जळगाव - सोने-चांदीच्या व्यापारामुळे जळगाव शहराची ओळख संपूर्ण देशभर 'सुवर्णनगरी' म्हणून आहे. परंतु, कोरोनामुळे याच सुवर्णनगरीत सध्या स्मशान शांतता आहे. आज (मंगळवारी) गुढीपाडव्याचा सण आहे. साडेतीन मूहुर्तांपैकी हा एक शुभ मूहुर्त मानला जातो. या दिवशी सोने खरेदीला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. मात्र, कोरोनामुळे सुवर्णनगरीतील सर्वच सुवर्णपेढ्या बंद असल्याने याठिकाणी एक रुपयाचीही उलाढाल होऊ शकलेली नाही. सुवर्णनगरीतील कोट्यवधी रुपयांचे व्यवहार ठप्प असून, सुवर्ण व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
गेल्या वर्षीही जळगाव शहरात एप्रिल महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला होता. शिवाय केंद्र सरकारच्या वतीने टाळेबंदी घोषित करण्यात आल्याने सुवर्णनगरीतील सराफी पेढ्या बंद होत्या. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान व्यापाऱ्यांना सहन करावे लागले होते. या वर्षी देखील गेल्या वर्षीप्रमाणेच स्थिती आहे. सलग दुसऱ्या वर्षी सराफ व्यावसायिकांना कोरोनामुळे गुढीपाडव्याच्या मूहुर्तावर आपल्या पेढ्या बंद ठेवाव्या लागल्या आहेत. जळगाव शहरात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. ही साखळी खंडित करण्यासाठी स्थानिक प्रशासनाने अत्यावश्यक सेवेतील दुकाने व आस्थापना सोडून इतर सर्व प्रकारच्या दुकाने व आस्थापनांवर कडक निर्बंध घातले आहेत. त्यात सराफ पेढ्यांचाही समावेश असल्याने सराफ बाजारातील सर्वच व्यवहार ठप्प आहेत.
जळगाव : मूहुर्त गुढीपाडव्याचा, मात्र 'सुवर्णनगरी'त एक रुपयाचीही उलाढाल नाही !
समाजहित म्हणून सराफ व्यापाऱ्यांनी टाळेबंदीला सहकार्य केले आहे. परंतु, कोरोनामुळे गेल्या वर्षापासून सराफ व्यावसायिकांची स्थिती बिकट आहे. अशाही परिस्थितीत व्यापाऱ्यांना इतर खर्च सुटलेले नाहीत. प्रशासनाने आमच्यावर निर्बंध घालण्यापूर्वी थोडा वेळ किंवा नियमावलीच्या अधीन राहून सूट देण्याची गरज होती. असे झाले असते तर आम्हाला पूर्वी मिळालेल्या ऑर्डर पूर्ण करता आल्या असत्या. कोरोनामुळे लग्नसराईवरही मोठा परिणाम झाला आहे. अनेकांनी लग्न समारंभ पुढे ढकलले आहेत. लग्न समारंभाच्या निमित्ताने आलेल्या ऑर्डरही तयार आहेत. पण सराफी पेढ्याच उघडता येत नसल्याने व्यवहार होऊ शकलेले नाहीत.