ETV Bharat / state

Delta Plus: जळगाव जिल्ह्यात मे महिन्यातच 'डेल्टा प्लस'चे रुग्ण झाले बरे - जिल्हाधिकारी - corona delta plus variant news

जळगाव जिल्ह्यात कोरोनाच्या नव्या डेल्टा प्लस व्हेरियंटचे सात रुग्ण मे महिन्यात आढळले होते. हे सातही रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली.

jalgaon district collector abhijit raut said All 7 Jalgaon Delta-plus patients were asymptomatic
Delta Plus: जळगाव जिल्ह्यात मे महिन्यातच 'डेल्टा प्लस'चे रुग्ण झाले बरे - जिल्हाधिकारी
author img

By

Published : Jun 23, 2021, 10:19 PM IST

Updated : Jun 23, 2021, 10:47 PM IST

जळगाव : जिल्ह्यात कोरोनाच्या नव्या डेल्टा प्लस व्हेरियंटचे सात रुग्ण मे महिन्यात आढळले होते. हे सातही रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली. हे रुग्ण पारोळा तालुक्यातील एकाच गावातील असल्याचे सांगितले जात आहे. परंतु, जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात स्पष्ट माहिती देण्यास नकार दिला. हे सर्व रुग्ण एकाच भौगोलिक क्षेत्रातील असून, जनतेत घबराट पसरू नये म्हणून याबाबत माहिती जाहीर करता येणार नाही, असे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सांगितले. या रुग्णांना मे महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. परंतु, त्यांच्यात कोरोनाची कोणत्याही स्वरुपाची लक्षणे नव्हती. ते रुग्ण घरीच बरे झाले. त्यामुळे कोरोना विषाणूचा नवा व्हेरियंट आला म्हणून घाबरून जाऊ नये, असेही राऊत म्हणाले.

जिल्हाधिकारी अभिजित राऊत आधिक माहिती देताना...

कोरोना विषाणूच्या जिनोमिक सिक्वेन्सिंगसाठी जिल्ह्यातून पाठवलेल्या 100 नमुन्यांपैकी 7 नमुन्यांमध्ये डेल्टा प्लस व्हेरियंट आढळला. नवा व्हेरियंट समोर आल्यानंतर संबंधित क्षेत्रात जिल्हा प्रशासनाच्या वतीने आरोग्य यंत्रणेची मदत घेऊन तातडीने रुग्णांच्या संपर्कातील लोकांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यात आले. दिलासादायक बाब म्हणजे, नव्या व्हेरियंटमुळे त्या क्षेत्रात पॉझिटिव्हिटी वाढली नाही असे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. जिल्ह्याच्या एकूण पॉझिटिव्हिटीप्रमाणेच त्या क्षेत्राची पॉझिटिव्हिटी ही 1.21 टक्के इतकी आढळली. मृत्यूदरही वाढलेला नसल्याचे स्पष्ट झाले. कोरोना पॉझिटिव्हिटीचा जिल्ह्यातील ओव्हर ऑल ट्रेंड प्रमाणेच स्थिती त्याठिकाणी आहे, असेही जिल्हाधिकारी राऊत यांनी स्पष्ट केले.

व्हेरियंटवर अभ्यासाची गरज-

'डेल्टा प्लस' व्हेरियंटच्या सातही रुग्णांना मे महिन्यात कोरोनाची लागण झालेली होती. ते रुग्ण गृहविलगीकरणातच बरे झाले. असे असले तरी नवा व्हेरियंट किती धोकादायक आहे. त्यामुळे काही चिंताजनक परिस्थिती निर्माण होऊ शकते का? यासाठी सखोल अभ्यासाची गरज आहे. त्यावर एनआयव्ही, आयसीएमआर तसेच एनसीडीसी स्तरावर प्रयत्न सुरू असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

विषाणू स्वरूप बदलतो, ही नियमित प्रक्रिया -

या विषयासंदर्भात बोलताना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण म्हणाले की, कोणत्याही प्रकारचा विषाणू हा काही काळानंतर आपले स्वरूप बदलतो. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. यापूर्वी एचआयव्हीच्या विषाणूच्या बाबतीत असे घडले आहे. एचआयव्हीवर औषधोपचार आल्यानंतर त्याच्या विषाणूने स्वरूप बदलले. तसाच प्रकार कोरोना विषाणूच्या बाबतीत घडला आहे. डेल्टा प्लस व्हेरियंट समोर आला असला तरी कोरोनाची स्क्रिनिंग, उपचार पद्धती ही पूर्वीप्रमाणे असणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

'त्या' क्षेत्रात हायरिस्कमधील 165 जणांची स्क्रिनिंग -

डेल्टा प्लस व्हेरियंटचे रुग्ण ज्या भौगोलिक क्षेत्रात आढळले आहेत, त्या क्षेत्रात तातडीने रुग्णांच्या संपर्कातील लोकांचे स्क्रिनिंग करण्यात आले. त्यात 165 जणांपैकी 2 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले होते. मात्र, त्यांनाही लक्षणे नव्हती. नंतर ते रुग्ण बरे झाले आहेत, अशीही माहिती मिळाली आहे. दरम्यान, या दोन्ही रुग्णांमध्ये डेल्टा प्लस व्हेरियंट आहे किंवा नाही, याची खात्री झालेली नाही. जिल्हा प्रशासनाकडून पुढील महिन्यात अजून 100 नमुने तपासणीसाठी पाठवले जाणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

हेही वाचा - धक्कादायक : चाळीसगावात चोरट्यांनी 'एटीएम' पळवले; १७ लाखांची होती मशिनमध्ये रोकड

हेही वाचा - केंद्रातले मोदी सरकार हे इंग्रजांपेक्षाही अत्याचारी; नाना पटोलेंची जळगावच्या फैजपुरात घणाघाती टीका

Last Updated : Jun 23, 2021, 10:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.