आला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक लावंड, पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक निलेश साळुंके, कैलास भारास्के, तहसीलदार श्वेता संचेती, नायब तहसीलदार प्रमोद झांबरे यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचारी निमखेडी येथे दाखल झाले. पोलीस व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांची समजूत घालत हा पुतळा अनधिकृतपणे बसवलेला आहे. त्याची परवानगी घेतली नसल्याने तो हटवण्याची विनंती केली. मात्र, ग्रामस्थ ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. पुतळा याच ठिकाणी राहील, अशी आग्रही मागणी गावातील तरुण, पुरुष, महिला यांनी लावून धरली. तहसीलदार श्वेता संचेती ग्रामस्थांची समजूत घालत असतानाच अचानक दगडफेकीला सुरुवात झाली.

तीन पोलीस कर्मचारी जखमी
या दगडफेकीमध्ये पोलीस कर्मचारी विजय कचरे, वरणगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीपकुमार बोरसे तसेच आरसीपी प्लाटूनचे कर्मचारी मोहसीन शेख जखमी झाले. घटनेला हिंसक वळण लागल्याने बंदोबस्तासाठी दोन आरसीपी स्ट्रायकींग फोर्स, मुक्ताईनगर, बोदवडसह वरणगाव येथून पोलीस कर्मचाऱ्यांचा ताफा मागवण्यात आला.

पोलीस अधीक्षकांची घटनास्थळी भेट
या घटनेनंतर पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, प्रांताधिकारी रामसिंग सुलाने यांनी दुपारी गावात भेट दिली. दरम्यान, या घटनेची चौकशी सुरू असून, दोषींवर कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. मुंडे यांनी दिली.

बाईट: डॉ. प्रवीण मुंडे, पोलीस अधीक्षक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.