जळगाव - कोरोनासदृश्य लक्षणे जाणवल्याने जळगावातील एका 68 वर्षीय वृद्ध महिलेला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्या महिलेचा आज दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. संशयित कोरोना रुग्ण असलेल्या या महिलेचा स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून, अद्याप त्याचा अहवाल प्रलंबित आहे. अहवाल आल्यानंतरच तिच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.
राज्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून, संशयित कोरोना रुग्णांची संख्या देखील झपाट्याने वाढत आहे. कोरोनासदृश्य लक्षणे जाणवल्याने, शहरातील एका 68 वर्षीय महिलेला, शुक्रवारी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या महिलेवर उपचार सुरू असताना तिचा आज दुपारी मृत्यू झाला. या महिलेचे नमुने धुळे येथील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. मात्र, त्याचा अहवाल अद्याप प्रलंबित असल्याने या महिलेचा मृत्यू कोरोनामुळे झाला की इतर अन्य कारणामुळे झाला याबाबत स्पष्टता झालेली नाही.
9 कोरोना संशयिताचा मृत्यू -
जळगावात आतापर्यंत 8 कोरोना संशयित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सुदैवाने या सर्वांचा कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आज मृत्यू झालेली महिलाही कोरोना संशयित आहे.
हेही वाचा - जळगावात धान्य वितरण प्रणालीत अनागोंदी; हक्काच्या धान्यासाठी नागरिकांची वणवण
हेही वाचा - लॉकडाऊनचा फायदा : जळगावात प्रदुषणाचा स्तर १५ दिवसात २०० पटीने घटला, धुलिकणांचे प्रमाण ७२ वरून ३० पॉइंटवर