ETV Bharat / state

जळगाव महापालिका सत्तासंघर्ष : भाजपच्या बंडखोर नगरसेवकांना रुचली नाही राष्ट्रवादीच्या खडसेंची 'एन्ट्री'!

author img

By

Published : Mar 16, 2021, 3:36 PM IST

एकनाथ खडसेंनी सोमवारी प्रसारमाध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत उपमहापौर पदासाठी अद्याप कुणाचेही नाव ठरविलेले नसल्याचे सांगितले. मात्र, शिवसेनेने दोन दिवसांपूर्वीच महापौर पदासाठी जयश्री महाजन तर उपमहापौर पदासाठी भाजपचे बंडखोर नगरसेवक कुलभूषण पाटील यांचे नाव जाहीर केले होते.

जळगाव महापालिका सत्तासंघर्ष : भाजपच्या बंडखोर नगरसेवकांना रुचली नाही राष्ट्रवादीच्या खडसेंची 'एन्ट्री'!
जळगाव महापालिका सत्तासंघर्ष : भाजपच्या बंडखोर नगरसेवकांना रुचली नाही राष्ट्रवादीच्या खडसेंची 'एन्ट्री'!

जळगाव : महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाच्या निवडीसाठी अवघे दोन दिवस शिल्लक आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात दररोज लक्षवेधी घटना घडत आहेत. भाजपचे २७ नगरसेवक ऐनवेळी बंडखोरी करत शिवसेनेच्या बाजूने झुकलेत. त्यामुळे भाजपचे संख्याबळ धोक्यात आले आहे. दुसरीकडे, या सत्तासंघर्षात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी एन्ट्री केली. खडसेंनी काल उपमहापौर पदाबाबत केलेले वक्तव्य भाजपच्या बंडखोर नगरसेवकांना रुचलेले नाही. फुटीच्या राजकारणात एकनाथ खडसे यांची एन्ट्री झाल्याने आता फुटलेल्या नगरसेवकांमध्ये नाराजी वाढल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

खडसेंनी उपमहापौर पदासाठी अद्याप कुणाचेही नाव ठरविलेले नाही
एकनाथ खडसेंनी सोमवारी प्रसारमाध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत उपमहापौर पदासाठी अद्याप कुणाचेही नाव ठरविलेले नसल्याचे सांगितले. मात्र, शिवसेनेने दोन दिवसांपूर्वीच महापौर पदासाठी जयश्री महाजन तर उपमहापौर पदासाठी भाजपचे बंडखोर नगरसेवक कुलभूषण पाटील यांचे नाव जाहीर केले होते. अशा परिस्थितीत खडसेंच्या वक्तव्यामुळे भाजपच्या फुटलेल्या नगरसेवकांमध्ये अस्वस्थता वाढल्याची चर्चा आहे. एकनाथ खडसे हे भाजपचे विद्यमान उपमहापौर सुनील खडके यांच्यासाठी आग्रही आहेत. मात्र, शिवसेनेचे अनेक नगरसेवक, पदाधिकारी आणि भाजपमधून फुटलेल्या काही नगरसेवकांकडून कुलभूषण पाटील यांचे नाव उपमहापौर पदासाठी पुढे केले जात आहे. खडसेंनी नवीन नाव पुढे केल्याने फुटलेल्या नगरसेवकांमध्ये नाराजी वाढली आहे. दरम्यान, या साऱ्या प्रकाराबाबत तोडगा काढण्यासाठी ठाणे येथील एका हॉटेलमध्ये एकनाथ खडसे, गुलाबराव पाटील व एकनाथ शिंदे यांच्यात सोमवारी रात्री बैठक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

तर खडके यांना मिळेल स्थायी समिती सभापतीपद?
सुनील खडके यांच्या नावासाठी माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यासह ठराविक नगरसेवकही आग्रही आहेत. मात्र, भाजपमधून फुटलेल्या नगरसेवकांमध्ये मुख्य सूत्रधार कुलभूषण पाटील हे असल्याने अनेकांचा आग्रह कुलभूषण पाटील यांच्या नावासाठी आहे. यावर तोडगा काढण्यासाठी जळगावमधील शिवसेना नगरसेवकांच्या देखील काही बैठका सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यानुसार कुलभूषण पाटील यांना उपमहापौर पद दिल्यास पुढील स्थायी समिती सभापती पद सुनील खडके यांना देण्याबाबतचा प्रस्ताव देखील शिवसेनेकडून देण्यात आल्याची चर्चा आहे.

खडसेंनी श्रेय घेऊ नये, शिवसैनिकांचा आग्रह
दरम्यान, भाजपमधून फुटलेले नगरसेवक हे खडसेंच्या सांगण्यावरून फुटले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. पण अनेक शिवसैनिकांसह फुटलेल्या काही नगरसेवकांनी खडसेंचे श्रेय नाकारले आहे. आम्ही सर्व नगरसेवक स्वयंस्फूर्तीने शिवसेनेत दाखल झालो आहोत. आम्हाला कोणत्याही नेत्याने बंडखोरी करण्यासाठी शब्द दिला नव्हता. असा भाजपच्या बंडखोर नगरसेवकांचा दावा आहे. त्यातच या फुटीमध्ये मुख्य भूमिका पार पाडलेल्या शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या घडामोडींची माहिती एकनाथ खडसे यांना देखील देण्यात आली नव्हती. शिवसेनेच्या अनेक नेत्यांना देखील व जिल्ह्यातील आमदारांना देखील याबाबतची माहिती देण्यात आली नव्हती. या फुटीच्या राजकारणात खडसेंचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग नाही. त्यामुळे खडसेंनी श्रेय घेऊ नये, असा शिवसैनिकांचा आग्रह आहे.

हेही वाचा - महाराष्ट्राला कोरोनामुक्त करण्यासाठी आनंद महिंद्रांनी सांगितला उपाय

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.